मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिलोली नगर परिषदेचे नगराध्यक्षा मैथिली संतोष कुलकर्णी अपात्र

बिलोली-   2017 मध्ये थेट जनतेतुन नगर अध्यक्ष म्हणून निवडून आलेले नगर परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा सौ. मैथिली संतोष कुलकर्णी यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. कामात अनियमितता आणि अपहार प्रकरणी त्यांना नगर अध्यक्ष पदावरून दूर ठेवण्याचा निर्णय आज 31 जानेवारी 2019ला  झाला.

पाचपिपळी येथील बालीपीर दर्गाचे उर्स (जञा) उद्या

बिलोली तालूक्यातील मौ.पाचपिपळी येथे दर वर्षाप्रमाणे या ही वर्षी  साजरी केली जात आहे.    उर्स (जत्रा),  दि 1 फेब्रुवारी रोज शुक्रवार तर .2 फेब्रुवारी  शनिवार  रोजी पशुप्रदर्शन,  कुस्ती  व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान   प्राचार्य .डॉ. बि.एस.पिंपळे सर,विजयकुमार (मालीपाटील) बळवंत पा.लुटे,संदिप पा.रामपुरे,हरिदास पा.मुकदम,संजय पा.रामपुरकर,पिंटू शिरोळे,नागनाथ श्रीरामे, आनिल पिंपळे,सुभाष श्रीरामे, श्रीनिवास पा.मुकदम, शंकर गोणारे,विवेक रामपुरे,भगवान कपाळे,बाबु महाराज पहेलवान,दता पा.शिरोळे,बालाजी गं.जाधव,शिवाजी चां.जाधव,विठल जाधव,विठल कोतवाल,चंद्रकांत वाघमारे, प्रताप वाघमारे, गौतम वाघमारे,राजु वडेटवाड, सतिश पा.धुपेकर साईप्रसाद पा.लुटे अदिसह गावक-यांच्या वतीने करण्यात

हिवताप व हत्तीरोग आरोग्य कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्ना बाबत सकारात्मक चर्चा

हिवताप व हत्तीरोग आरोग्य कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्ना बाबत मा. डॉ भोई सर सहसंचालक, आरोग्य सेवा (हिहवज) पुणे यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना मा.बाजीराव कांबळे साहेब प्रेणीत यांची सकारात्मक चर्चा झाली महाराष्ट्र राज्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील आरोग्य कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्ना बाबत चर्चा करण्याकरिता मा. डॉ भोई सर सहसंचालक आरोग्य सेवा (हिहवज) पुणे यांच्या कडे वेळ मागितला असता त्यांनी आजच्या दिनांकास आपल्या राज्यातील विविध प्रलंबित मागण्याच्या बाबतीत चर्चा करण्याकरिता वेळ दिला. सह संचालक आरोग्य सेवा (हिहवज) पुणे कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.     यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे राज्य पदाधिकारी मा. बाजीराव कांबळे साहेब राज्याध्यक्ष, मा. पी.एन.काळे साहेब राज्य सरचिटणीस, मा.जगदीश गोपाळे राज्य कार्याध्यक्ष, सत्यजीत टिप्रेसवार नांदेड जिल्हाध्यक्ष, मयूर साडेगावकर जालना जिल्हाध्यक्ष, दिनकर थोरात पुणे, संदिप नागे रायगड व राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

आरंरं बापु . ..पाहिजे का सर्व सुख खंडिभर ... तर झोपुनी बघ एकदा मायीच्या मांडीवर ..

सद्य  पस्थितीवर भाष्य करणा-या कविता....ग्रामीण कौटुंबिक हितसंबंध जोपासतांना आईवडीलांची होणारी परवड..यावर जबरदस्त भाष्य करणारी"काजळमया"ही कथा...आपल्या उत्कृष्ट शैलीतुन..साहित्य रसिकांना खिळवून ठेवणारे अष्टपैलू साहित्यिक बालाजी पेटेकर खतगावकर यांच्या ग्रामीण बोलीभाषेतील गावढाली शब्दातून व्यक्त होणा-या भावना काळजाला भिडणारा आवाज..शेवटपर्यंत साहित्य रसिकांना खिळवून ठेवला.  ...पैसा,प्रसिद्धी, सत्ता,यांच्या मागे लागलेल्या आजकालच्या माणसांना सुखाची हमी देणारी कविता "पाहिजे असेल तुला सुख खंडिभर तर झोपुन बघ एकदा आईच्या मांडीवर "...शेतकरी बापाच्या व्यथेची कथा सांगणारी कविता "शेतकरी राजा"..राजकारणात चाललेल्या विघातक कृतीचा समाचार घेणारी "काढला माझा काटा" ही कविता विविध विनोदी प्रसंगातुन हास्याचे फवारे उडवत रसिकांना चिंब भिजवत बांधुन ठेवले. बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील जय किसान विद्यलयाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामीण कवी बालाजी पेटेकर खतगावकर यांनी अत्यंत दर्जेदार कविता सादर केले.जगात आई,वडील आणि शिक्षक यांनाच आपला पाल्य किं...

चिटमोगरा येथिल कला महोत्सवात महाराष्ट्ररत्न राजु पाटिल यांचा भव्य सत्कार

बिलोली तालुक्यातील  मौ.चिटमोगरा  येथे आज दि २६ जानेवारी रोजी  शनिवारी प्रजासत्ताक दिना निमित्त जि.प.प्राथमिक शाळेच्या वतिने संध्याकाळी ०७ वा. सांस्कृतिक कला महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर आयोजित कार्यक्रमात नुकतच   महाराष्ट्ररत्न पुरस्कारांने सन्मानित झालेले  बिलोली चे पञकार राजु पाटिल शिंपाळकर यांचा शालेय व्यवस्थापन समिती व गावक-यांच्या वतिने भव्य आसा सत्कार करण्यात आला. येथिल जि.प.शाळेच्या वतिने गेल्या तिन वर्षा पासुन सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोज करण्यात येते .या कार्यक्रमाचे औचित्य साधुन प्रमुख  मान्यवरांच्या उपस्थित राजु पाटिल यांचा शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ व भेट स्वरुपात  पुस्तक देउन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी संस्कृतीक संवर्धन मंडळ सगरोळी चेअरमन मा.प्रमोद देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे येथिल प्रसिद्ध  उद्योजक  मा.अशोक पिलगोंडे  स्वाभिमानी  संभाजी ब्रिगेड जि.अध्यक्ष हाणमंत पाटिल वाडेकर ,सरपंच संघनेचे जिल्हाअध्यक्ष  सतिश पाटिल,केंद्र प्रमुख अटकळी मठदेवरू पञकार...

बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

सांगली  जतमधील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आदर्श शाळा  पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे. श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय नेमीनाथनगर, सांगली येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती  आदर्श शाळा पुरस्कार देऊन या शाळेला गौरविण्यात आले आहे. अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी सांगली, शामरावजी जवंजाळ राज्याध्यक्ष म.रा.मागासवर्गीय शिक्षक संघटना ,संगीता खोत महापौर म.न.पा.सांगली, स्नेहल सांवत सभापती ,डॉ.विकास सलगर प्राचार्य Diecpd सांगली,नामदेव माळी गटशिक्षणधिकारी मिरज,संतोष कदम.बी.एस्.रामदुर्ग सी.इ.ओ.डी.सी.सी.बँक सांगली ,व मा.प्रल्हाद हुवाळे  यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक ,एस.एम.सी.अध्यक्ष , सदस्य व पालक व ग्रामस्त  यांनी  हा पुरस्कार  स्वीकारला . छोट्याशा गावात वाडी-वस्तीवर शाळेमध्ये चाललेल्या कार्याची   शिक्षक संघटनेच्या वतीने आदर्श शाळा  पुरस्कारासाठी शाळेची निवड केली. त्याबद्दल शाळेच्या वतीने महाराष्ट्र राज्य मागासर्गीय शिक्षक संघटनेचे ...

बिलोली तालुक्यातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीचे लघू पाटबंधारे विभागास पञ

बिलोली-  तेलंगणा राज्याच्या सिमेवर असलेल्या बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागात असलेल्या गावातील मालगुजारी तलावांच्या दुरूस्ती बाबत प्रश्न सिमावर्ती भागाच्या समन्वयकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबंधित विभागास केलेल्या मागणीवर उचित कारवाई करण्याचे पञ दिले आहे.बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी प्रश्न सिमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर,  आणि  समन्वयक गंगाधर प्रचंड,राजेद्र पाटील,राजेद्र पा.शिंदे,व्यंकटराव सिदनोड,चंद्रकांत लोखंडे यांच्या सह विविध गावचे सरपंच व नागरिकांनी चवळवळ सुरू केली आहे.अखंड महाराष्ट्रात राहूनच बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना उत्तम सोई सुविधा मिळाव्यात यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण,विभागीय आयुक्त भापकर,जिल्हाधिकारी डोंगरे यांच्यासह आमदार व अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन सिमावर्ती भागाच्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली होती.व तसेच मालगुजारी तलावांच्या दुरूस्ती साठी खाजगी सचिव पर्यावरण मंत्री मुंबई यांना निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची...

राजू पाटील यांचा लातुर मध्ये सत्कार

महाराष्ट्र राज् ओ.बी.सी.फाऊंडेशनच्या वतिने १२ डिसेंबर रोजी मुंबई येथे पञकार राजु पाटील शिंपाळकर यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान केल्या नंतर या पुरस्काराची भोकर विधानसभेच्या आमदार सौ.अमिताताई चव्हाण यांनी दखल घेऊन दि.१८जानेवारी रोजी शिंपाळा येथे राजी पाटिल यांचा शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी प्रामुख्याने आमदार अमर राजुरकर मा.आ.रावसाहेब अंतापुरकर महिला जिल्हाअध्यक्ष सौ.कळसकर मा.महापौर निर्मलाताई निमकर जि.प.सदस्य संजय बेळगे ,श्रीमती सुंदरबाई मरखले ,तालुका अध्यक्ष शिवाजी पाटिल पाचपिपळीकर ,गणेशराव पाटिल शिंपाळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी समस्या पिक विमा , निराधार प्रश्न , ग्रामीण भागातील  नागरिकांच्या  व इतर  प्रश्नावर  त्यांनी  सोडण्याचे  कार्य करत आहे  याच मुळे  राजू पाटील  हे  नेहमीच  समाज सेवेत  सक्रिय असतात दि.१९ जानेवारी रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या वतिने लातुर येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटिल खांडापुरकर प्रदेशाध...

मुलींच्या शिक्षणासाठी पालकांमध्ये शैक्षणिक जनजागृतीची गरज !

सांगली ( दिलीप वाघमारे) शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या बामणी येथे असलेल्या शाळेत गुणवत्ता पुर्ण मुलीचे शिक्षण या विषयावर दिनांक 19 जानेवारी 2018 रोजी पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बामणी गावच्या कन्या आणि शाळेच्या माजी विद्यार्थी पत्रकार पूनम कुलकर्णी उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पूनम कुलकर्णी म्हणाल्या, शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच खेळाला देखील महत्त्व देणे गरजेचे झाले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हल्ली मैदानी खेळ कमी झाले असून मुले लहान वयातच मोबाईलवर गेम खेळायला सुरुवात करतात. आज बामणी शाळेचे विद्यार्थी जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर खेळ खेळून बक्षीस मिळवित आहेत याचा शाळेची माजी विद्यार्थी म्हणून मला निश्चितच अभिमान आहे. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांने शालेय जीवनात आपल्या आगामी शैक्षणिक तसेच भविष्याच्या दृष्टीने ध्येय निश्चिती करणे गरजेचे आहे. पुढचा विचार न करता केवळ शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी समाजात बेरोजगार आ...

श्रदेय अॕड.बाळासाहेब आंबेडकर व लढावु नेते सुरेशदादा गायकवाड नांदेड साठी एकत्र येण्याची गरज - भास्कर भेदेकर

नांदेड मध्ये आंबेडकरी चळवळी विषयी चर्चा करताना तसेच चळवळ आणि राजकारणासी निगडीत आसलेले कार्यक्रर्ते म्हटल तर प्रथम चळवळीतील लढावु नेतृत्व सुरेशदादा गायकवाड तसेच माझी आमदार भिमराव केराम तसेच स्वकृत्तवावर दोन वेळेस जिल्हा परीषद सदस्य आसलेले दशरथ लोहबंदे या तिघांची नांदेड जिल्यात चांगलीच वचक आहे. कारण सुरेशदादा गायकवाड हे आनेक वेळा निवडनुका लढवल्या त्यांनी 25 ते 30 हाजरच्या आसपास मतदान घेतात तेही स्वबळावर हे फक्त एक विधान मतदार संघातील मतदान आहे. त्यांचे तर नांदेड जिल्यातील संपुर्ण तालुक्यात बरेच कार्यक्रर्ते हाकेला धावुन येण्यासारखे आहेत. संपुर्ण जिल्ह्यात सरासरी त्यांना 40ते 50 हजार मतदार सुरेशदादांना वेळ प्रसंगी नोट आणि ओट ही देतात. तसेच माझी आमदार भिमराव केराम यांचे सुध्दा किनवट मतदार संघात चांगलेच मतदार आहेत. त्यांनी आमदार आसताना शासनाच्या विविध योजनेच्या माध्येमातुन बर्याच जनतेच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत.म्हनुन त्यांच्याही मागे आज 20 ते25 हजार मतदार आहेत.तसेच भारीप बहुजन महासंघाचे माझी.नांदेड जिल्हाध्यक्ष दशरथ लोहबंदे यांना भारीप मधुन बाहेर फेकल्या नंतर सुध्दा दोन वेळेस जिल...

20 जानेवारी रोजी कासराळीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन

बिलोली - (ता.प्र.) सन 1966 रोजी  स्थापना करण्यात आलेल्या  बिलोली तालुक्यातील कासराळी  येथील लाल बहादुर शास्ञी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक २० जानेवारी रोजी शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे.    सर्वात जुनी शैक्षणिक संस्था अशी ओळख  समजल्या जाणाऱ्या कासराळी येथील लाल बहादुर शास्ञी विद्यालयाची मुहुर्तमेढ गणेश शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन प्रा.श्रीराम करडखेडकर यांनी रोवली.तर ती चालवण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा.आ.गंगाराम ठक्करवाड त्यांचे चिरंजीव तथा संस्थेचे कोष्याध्यक्ष लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कासराळी सारख्या ग्रामिण भागात शिक्षणाची  विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन दिली,सदर संस्थेतुन मोठ्या पदावर अनेक विद्यार्थी गेले  असुन त्यात विजय कुमार बुट्टेपवाड हे राज्यउत्पादन विभागात अधिक्षक,दिंगबरराव लोकमनवार नांदेडच्या पाँलटेकनिकल काँलेजात HOD या पदावर,पिंपळे बालाजी शंकरराव शंकरनगरच्या लोककला वानिज्यविज्ञान महाविध्यालयात प्राचार्य या पदावर,अशोक देवकरे हे ...

पाचपिपळी येथे भाजपा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

बिलोली  तालूक्यातील पाचपिपळी येथे दि.13/01/2019 रोजी भारतीय जनता पार्टी संपर्क  कार्यालय चे  उद्घाटन मा. उमाकांत गोपछडे देगलूर -बिलोली विधानसभा  प्रभारी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे  अध्यक्ष माजी सरपंच पडीतराव पाटील होते . प्रमुख पाहुने म्हणुन प्रा.डॉ. बि. एस. पिपळेसर,  भाजपा युवा मोर्चाचे बिलोली तालूका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे , सोशल मीडियाचे तालूका अध्यक्ष सय्यद रियाज अदी होते तर  बळवंत पाटील लूटे ता.सचिव  यांच्या वतिने संपर्क कार्यालय उघडण्यात आले या वेळी गावातील , विजयकुमार पाटील,(माली पा.) पंकज पा.रामपूरे ,संजय पा.रामपुरकर,पिंटु पा. शिरोळे,अनिल पिपळे,भगवान कपाळे, शिवाजी पो.पा.गणेश वाघमारे,चद्रकांत वाघमारे, सतीश धुपेकर,हरिदास पा.बाबु महाराज,दता पांढरे, रावसाहेब पिपळे, व इतर भाजपचे सक्रीय कार्यकर्ते होते.  डी.पी.रामपूरे साहेब अदीच्या उपस्थित कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.

जिल्हास्तरीय चिञकला स्पर्धेत साईप्रसाद लुटे द्वितीय

नांदेड येथे झालेल्या सीएम चषक जिल्हास्तरीय चित्रकला या स्पर्धेत बिलोली तालूक्यातील पाचपिपळी येथील साईप्रसाद बळवंत लुटे या विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर द्वितीय  क्रमांक  मिळाले आहे या पुर्वि सुध्दा चिञकलेत तालूका स्थरावार प्रथम क्रमांक पटकावले होते . क्रमांक  मिळाल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवि पाटील खतगावकर,  युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बिलोली चे  इंद्रजीत तुडमे ,सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष सय्यद रियाज , राजू गादगे, गजानंन दारशेट्टीवार , कुलदीप खेळगे , शरद खंडेराय  यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या

भारतीय संस्कृतीत आई हा एक महत्वाचा घटक - कुलगुरू उद्धव भोसले

बिलोली :- जगातील विकसीत देशांमध्ये विभक्त कुटुंब पद्धती आहे.परदेशात आई,वडील मुलं मुली हे वेगवेगळे राहतात.पण भारतामध्ये एक अशी कुटुंब पद्धती आहे ज्यात आपण आई वडीलांसह राहतो.आणि हिच महत्त्वाची बाब असून बाहेरील देशामध्ये आज भारतीय पद्धत बाळगत असल्याचे पाहावयास मिळते.भारतीय संस्कृती मध्ये आई ही एक महत्वाचा घटक असून आई हीच गुरू आणि आई हिच कुलगुरू आहे.असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू उद्धव भोसले यांनी केले.    ते दि.७ जानेवारी रोजी बिलोली येथे आयोजित सत्कार सुह्रदयी व्यक्तींचा अन् सन्मान माईचा या कार्यक्रमा अंतर्गत सत्यपाल महाराजांच्या सत्यवाणी या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी बिलोली येथील सेवा सहकारी सोसायटीच्या जेष्ठ संचालिका श्रीमती भागिरथीबाई बसवंतराव मुंडकर यांचा कुलगुरू उद्धव भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी आ.वसंतराव चव्हाण, माधवराव पा.शेळगावकर, विक्रम साबणे,व्ही,जे वरवंटक ,गिरीधर पा,डाकोरे , आदींची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आले.तद्दनंतर आयोजन ...

संस्कृतीक संवर्धन मंडळ सगरोळीचे सचिव पंढरीनाथ शिंदे यांच दुःखद निधन

बिलोली-सगरोळी येथिल संस्कृतीक संवर्धन मंडळ या शैक्षणिक संस्थेचे सचिव कै.पंढरीनाथ पाटिल शिंदे यांचे राञी १० वाजताच्या सुमारास ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी ते ७४ वर्षाचे होते. गेल्या ५० वर्षापासुन सगरोळी येथिल संस्कृतीक संवर्धन मंडळाचे संस्थापक चेअरमन कै.कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या छायेखाली संस्थेच्या  शैक्षणिक ,सामाजिक आशा विविध क्षेत्रात दिवस-राञ निष्पृह सेवेत कार्यरत राहुन येथिल हजारो शालेय विद्यार्थी -विद्यार्थीनी पालकवर्ग, शिक्षकवृद ,कर्मचारी ,शेतकरी मजुरवर्ग आशा विविध शैञातील जनतेशी जुळवलेली आदर्श व्यक्तीमत्वाच्या  नात्यांची नाळ आजही ती अविस्मरणिय आहे. निष्पृह आशा  समाजसेवकाच्या   दुःखद निधन वार्तेने चाहात्या वर्गामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आसुन आज दि.०९ जानेवारी रोजी सगरोळी (शारदानगर)येथे दुपारी ०३वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.येथिल कृषी विज्ञान केंद्राचे कृषीतज्ञ व्यंकटराव शिंदे व सहशिक्षक आकाश शिंदे यांचे ते वडील होते.

बिलोली नगर परिषद येथे स्वंयशासन दिवस साजरा

बिलोली -अध्यय अध्पयापनाचे कार्य एक अत्यक महत्वाचे कार्य आहे सदर कार्यकमाचे उद्देश विद्यार्थीचाय व्यक्तिमत्वचा विकास हा शालेय जीवनातच होत असतो त्या अनुषगाने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले शिक्षक या शब्दाचा अर्थ शी/शिस्तप्रिय, क्ष   क्षमता धिष्ठित,क- कर्तव्यनिष्ठ असा होतो सदर संकल्पना विद्यार्थनच्या मनत दृढ़ व्हावी या हेतुने सदर कार्यक्रम घेण्यात आले या शाळेतील सहभाग घेतलेलिया विद्यार्थ्यनी पत्तयेक वर्गावर जाऊं अध्यापनाचे कार्य उत्तमरितिया  पूर्ण केले बिलोली नगर परिषद शाळेत 8 जानेवारी रोजी स्वंशासन दिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच या वेळी तालुका समतादुत शेख आय एम यांनी सर्व विद्यार्थयाना मार्गदर्षन केले व विद्यार्थ्यनी शिक्षकी अध्यापनाचे कार्य व्यवस्थितरित्या पार पाडले व यावेळी शाळे च्या मुख्याध्यापिका एल व्ही तोटोळ व् नसीम बानू, अज़ीज़ बेगम यांनी व्यवस्थित रित्या अध्यापन कार्या चे नियोजन केले व सर्व विद्यार्थ्यनी माहिन सिद्दीकी सदर कार्य क्रम मध्ये उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला या वेळी सामाजिक कार्यकर्ते रियाज़ सिद्दीक़ी शाहेद पटेल...

सनशाईन स्कुल च्या वतिने पञकार राजु पाटिल यांचा सत्कार

बिलोली महाराष्ट्ररत्न पुरस्कृत पञकार राजु पाटिल शिंपाळकर याचा कार्ला येथिल सनशाईन इंटरनॅशनल स्कुल च्या वतिने आज दि. ०८जानेवारी सत्कार करण्यात आला.   येथिल सनशाईन इंटरनॅशनल स्कुलच्या वतिने आज आयोजित कार्यक्रमात नुकतच  महाराष्ट्ररत्न पुरस्कारांने सन्मानित झालेले पञकार राजु पाटिल शिंपाळकर यांचा छञपती शिवाजी महाराज याची प्रतिमा व शाल ,श्रीफळ ,पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  संस्थेचे अध्यक्ष  सत्यनारायण मेरगु हे होते तर या वेळी शाळेच्या प्राचार्य सौ.प्रेमा मेरगु यानी कार्यक्रमास मार्गदर्शन करताना म्हणाले की पञकार राजु पाटलांनी पञकारीता क्षेत्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रात केलेल्या  कार्याची दखल होऊन महाराष्ट्ररत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले हे तालुक्यासाठी अभिमानास्पद असुन या पुढे जाणुन त्यांना राष्ट्रीयस्थरा वरील पुरस्कारांने   सन्मानित करण्यात यावे आशा अपेक्षा  सत्कार प्रसंगी  मार्गदर्शनातुन व्यक्त केल्या .या वेळी मिडीया प्रतिनिधी सय्यद रियाज ,व्यकंट सुरकुटलावार ,शिवकन्या सुरकुटलावार ,लोखंडे...

चित्रकला स्पर्धेत कु.पल्लवी सुर्यवंशी द्वितीय

बिलोली सी.एम.चषक भाजपाच्या वतीने गोदावरी पब्लिक स्कुल शंकर नगर येथे घेण्यात आलेल्या देगलुर -बिलोली विधानसभा तालुकास्तरीय चित्र कला स्पर्धेत कु.पल्लवी धोंडीबा सुर्यवंशी हिने द्वितीय स्थान पटकावले आहे.  आपल्यातील प्रतिभावंत  कलेने यापुर्वी तिने स्काऊट-गाईडचा राज्य पुरस्कार मिळवला  आहे.या मिळालेल्या या यशाबद्दल तिला विधानपरिषदेचे आ.राम पा.रातोळीकर,जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,धोंडीबा कांबळे,यादवराव तुडमे,रवि पा.खतगावकर,इंद्रजित तुडमे  सय्यद रियाज,बळवंत पाटील लुटे,साईनाथ आरगुलवार, सभापती गंगाधर अनपलवार, या मान्यवरांनी प्रमाणपत्र व  सिलवर मेडल देऊन शुभेच्छा दिल्या पल्लवीच्या या यशाबद्दल पत्रकार  बस्वराज वाघमारे,सुनिल जेठे ,मार्तड जेठे,सुनिल कदम,माधव एडके,बाबुराव इंगळे कवी,साहित्यिक,कला,क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.   यशाबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातुन अभिनंदनाचा व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

तेलंगणातील आमदार शकील भाई यांच्या उपस्थितीत होणाऱ सन्मान माई चा कार्यक्रम

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील सन्मान माईचा सत्कार सु -हदयी व्यक्तींचा या कार्यक्रमात महाराष्ट्र आणि तेलंगणातील विविध आमदारासह कुलगुरू आणि जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.महाराष्ट्रातील आणि तेलंगणातील विविध आमदार आणि खासदारांना विविध प्रश्नावर सचेत करणारे प्रश्न सीमावर्ती भागाचे यांच्या समन्वयकांच्या पुढाकाराने सीमावर्ती भागात सन्मान माईचा कार्यक्रम होत आहे. या अंतर्गत सत्यपाल महाराजांची सत्यवाणी आणि मान्यवरांचा सत्कार तसेच सर्व सीमावर्ती भागातील मातांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सात जानेवारी 2019 रोजी सोमवारी बिलोली शहरातील दुर्गामाता मंदिराजवळ होणार आहे.या कार्यक्रमात शिवसेनेचे देगलूर चे आमदार श्रीयुत सुभाषराव साबणे, तेलंगणाचे बोधन मतदारसंघाचे आमदार मोहम्मद शकील भाई अमिर यांच्यासह तेलंगणातील आणि महाराष्ट्रातील विविध आमदारांची उपस्थिती राहणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमात  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले आ...

बिलोलीत आज सी.एम चषक चे बक्षिस वितरण

बिलोली येथील पठे बाबूराव रंगमंच येथे सी.एम चषक चे 12 खेळाचे बक्षिस वितरण होणार आहे या कार्यक्रमांचे अध्यक्ष  मा.श्री .भास्करराव पाटील खतगावकर मा. मंञी तथा  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तर कार्यक्रमाचे उदघाटक आमदार राम पाटील रातोळीकर , भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष  रवि पाटील खतगावकर   व ईतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.  या कार्यक्ररमात 12 खेळातील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणा-या खेळाडूंना बक्षिस वितरण व प्रशस्तीपञ देण्यात येणार आहे. सदरिल कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता पठ्ठे बाबुराव रंगमंच बिलोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायीका योगेश्वरी पेठेकर , नृत्य लावणी सम्राज्ञी  वैशाली पुणे , शाहिर नागोराव वाघमारे यांचा संच , नृत्य स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.   तरी देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघातील सर्व नागारीक, पदाधिकारी, कार्यकर्ते , पञकार बांधव , प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थिती राहण्याचे अव्हान भाजपा युवा मोर्चाचे ता. अध्यक्ष इंद्रजीत तुडमे, प्रतिक अंकुशकर , सय्यद रियाज,  बळवंत पा. लुटे, राजू गादगे , य...

“शेती अवजारे निगा व दुरुस्ती” या विषयी एक महिन्याचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

बिलोली - सगरोळी संस्कृति संवर्धन मंडळ, कृषि विज्ञान केंद्र व कौशल्य विकास कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्दमानाने “शेती अवजारे निगा व दुरुस्ती” या विषयी एक महिन्याचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी झाले. या प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी श्री. राहुल देशपांडे, ब्लु स्टार इंडिया लि. यांनी उपस्थित प्रशिक्षनार्थी व्यवसायात यशस्वी होण्याचे ७ मंत्र सांगितले. तसेच संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन मा.प्रमोद देशमुख यांनी ग्रामीण भागातील तरुणामध्ये कौशल्य विकास करणे आजच्या काळाचे गरज आहे. आणि त्या करिता अशा प्रकारचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्रात घेण्यात येतील असे सांगितले. श्री वैजनाथ बोंबले यांनी प्रास्ताविकात या प्रशिक्षनात टॅक्टर निगा व दुरुस्ती, शेती अवजारे योग्य वापर फवारणी यंत्राची निगा दुरुस्ती,व मोटर रीवांडीग इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. व श्री व्यंकट शिंदे यांनी सूत्र संचालन केले व श्री सचिन कोटनोड यांनी आभार मांडले.ङाङ कार्यक्रमाचे उद्घाटन