शिराढोण- (शुभम डांगे) हळद या पिकाची लागवड करत असताना शेतकऱ्यांनी दहासुत्रीचा अवलंब करावा, आज हळदीला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. हळदीपासून सौंदर्य प्रसाधनाच्या साहित्याबरोबर सर्व प्रकारच्या कर्करोगाचे निदान करण्याचे घटक हळदीपासून मिळत असल्याने येणाऱ्या काळात हळद उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. पण शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यानंतर विक्रमी हळदीचे उत्पादन मिळू शकते असे मत कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. देवीकांत देशमुख यांनी हळद लागवड मार्गदर्शन मेळाव्यात शेतकऱ्यांना केले. कंधार तालुक्यातील शिराढोण येथे उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवाडा 2019 जनजागृती अभियानाअंतर्गत शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन जिल्हा कृषी अधीक्षक रवीकांत चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती माधवराव पांडागळे, तंटामुक्त अध्यक्ष गणपतराव देवणे, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. देवीकांत देशमुख, कंधार तालुका कृषी अधिकारी आर.एम. देशमुख, मंडळ कृषी अधिकारी अंबुलगेकर, कृषी सह...