मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यानिकेतन शाळेचे शिक्षक नितीन दिगंबरराव कवठाळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

बिलोली:   चेतना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हेबोरगाव येथील विद्यानिकेतन  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इंग्रजीचे ज्येष्ठ शिक्षक कलावंत दिग्दर्शक  नितीन दिगंबरराव कवठाळे वय पन्नास वर्ष यांचे काल रात्री दीड वाजता छातीत दुखत असल्याने ग्रामीण रुग्णालय बिलोली तेथून अश्विनी हॉस्पिटल नांदेड येथे हलविण्यात आले होते तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर यांनी सांगितले. ते अत्यंत मिळावू संयमी स्वभाव असणाऱ्या नितीन कवठाळे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे विद्यानिकेतन मुलींचे हायस्कूल मध्ये 1992 पासून सेवारत होते  पहिले शिक्षक म्हणून विद्यादानाला सुरवात केली.

आ.राम पाटील रातोळीकर यांना मातृशोक

  नांदेड : आ.राम पाटील रातोळीकर यांच्या मातोश्री राधाबाई बालाजी पाटील रातोळीकर (वय-85) यांचे दि.२८ मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास वृद्धाकाळाने निधन झाले.      त्यांच्या पार्थिवावर दि.२९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता रातोळी (ता.नायगाव) येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात आ. राम पाटील रातोळीकर, सून, नातू-पंतु असा परीवार आहे.

उज्जवल भविष्य घडविण्याचे प्रामाणिक पणे प्रयत्न करु- प्रेमा मेरगु

आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह विविध शैक्षणिक सोयी-सुविधा देऊन त्या  विद्यार्थ्यांच्या  भावी जिवनातील  उज्जवल भविष्य घडविण्याचे प्रामाणिक पणे प्रयत्न करु असे प्रतिपादन तालुक्यातील  कार्ला खु.येथिल सनशाईन इंटरनॅशनल इंग्लिश  स्कुलच्या मुख्याद्यापीका  सौ.प्रेमा मेरगु यानी दि.22 मार्च रोजी  आयोजित विद्यार्थी  व पालक मेळाव्यात उपस्थिताना मार्गदर्शन करताना बोलत होते.     या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपिठावर मा.आ,गंगारामजी ठक्करवाड तर प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेडचे  जेष्ठ विधीतज्ञ शंकररावजी बोटलावार, चेअरमन सत्यनारायण मेरगु , पञकार राजु पाटिल शिंपाळकर कार्ला खु.संरपंच सौ.अल्का  देशमुख ,गजानन दावलशेटे आदि प्रमुख  मान्यवरांची उपस्थिती होती.या वेळी सर्वप्रथम  मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन दिप प्रज्वलीत करुन पुढिल कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.या पुढे बोलताना मेरगु  म्हणाल्या की आमच्या या शैक्षणिक संस्थेच  यंदाच प्रथम वार्षिक महोत्सवी वर्षे ...

कचऱ्याची होळी.. गरीबाला पोळी.. कासराळी मध्ये पर्यावरणपुरक होळी साजरी

 ता. प्र कासराळी ता. बिलोली अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बिलोली यांच्यावतीने कासरळी यथे  होळी सणानिमित्त पर्यावरणपुरक होळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाखेचे कार्यकर्ते व युवकांनी कासराळी बाजार पेट परिसराची स्वच्छता केली. सुका कचरा गोळा करून, कचऱ्याची होळी केली. यावेळी युवतींना खोबरांचे हार भेट देण्यात आले. युवतींच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी कर्णकर्कश शिव्यांऐवजी कचऱ्याची होळी.. गरीबाला पोळी.., होळी लहान करा.. पोळी दान करा.., शिव्या देऊ नका.. कटूता घेऊ नका.. यासारख्या नाऱ्यांनी  निवेदनात पर्यावरण संवर्यांनी दिला.यावेळी अंनिस कार्यकर्ते कमलाकर जमदाडे,ऋतुजा जमदाडे, क्षितिजा जमदाडे यांच्यासह गावातील युवक,बळीराम गजलोड,चंद्रशेखर ईबितवर, नवनाथ सोमासे,सतीश मुंगडे, आनंद म्हैसकर,अविनाश म्हैसकर,आकाश म्हैसकर,सोमसे अविनाश,फैजान शेख, उपस्थित होते. शेवटी आभार गजानन मैष्कर यांनी व्यक्त केले.

बिलोली शहरात मटका तेजीत सुरु

बिलोली शहरात मटक्याचा चटका अनेकांना लागला असून, मिलन झोपू देईना अशी अवस्था मजुरदार, शेतकऱ्यांसह हातावर पोट असलेल्यांची झाली आहे. या दोन नंबरच्या प्रकाराकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. बिलोली  शहर हे तेलंगाणा सीमावर्ती असल्याने अवैध धंद्यसाठी माहेर घर बनले आहे. बिलोली  शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदेयांनी थैमान घातले असून, येथील तलाव परीसर बोधन रोड झाडे , झुडपात , ईतर  परिसरात ‘मुंबई कल्याण’ मोबाईल मटकाचे क्रेझ वाढले आहे. सध्या या परिसरात मटका चालविणारे मटका किंग हे भ्रमणध्वनी द्वारे मटक्याचे आकडे काढून लाखो रुपयांचा उलाःढाल बिलोली  शहरात होत आहे. या मटक्यावाल्यानी घरपोच सुविधा आपल्या ग्राहकांना दिली आहे. मटक्याचे नंबर लागले की लगेच पैसे घेण्यासाठी कस्टमर या मटकावाल्यांच्या घरी चकरा मारतात. हे इथेच थांबत नसून मटका लागाला कि अकाउंट डोर to डोर केले जात आहेत. हा सर्रास प्रकार सध्या बिलोली  शहरात चालू असताना  प्रशासन मूगगिळून बसली आहे.  अनेक ठिकाणी शहरातील प्रतिष्टीत लोक मटका चालवीत आहे. मटके प्रमुख ठिकाण...

सगरोळी येथे रोबोटिक्स कार्यशाळेचे आयोजन

सगरोळी ता.२० येथील श्री छञपती शिवाजी हायस्कूल अटल लॕब टिंकरिंग च्या  वतीने रोबोटिक्स वर्कशाॕप चे आयोजन दि.२३ ते २४ मार्च दरम्यान करण्यात आले आहे असून,इंडियन इन्स्टीट्युट आॕफ टेक्नालाॕजी व नॕशनल रिसर्च सेंटर मुंबई यांचे यावेळी विद्यार्थांना मार्गदर्शन लाभणार आहे,अटल टिंकरिंग लॕबचा उद्देश बदलत्या काळातनुसार विद्यार्थांना विज्ञानाबरोबर तंञज्ञानाची माहीती मिळाली तर विद्यार्थांच्या सुप्तगुणांना वाव मिळवून दिल्यास कल्पकता व चिकित्सकता वाढून नविन शास्त्रज्ञ उदयास येउन नवनवे संशोधन होईल. हे दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याने,जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होउन यासंधीचा फायादा घ्यावा.प्रवेश शुल्क रुपये ९००(किटसह) व बिगर किटसह रूपये ५०० भरुन लाभ घ्यावा असे आहवान अटल टिंकरिंग लॕबचे संयोजक अमोल घोगरे यांनी केले आहे.संपर्क(७७०९३८६१२५)

शासन आता महात्मा बसवेश्वर सामाजीक समता"शिवा"पुरस्कार देणार

बिलोली:-   शासनाच्या वतीने यावर्षी 7 मे 2019 अक्षयतृतीये पासुन दरवर्षी महात्मा बसवेश्वर सामाजीक समता"शिवा"पुरस्कार देण्यात येणार आहे असे शिवा संघटनेचे तालुकाप्रमुख महेश पा.हांडे,शिवा विद्यार्थी आघाडीचे तालूकाप्रमुख मनोहर वसमते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. मा.मनोहरराव धोंडे सर यांनी शिष्टमंडळ घेऊन मार्च 2015 मध्ये या मागणी सह इतर 14 मागणी चे निवेदन मुख्यंमत्री मा.देवंद्र फडणवीस व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेब यांना घेऊन चर्चा केली होती त्यानुसार सदरील पुरस्कार देण्याचे निर्णय 5 जुन 2016 रोजी झालेल्या बैठकीत शासनाने घेतला होता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा आदेश दि.08 मार्च 2019 रोजी शासनाचे सहसचिव भा.र.गावीत यांनी काढले आहे25 हजार रोख व संस्थेस 50 हजार रूपये रोख स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र,शाल,श्रीफळ,असे स्वरूप राहणार आहे.शासनाच्या या निर्णयाचे शिवा संघटना बिलोली तालुक्याचे तालुका प्रमुख महेश पा.हांडे,शिवा विद्यार्थी आघाडी तालुकाप्रमुख मनोहर वसमते,तालुकाउपाध्यक्ष शिवा शिव...

बिलोलीत विजेचा लंपडाव सुरू , नागरिक झाले हैराण

बिलोली ,वाढत्या तापमानाने अंगाची काहिली होण्यास सुरुवात झाली असताना आता दिवसा–रात्री केव्हाही वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार होऊ लागल्याने  हैराण झाले आहेत. बिलोलीत तर सकाळी जणू अघोषित लोडशेडिंग लादल्यासारखे रोज सकाळी, दुपारी, राञी वीज गायब होऊ लागली आहे अनेकांची कामेदेखील खोळंबू लागली आहेत. मे महिन्यात ज्यावेळी अत्यंत कडक उन्हाळा असेल, तेव्हाही असाच वीजपुरवठा रोज खंडीत होऊ लागला तर काय होईल, अशी भीती रहिवाशांना वाटत

शाळेत आठवडी बाजारांतून विद्यार्थ्यांनी गिरवले धडे

सांगली (ता जत )पांडोझरी येथील बाबरवस्ती व कोकरेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी  शाळेतील विद्यार्थ्यांनी सहशालेय उपक्रमाअंतर्गत   "चला जाऊ बाजारा" या मेळाव्याच्या निमित्ताने आठवडी बाजार भरविला. विद्यार्थ्यांनी विविध वस्तू व भाजी -पाला  खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला .प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी  शाळेच्या ठिकाणी असणाऱ्या बाजारपेठेत वांगी ,मेथी, शेवग्याच्या शेंगा, ज्वारी, गहू, बाजरी, कांद्याची पात, लसुन, बेदाणे,  कोथिंबीर, शेपू ,पालक ,टोमॅटो,पत्ताकोबी,फुलकोबी,पेरु,शालेय साहित्य विक्री साठी ठेवण्यात आले होते. अशा विविध प्रकारच्या भाज्या विक्रीस आणल्या होत्या . खरेदी  करताना हिशेब ,वस्तुची बारबाकाईने पाहणी याचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले . बाजाराचे उद् घाटन योजना पुजारी व केंदारी चव्हाण व  यांनी केले. मोहन टोणे हे उपस्थित होते.आणि घ्या हो घ्या.... असे म्हणत बाजार भरला विद्यार्थ्यांनी अनेक स्टॉल लावले होते विविध वस्तू व भाजीपाला विक्री करीत खरेदी विक्रीचा अनुभवमुलांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान असावे,...

कंधार मराठा महासंग्राम संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संभाजी पोवळे

शिराढोण:-शुभम डांगे                                             कंधार तालुक्यातील मराठा महासंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक दि १३.०३.२०१९   संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बांदेकर यांच्या निवासस्थानी कंधार तालुक्यातील सर्व मराठा महासंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली बैठक सुरू होण्याअगोदर सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख बजरंग पाटील हरकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कंधार तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची एक व्यापक बैठक व संघटनेच्या कार्यकर्त्याचा कार्यअहवाल यावेळेस घेण्यात आला त्यानंतर कंधार मराठा महासंग्राम संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते संभाजी पाटील पवळे यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देताना संघटनेचे मर...

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला आवाज फौंडेशनची मदत

  दोन मुले शिक्षणासाठी घेतली दत्तक अर्धापुर तालुक्यातील सावरगाव येथील आंदोलक मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या कुटुंबाला  मुबंई येथील आवाज फौंडेशनच्या वतीने  आर्थिक मदत देऊन त्यांच्या दोन मुलांच्या  शिक्षणाची जबाबदारी  फौंडेशनच्या अध्यक्षा सुषमा मोर्या यांनी घेतली आहे.यावेळी त्यांच्या घरी जावुन मदतीचा हातही दिला यावेळी बिलोलीचे सामाजीक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक साईनाथ अरगुलवार हे उपस्थित होते. सावरगाव ता.अर्धापुर येथे काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गणपतराव   बाबाराव आबादार यांनी बलिदान दिले होते. त्यांना पत्नी व दोन मुले असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.दोन मुलांच्या शिक्षणासाठी मुबंई येथील आवाज फाऊंडेशनच्या सुषमा मोर्या यांनी त्यांची दोन मुले व्यंकटेश आबादार, व धनश्री आबादार यांना दत्तक घेऊन  पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी घेतली व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून  धनादेश  दिले. यावेळी आवाज फौंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष छगन पाटील सांगोळे,मनकर्ण आबादार,यशोदा कोळी,वंदना सांगोळे, कैलास कोळी,गज...

घरी आभ्यास करुन लक्ष्मी बनली पी.एस.आय

 बिलोली  एम.पी.एस.सी.परिक्षेसाठी कुठेही क्लासेस न लावता स्थितीची जाणीव ठेवून प्रचंड आत्मविश्वास जिद व चिकाटीच्या जोरावर  अभ्यास करुन बेळकोणी ( बु) ता.बिलोली येथिल लक्ष्मी प्रल्हाद डाकेवाड हीने एम.पी.एस.सी.परिक्षेत पि.एस.आय.पदासाठी ओ.बि.सि.प्रवर्गातुन राज्यात दुसऱ्या क्रमांकाने ऊत्तीर्ण होवुन यश मिळविल्याने बिलोलीत भव्य असा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील या विद्यार्थीनीने प्रशासकीय सेवेचे हे घवघवीत यश संपादन केल्याने   बिलोली पोलिस स्टेशन येथे पुरोगामी पञकार संघ व शहर वासीयांच्या वतीने लक्ष्मी डाकेवाड हिचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी पोलिस निरीक्षक भगवान धबडगे,पुरोगामी पञकार संघाचे अध्यक्ष मारोती भालेराव,कार्याध्यक्ष सुनिल कदम,माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे, नगरसेवक प्रकाश पोवाडे,पञकार रत्नाकर जाधव,संजय जाधव, शेख पाशाभाई,अबरारबेग,यांच्यासह अनेकांनी शाल पुष्पहार देऊन डाकेवाड हीचा सन्मान केला.यावेळी  मारोती भदरगे, सय्यद  रियाज सुनिल जेठाळकर,शेख सुलेमान .  प्रल्हाद वाघमारे.   लालबा  गोणेकर .सुरेश देवकरे. कर्मचारी सोनकांबळे...

अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेच्या तालूका अध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी तर सचिवपदी मार्तंड जेठे

बिलोली : तालुका प्रतिनिधी अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी, सचिव मार्तंड जेठे,कार्याध्यक्षपदी सुर्यकांत गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे संघाचे जिल्हाध्यक्ष टी. एम वाघमारे यांनी घोषित केले आहेत. ययावेळी जिल्हा सचिव बी.पी.गायकवाड,नायगावचे तालुका अध्यक्ष पी.एम.काेतेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर परिषदेची बैठक मंगळवार दि. १२ मार्च राेजी परिषदेचे जिल्हाध्यक्ष टी. एम.वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका केंद्र बिलोली येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत परिषदेच्या नियम व अटी विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक नायगाव तालुका अध्यक्ष पी. एम.काेतेवार यांनी केले. सखोल चर्चेअंती बी. पी.गायकवाड यांनी सुचविल्याप्रमाणे अध्यक्षपदी कुलदीप सुर्यवंशी तर सचिवपदी मार्तंड जेथे, कार्याध्यक्ष पदी गायकवाड एस.एन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आभार प्रदर्शन नवनियुक्त तालुका अध्यक्ष कुलदीप सुर्यवंशी यांनी केले

प्रधानमंत्री उज्वल गॅस योजने अंतर्गत होणारी ग्राहकांची लूट थांबवण्याची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

शिराढोण:-शुभम डांगे कंधार तालुक्यातील बारूळ येथे प्रधानमंत्री उज्वल गॅस योजनेअंतर्गत मे. मनार एजन्सी धारकाकडून गॅस घेणाऱ्या नागरिकाकडून ५०० ते १५०० रुपये घेऊन नागरिकांची आर्थिक लूट होत आहे ते तात्काळ थांबवण्याच्या मागणीचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे पण राज्य शासनाने गोरगरीब जनतेला राज्य धुर मुक्त करण्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी प्रधानमंत्री उज्वल गॅस योजने अंतर्गत गॅस व शेगडी घेण्यासाठी १०० रुपयांमध्ये उपलब्ध असताना देखील बारूळ येथे में. मनार इंडियन सर्विस एजन्सी धारकाकडून बारूळ परिसरातील औराळ नंदनवन चिखली सावळेश्वर मंगल सांगवी बामणी धर्मापुरी या गावातील जनतेकडून प्रत्येकी कनेक्शन व गॅस टाकीसाठी त्यांच्याकडून ५०० ते १५०० रुपये घेऊन प्रधानमंत्री उज्वल योजना अंतर्गत येणारे गॅस दिले जात आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वल गॅस योजना सन २०१६ पासून सुरू केली आहे या योजनेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील कुटुंब व अंत्योदय अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी जंगल प्रभावित कुटुंब अति मागास प्रवर्ग नदी का...

महिलांना फक्त चुल आणि मुल न करता सर्व क्षेत्रात अग्रभागी राहावे-ललिता पालकर 

तासगाव! जरंडी येथील अशोकनगर जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या . कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा जरंडी च्या मुख्याध्यापिका भक्तीप्रिया जाधव या होत्या त्याच बरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ललिता पालकर सरपंच जरंडी या होत्या . कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक अशोकनगर शाळेच्या मुख्याध्यापिका सविता मोहन माने यांनी केले. शाळेच्या स्थापनेपासून शाळेच्या प्रगतीची वाटचाल स्पष्ट केली, विद्यार्थीनींनी विविध थोर महिला यांच्या वेशभूषा केल्या होत्या .यामध्ये जिजाऊ, सावित्रीआई फुले, झाशीची राणी ,मदर तेरेसा,आनंदीबाई जोशी,किरण बेदी अशा भूमिका साकारण्यात आल्या होत्या . आरती काळे व समिक्षा शिंदे या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. फक्त मुलींवर अॉपरेशन केल्या बद्दल.लतिका संतोष शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.ललिता पालकर यांनी विद्यार्थी प्रगती बाबत समाधान व्यक्त करत महिलांना फक्त चुल आणि मुल न करता सर्व क्षेत्रात अग्रभागी राहण्याचे आव्हान केले तस...

AIMIM च्या तालूका अध्यक्षपदी साजीद कुरेशी

बिलोली : मजलीस इत्ताहुदीन मुस्लीमन (AMIM)च्या बिलोली तालुका अध्यक्षपदी चौथ्यांदा फेर निवड जिल्हाध्यक्ष फेरोज लाला यांनी दि. 9 मार्च रोजी नांदेड येथे केली . कुरेशी हे सत्तत चार वर्षापासुन एम. आय. एम.पक्ष वाढविण्याचे काम  तालुक्यात केले.तसेच त्यांनी तळागाळातील प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले व तसेच विद्यार्थ्यांचे प्रश्न शैक्षणिक सामाजिक, शेतकऱ्यांचे प्रश्न यांच्यासह अनेक प्रश्नांसाठी त्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार करून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम केले व विविध ठिकाणी आपली शाखा उघडली यामध्ये हुंनगुंदा.मुतन्याळ .कार्ला (बु).कार्ला (खुर्द) सावळी,अर्जापुर ,केसराळी.आळंदी. अटकली येथे एम. आय. एम.ची शाखा स्थापना करण्यात आले.पक्षाचे ध्येय धोरणानुसार विविध सामाजिक उपक्रम राबिवले आहे. बिलोली कामाची दखल घेवुन जिल्हाध्यक्ष फेरोज लाला यांनी साजीद कुरेशी यांची बिलोली तालुका अध्यक्षपदी फेर निवड केल्याची नियुक्ती पञक 9 मार्चे रोजी नांदेड येथे कार्यालात देण्यात आले.फेरनिवड झाल्याबद्दल तालुक्यातील सर्व एम.आय एम चे पदाधिकारी व मिञ परीवाराकडुन अभिनंदन होत आहे.

नंदकुमार पोतदार यांच दुःखद निधन

बिलोली ता.प्र.  येथिल ममता शिक्षक पतपेढि येथे लिपीक पदावर कार्यरत आसलेले कै.नंदकुमार सायलु पोतदार यांच आज दि. ११ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने राहात्या घरी  देशमुख नगर बिलोली येथे दुःखद निधन झाले.मृतु समयी ते ४७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुली व एक मुलगा आसा परीवार आहे.अंत्यविधी उद्या सकाळी दि.१२ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता बिलोली येथे करण्यात येणार आहे

बिलोलीत ३४४५ बालकांना पोलीओ लसिकरण डोस पाजवण्यात आले

 शहरामध्ये पोलिओ लसिकरण विशेष मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळाला.लसिकरणासाठी ३७८९ बालकांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.पैकी ३४४५ बालकांना पोलीओ लसिकरण डोस पाजवण्यात आले.एकूण ९०.९२% लसिकरण पुर्ण झाल्याची माहीती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाँ नागेश लखमावार यांनी दिली.     राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा बिलोली ग्रामीण रुग्णालय शुभारंभ वैद्यकिय अधिक्षक डाँ नागेश लखमावार यांच्या हस्ते करण्यात आला.बिलोली शहरातील ग्रामीण रुग्णालय बिलोली(५६३),मुलींची उर्दू शाळा बिलोली(७०६)नगर परिषद प्राथमिक शाळा(४२२)पंचायत समीती बिलोली(४५३)समाज मंदिर डाँ आंबेडकर नगर बिलोली(४९८),देशमुख नगर बिलोली(४३४)जनक्रांती वाचनालय गांधीनगर बिलोली(३७५)यासह जुना बसस्थानक बिलोली,नवीन बसस्थानक बिलोली व फिरते मोबाइल पथक वर ०-५ वयोगटातील,बाळ० ते ५ वयोगटातील नुकतेच जन्मलेले व यापूर्वी पाजण्यात आले अशा बालकांना लस देण्यात आले.        ग्रामीण रुग्णालयामध्ये डाँ सतीश तोटावार, मौलाना अहेमद बेग ईनामदार,संपादक सिद्धार्थ तलवारे, साईनाथ आरगुलवार, जेष्ठ पञकार ए.जी.कुरेशी,रत्नाकर जाधव,शेख...

शिवाजीनगर शाळा स्वच्छ शाळा, सुंदर शाळा व आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित

   तासगाव:  सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक पुरस्काराचे मंगळवारी शानदार सोहळ्यात सांगलीमध्ये वितरण संपन्न झाले. सांगली जिल्हा परिषदेचे  अध्यक्ष .संग्रामसिंह देशमुख,शिक्षण सभापती  तमन्नागौडा रवी पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिजीत राऊत,शिक्षणाधिकारी सौ.निशादेवी वाघमोडे मॅडम यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.           स्वच्छ,सुंदर व आदर्श शाळा पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले पहिली ते पाचवी द्विशिक्षकी गटामध्ये शिवाजीनगर( सावळज)जिल्हा परिषद शाळेने चौथा क्रमांक पटकावला आहे.शिवाजीनगर शाळा ही 48 घरे असणारी छोटी वस्ती शाळा असून शैक्षणिक उठावात मात्र या शाळेने मोठी कामगिरी केली आहे आतापर्यंत इथल्या पालकांनी अनेक कामे शैक्षणिक उठावातून केली आहेत.पालकांचे या शाळेस नेहमीच सहकार्य लाभले आहे.पालकांना शाळेविषयी प्रेम व आपुलकी आहे या आपुलीमुळे शिक्षक व पालक यांचे सुंदर नाते निर्माण झाले आहे यातूनच शाळेने आतपर्यंत दहा लाखांच्या वर शैक्षणिक उठावातून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण केल्या आहेत. शाळेस ...

वंचित बहुजन आघाडीच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी वलीओद्दीन फारुखी यांची निवड

बिलोली , फुले,शाहु,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व बहुजन समाजातील जनते च्या अडी अडचनी सोडवणारे तसेच समाज कार्यात पुढाकार घेवुन समाज कार्य करणारे व बिलोली परीसरात पत्रकारीतेत वेगळी ओळख असलेले  वलिओद्दीन  फारूखी यांची वंचित बहुजन आघाडीच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी निवड नुकतीच करण्यात आली काल झालेल्या शासकीय विश्राम गृह येथे प्रमुख उपस्थिती नांदेड  लोकसभा उमेदवार यशपाल भिंगे व  जिल्हा अध्यक्ष  शिवाजी गेडेवाड,  सोशल मिडिया प्रमुख सोनूभाऊ , एम आय एमचे डॉ. हकीम खान यांच्या उपस्थित निवड करण्यात आली या वेळी  .भारीपचे बिलोली तालूका अध्यक्ष धम्मदीप गावंडे , धम्मदीप जाधव , संजय जाधव , संजय पोवाडे यांच्या सह अनेक जन उपस्थित होते.

मोठ बनायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही- शेठ रतिलाल गोसलिया

मोठ बनायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही.असे मत मिरज येथील शेठ रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनिअर काॅलेज ऑफ एज्युकेशन प्राचार्य गौतम शिंगे यांनी व्यक्त केले.                पांडोझरी (ता जत) येथील बाबरवस्ती जिल्हा  परिषद प्राथमिक मराठी शाळेत कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शिंगे गौतम होते स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले . सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले .पुलवामा येथील शहिद झालेल्या केंद्रिय राखीव सीमा दल(सी.आर.पी.एफ)जवानानां श्रद्धांजली  वाहण्यात आली. शाळेची माजी विद्यार्थीनी शालू गडदे हिने देशभक्ती गीत सादर  कार्यक्रमासाठी अधिव्याख्याता प्रा उत्तम पांढरे, अधिव्याख्याता प्रा विकास माने विशाल खाडे यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सविता मोटे यांनी सुद्धा शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केला. कार्यक्रमासत्कार प्रा उत्तम पांढरे, प्रा विकास माने,दिलीप वाघमारे, आप्पासो गडदे, सविता मोटे, विशाल खाडे ,शोभा बाबर ,कृष्णा मोटे, राजू गडदे मिस्त्र...

श्यामराव मरिबा जेठे यांचे निधन

बिलोली येथील साठेनगर मध्ये राहणारे  श्यामराव मरिबा जेठे वय 55  आज दिनांक 05 मार्च 2019 रोज मंगळवार रोजी सकाळी ठिक 10:05  यांच अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.त्यांचा एक मुलगा ,तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे . आज सायंकाळी 5 वाजता बिलोली - बोधन या मार्गावरील  लघूळ रोडवरील समशान भुमित अत्यविथी होणार आहे . ते बिलोलीनगर परिषदेचे  माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांचे बंधु होते