कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल) आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या स्थानिक आमदार विकास कार्यक्रम वर्ष 2020/21 अंतर्गत बिलोली ग्रामीण रूग्णालयात रूग्ण वाहिकेचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर हे होते तर उद्घाटक म्हणून वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर अजित गोपछडे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, वैद्यकीय अधीक्षक नागेश लखमावाड, शिवराज पाटील आदींची विशेष उपस्थिती होती. बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात रूग्ण वाहिका आणि पंचवीस खाटा ची गरज असल्याची बाब बिलोली शहर विकास कृती समितीने आमदार राम पाटील रातोळीकर यांच्याकडे विषद केली होती.याबाबत कृती समितीचे सुभाष पवार आणि गोविंद मुंडकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता .सात महिन्यापूर्वी केलेली मागणी नुकतीच पूर्ण झाली.रूग्ण वाहिकेचे शुभारंभ दि. 31 ऑक्टोबर 2020 रोजी ग्रामीण रूग्णालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी वाहान चालक चालक महेश हळीखेडे याचा डॉक्टर अजित गोपछडे यांनी सत्कार केला.डॉक्टर अजित गोपछडे यांनी उद्घाटनपर भाषण प्रभावीरीत्या केले तर ...