मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भिमराव क्षिरसागर यांनी TRS कडून निवडणूक लढवावी

बिलोली (प्रतिनिधी):                  भाजप सेना युतीचे गणित न जमण्यासारखे असल्याने भाजप चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भिमराव क्षिरसागर हे काढता पाय घेत जनतेच्या इच्छेप्रमाणे टीआरएस पक्षाकडून बिलोली देगलूर मतदार संघात निवडणूक लढावे अशी इच्छा जनसामान्यातून बोलले जात असल्याने ते टीआरएस पक्षाकडून लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांचे निकटवर्तीय डॉ. लक्ष्मीकांत कलमूर्गे यांच्याकडून कळाले आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच करणार असल्याचेही सांगितले आहेत. भीमराव क्षिरसागर यांच्या या एन्ट्री ने टीआरएस पक्षाचे पारडे मात्र नक्कीच जड होईल आणि भीमराव क्षीरसागर हे विजयी होतील, यामुळे चौरंगी लढतीची शक्यता वाटत आहे.    टीआरएस पक्षाने तिकीट दिल्यास त्यांचा विजय निश्चित होईल तसेच सेना भाजपचे नाराज कार्यकर्ते पण त्यांना मदत करतील आणि त्यांना निवडून आणण्यास प्रयत्न करणार असल्याचेही जनमानसात ऐकावयास मिळत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून भाजप पक्षात कार्य करीत असून त्यांच्या युतीमुळे शिवसेनेच्या सुभाष साबणे याना तिकीट दिले असल्याने , जनतेच्या इच्छेप्रमाणे ...

‘मुलामुलींना समान वागणूक दिली तरच स्त्री-पुरुष समानता’-सौ.सुजाता पोहरे

नांदेड - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये पथनाट्य सादरीकरण करण्यात येत आहे. सविस्तर वृत्त असे कि, बार्टी मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर समतादूतांमार्फत जातीयता निर्मूलन ,स्त्री-पुरुष समानता,या विषयावर पथनाट्य सादरीकरण 16 सप्टेंबर ते २० सप्टेंबर पर्यंत करण्यात येत आहे .त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी व सर्व समतादूत प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा परिषद हायस्कुल ,ग्रामपंचायत ,निवासी शाळा ,माध्यमिक व उच्चं माध्यमिक विद्यालये ,महाविद्यालये इ.ठिकाणी पथनाट्य सादरीकरण करण्यात येत आहे .  स्त्री-पुरुष समानतेसाठी घरातील दोघांनीही पुढाकार घेणे आवश्यक असून त्याची सुरुवात घरापासून करावयाची असते व केवळ पुरुषांना विरोध केल्याने ही समानता होणार नसून त्यासाठी महिलांनीही जबाबदारी ओळखली पाहिजे. मुलामुलींमध्ये भेद न करता समान वागणूक दिली तरच स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने होईल असे वक्तव्य सौ.सुजाता पोहरे यांनी केले. सदर पथनाट्याच्या माध्यमातून जातीयता निर्मूल...

अण्णाभाऊ साठे डिजिटल अभ्यासिकेत ग्रंथप्रदर्शन व पुस्तक वाटप

बिलोली (सय्यद रियाज )बिलोली येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डिजिटल अभ्यासिका येथे अनेक पुस्तके व ग्रंथ भेट देऊन अनुप अंकुशकर नगरसेवक यांनी सामाजिक बांधुलकी जपली यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्मान झाले असुन फुले शाहु आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा पुढे चालविण्याचा काम हाती घेतल्याचं दिसुन येत आहे बिलोली शहरातील हा असा एकमेव उपक्रम संपुर्ण नांदेड जिल्हात आदर्श अभ्यासिका म्हणुन ओळखली जात आहे अनेक प्रकारचे पुस्तकांचा संच हा विद्यार्थांना जिवनदायी ठरणार आहे यावेळी अनुप अंकुशकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले व उद्याचे कलेक्टर,वकील,इंजिनीअर होण्यासाठी शुभेच्छा दिले व अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे अाहे असे सांगितले मोबाईलचा वापर कमी करण्याचे संकेत ही यावेळी  यांनी उपस्थितांना केले व बिलोली शहर हे दारू व तंबाखुपासुन व्यसनमुक्त व्हाव असं आवाहन समस्त तरूण,वयस्कर नागरीकांना  केलं आणि अण्णाभाऊ साठे डिजिटल अभ्यासिकेचे सर्व सदस्य राजेश कुडके,अजय कुडके, सतिष कुडके, भरत कुडके , अविनाश चिल्लारे,राहुल वीर,विकास भालेराव, अंकुश कुडके,चंद्रकांत कुडके यांनी अनुप अ...

२१ सप्टेंबर रोजी रयत क्रांती संघटनेचा २ रा वर्धापनदिन -पांडुरंग शिंदे

!    रयत क्रांती संघटनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनी मागली दोन वर्षांतील संघटनेचा आढावा (Flasback) डोळ्यासमोर जात असताना झालेल्या कार्याचा,उभारलेल्या संघटनाचा,केलेल्या संघर्षाचा एक धावता पट उभा राहतो.   आदरणीय ना.सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेतील ही दोन वर्षे खऱ्या अर्थाने माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला समृद्ध करत गेली. सदाभाऊ च्या सावलीत आपल्या संघटनेचा वटवृक्ष फुलता त्याची पाळेमुळे आपल्या ग्रामीण-शहरी अथवा संबध महाराष्ट्र राज्यात आता खोलवर रुजली आहेत.असेच पुढेही अनेक फांद्यांच्या मार्फत बहरत राहतील आणि रंजल्या गांजलेल्या आपल्या सावलीत आधारवड ठरेल यांची निश्चित खात्री वाटते.      संघटनेच्या वतीने मला समाजातील सर्व स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आणि भाऊंनी आणि संघटनेणी टाकलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणाने निभावण्याची दक्षता मी घेतली व घेत राहणार या बाबत शंका नसावी. आपण सर्वजण मिळून उदात्त कार्यासाठी उभारलेल्या ,निरपेक्ष हेतूने चालेल्या संघटनेच्या कार्याचा एक भाग,एक धागा आहोत याचा गर्व वाटतो,अभिमान वाटतो तसेच ना.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वा...

सरदार वल्लभभाई पटेल पुरस्काराने राजु पाटिल सन्मानित

बिलोली ता.प्र. आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या व ब्रिक्स मानव अधिकार मिशन यांच्या वतिने देण्यात येणारा यंदाचा जाहिर सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार आज दि.१७ सप्टेंबर रोजी बिलोलीचे पञकार राजु पाटील याना लातुर येथे आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात आले. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानव अधिकार मिशन यांच्या वतिने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा यंदाचा सरदार वल्लभभाई पटेल पुरस्काराने बिलोलीचे पञकार राजु पाटील शिंपाळकर याना आज दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन प्रविन मंगल कार्यालय लातुर येथे आयोजित कार्यक्रमात  मनोजकुमारजी तोमर-राष्ट्रिय अध्यक्ष भारतिय नरेंद्र मोदी संघ दिल्ली , प्रदिप पाटिल खंडापुरकर राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.भ्र.नि.स., डाँ.कविता रायजादा महिला राष्ट्रीय अध्यक्षा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित राजु पाटील यांना सन्मान पञ,स्मृती चिन्ह ,देऊन सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुर्वी ते महाराष्ट्र  ओबीसी फांउडेशनच्या वतिने म...

बालाजी बच्चेवार यांच्या "चाय पे चर्चा" कार्यक्रमाची नायगावात झाली मोठी चर्चा

नायगाव - भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांनी  नायगाव येथे "चाय" पे चर्चा  व हमालांना ब्लांकेट वाटप , ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची नायगावात झाली मोठी चर्चा बालाजी बच्चेवार यांनी बोलतांना असे म्हणाले की गेल्या 26 वर्षा पासून मी भाजप पक्षात चांगल्या प्रकारे काम केले, भाजप पक्षा कडे मी उमेदवारी मागीतली आहे. माझे विधानसभेत गाठी भेटी झालेत मी पुर्ण तयारीत आहे भावनीक होऊन म्हणाले की मला आपला साथ हवा  असे नागरिकांना अव्हान केले मी निवडून आल्यास नायगाव विधान सभेचा चहराच बदलेन , येथे रोजगार उपलब्ध नाही, रस्ते नाही अनेक समस्या येथे आहेत, .  "प्लास्टीक मुक्त महाराष्ट्र '' अभियान अंतर्गत कापडी पिशवी वाटप , चाय पे चर्चा , नायगाव येथील ग्रामीण रूग्णालयात फळ वाटप , कार्यक्रम हेंडगेवार चौक नायगाव येथे दुपारी पार पडले या वेळी भाजपचे तालूका अध्यक्ष  धनराज शिरोळे, सरचिटणीस व्यंकटराव पाटील चव्हाण,  मेहताब अली, शिवाजी वडजे ,शेख वली सुरज मोरे, अवकाश पाटील धूप्पेकर, रा...

देगलूर- बिलोली विधानसभेत कॉग्रेस कडून जगदिश कदमचा नवा चेहरा?

बिलोली (सय्यद रियाज)  लोकसभेच्या निकालानंतर राज्यात ओढ लागली आहे ती विधानसभेच्या निवडणुकांची. येत्या काही दिवसात या निवडणुका होऊ घातल्या आहेत.  देगलूर - बिलोली  विधानसभेच्या पूर्व तयारीची चुणुक कॉग्रेसचे जगदिश कदम यांनी दाखवली आहे .  विधानसभेची उमेदवाराकडून तयारी चालू आहे देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघा मध्ये कॉग्रेस कडून अनेकांक ईच्छूककांनी मुलाखती दिल्या , तर नायगाव तालूक्यातील , पिंपळगाव येथील यूवा उमेदवार कॉग्रेसचे कार्यकर्ते व  माजी मुख्यमंञी अशोक चव्हान यांचे कट्टर समर्थक म्हणुन परिचित आहेत  यांनी विधानसभेत मोर्चे बांधानीला जोरदार तयारी चालू केली. गेल्या अनेक वर्षा पासून समाजकार्य राजकारणात सक्रिय आहे ते समाज कार्यकरत आहे. 1999 पासून कॉग्रेस  पक्षाच्या माध्यमातून कार्यकरत आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणून लढवण्यास तयार असल्याचे मराठी लाईव्ह न्यूज शी बोलतांना सांगितले.

गोरगरीबांच्या हिताची कामे करण्यासाठी बालाजी बच्चेवार यांचे हात बळकट करा - शिवाजी पाटील वडजे

 नायगाव-  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथे आयोजित चाय पे चर्चा या कार्यक्रमात  नायगाव  येथील उद्योजक शिवाजी पाटील वडजे यांनी आपले मनोगत मांडले. यावेळी व्यासपीठावर नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेते बालाजी बच्चेवार भाजपा तालुकाध्यक्ष धनराज शिरोळे जिल्हा चिटणीस अवकाश पाटील धुपेकर तालुका सरचिटणीस व्यंकट पाटील चव्हाण अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शेखवल्ली मेहतफ भाई विस्तारक सुरेश मोरे गजानन चव्हाण चव्हाण आदी कार्यकर्ते सहभागी होते. पुढे बोलताना शिवाजी पाटील वडजे यांनी  या भागातील गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते बालाजी बच्चेवार यांना विधानसभेत पाठवण्याचे आव्हान केले आहे. नायगाव उमरी धर्माबाद  विधानसभा मतदारसंघात विकास कामे खोळंबली असून मूलभूत गरजा रस्त्याची गैरसोय व या भागातील सिंचनाचा प्रश्न स्थानिक आमदारांनी याकडे कानाडोळा करीत या भागाचा विकास खंडित केला आहे, या विकासाला चालना देण्यासाठी बालाजी बच्चेवार यासारखे खंबीर नेतृत्व ची गरज आज त्या भागाला आहे बालाजी बच्चेवार यांनी नायगाव जिल्हा परि...

भिमराव क्षिरसागर यांना भाजपने उमेदवारी दिल्यास देगलूर विधानसभेचे चिञ बदलणार

बिलोली - लोकसभेच्या निकालानंतर राज्यात ओढ लागली आहे ती विधानसभेच्या निवडणुकांची. येत्या काही दिवसात या निवडणुका होऊ घातल्या आहेत. तत्पूर्वीच राज्यातील युती व आघाडीने आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. देगलूर - बिलोली  विधानसभेच्या पूर्व तयारीची चुणुक भिमराव क्षिरसागर यांनी दाखवली आहे .  विधानसभेची उमेदवाराकडून तयारी चालू आहे देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव असल्याने उद्योजक भिमराव क्षिरसागर यांनी भाजप कडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गावा गावात ऐकवयास मिळत आहे. 2014 मध्ये निवडणून लढवली होती पन  त्यांचा पराभव झाला. भिमराव क्षिरसागर यांना उमेदवारी दिल्यास येथे तर निवडून येईनार आहे पन ,नांदेड ,परभणी , हिंगोली अदि ठिकाणातील उमेदवारांना मुस्लिम व दलितांच्या मतामध्ये वाढ होणार आहे. मतदार संघात क्षीरसागर यांची लोकप्रियता दिवसेदिवस वाढत असुन विरोधकांना ही धोक्याची घंटा असल्याचे दिसते. भाजपातील अनेक मंडळींनी त्यांना पाठींबा दर्शविला असुन त्यांना उमेदवारी मिळाल्यास निश्चितच देगलुरमधुन विधानसभेवर कमळ पाठविले जाईल असे अनेक कार्यकर्त्य...

संदीप भुरे यांच्या गीताचे सिनेअभिनेते कमलाकर सातपुते यांच्या हस्ते पंढरपुरात विमोचन

बिलोली तालुक्यातील   आदमपुर येथील प्रा. संदीप भुरे यांच्या ; पोर पोरी हे नाचु  लागले ;  गजमुख गाणराया ह्या व्हिडीओ गीताचा लाॅन्चिग सोहळा पंढरपुर येथे प्रजेन्ट दैनिक दामाजी एक्सप्रेस यांनी केलेले आहे...या गीताचे निर्माता दिग्दर्शक विशाल पाटील सर सहदिग्दर्शक अमोल वाघमारे ,ध्वनीमुद्रक प्रकाश मुंबई व हिंदी चित्रपटाचे संगीतकार प्रशांत सिंग मुंबई यांनी   या गिताला संगीत संयोजन लाभले आहे व पार्श्वगायक सिद्धार्थ गजघाटे यांनी गायले आहे.. पोर पोरी हे नाचु लागलेहे गणरायाचे गीत सर्व रशिक श्रोत्यांना नक्कीच आवडेल या बद्दल गुरुवर्यप्रा.बाबुराव उप्पलवार सर ,प्रा.भालेकर सर प्राचार्य मारोती पिन्नरवार जाफर आदमपुरकर निर्माता दिग्दर्शक दत्ताभाऊ जवळगे कर, माधव जाधव,सर.सुरेश जाधव ,शितलकुमार माने,दिलिप भुरे , आईन्लावार सर , प्रा.सुनिल भुरे , उपसरपंच काशिनाथ वाघमारे ,पत्रकार रियाज सय्यद  ,आदिंनी अभिनंदन केले आहे....

आज नायगाव येथे "चाय" पे चर्चा, खा. प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती

नायगाव - भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त नायगाव येथे "चाय" पे चर्चा  होणार आहे  या कार्यक्रमासाठी  जिल्हाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रमुख  उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे सक्रीय नेते मा.बालाजी बच्चेवार यांच्या वतीने करण्यात येणार  आहे.  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा सप्ताह साजरा होत आहे. या मध्ये "प्लास्टीक मुक्त महाराष्ट्र ''अभियान अंतर्गत कापडी पिशवी वाटप , चाय पे चर्चा , नायगाव येथील ग्रामीण रूग्णालयात फळ वाटप , प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवासा निमित्त वाटसब वर चांगल्या प्रकारे कामकरणा-या  ग्रुप अँडमीन चे बँग देऊन सत्कार, व हमाल यांना बिल्यांकेट वाटप ईतर कार्यक्रमाचे आयोजन चे ठिकाण हेंडगेवार चौक नायगाव येथे आज दि.17 /09/2019 रोजी  मंगळवार सकाळी 11 वाजता होणार आहे तरी नायगाव विधानसभा मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीकांनी उपस्थित राहण्याचे अव्हान नायगाव विधान सभचे नेते बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

महापरीक्षा,महापोर्टल विरोधात जनआक्रोश महामोर्चा.

नांदेड:(जाफर आदमपूरकर ) नांदेड शहरात महापरीक्षा, महापोर्टल विरोधात जनआक्रोश महामोर्चा लाखो सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींचा आज दि. १४ सप्टेंबर, २०१९ मोठ्या बेरोजगार संख्येने आयटीआयआयटीआय पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.  सध्याची पोलीस भरतीची तुटपुंज्या जागांची जाहिरात रद्द करून तेरा हजार पदभरती करावी. महापरीक्षा महापोर्टल रद्द करून ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी. तलाठी व तत्सम पद भरतीची योग्य ती चौकशी करण्यात यावी. त्या त्या विभागात रिक्त असणाऱ्या जागा त्वरीत भरण्यात याव्यात अशा सर्व मागण्या घेऊन लांखोच्या संख्येने बेरोजगार तरूण- तरूणी रस्त्यावर उतरले होते. 'जुलमी जब जब जुल्म करेगा सत्ता के हत्यारों से, चप्पा चप्पा गुंज ऊठेगा इन्कलाब के नारों से....!        -शहीद भगतसिंग सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला गेला तर येणाऱ्या बेरोजगार मुलांचं तरी भविष्य सुखेनैव होईल. दिवसराञ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यासाठी हा आंदोलन समितीने घेतलेला निर्णय योग्यच असा आहे. कचखाऊ धोरण विद्यमान सरकार राबवून बेरोजगार मुलांच्या ...

देगलूर विधानसभा मतदारसंघाचा रखडलेला विकासरूपी अनुशेष भरून काढायचा असेल तर अभ्यासू नेतृत्व भीमराव क्षिरसागर यांना विधानसभेत पाठवा

देगलूर - बिलोली विधानसभेचे लवकरच निवडणूका होणार आहे .शैक्षणिक , उद्योग शेञात  व्हावा तितका विकास झाला नाही,  जर एखाद्या भागाचा विकास करावयाचा असेल तर दीर्घकालीन उपाय योजना डोळ्यासमोर ठेऊन विकास साधला जातो,आणि त्यासाठी त्या भागाच्या विकासाची एक प्रकारे ब्लू प्रिंट तयार असावी लागते, आणि यासाठी विकासाची तळमळ,प्रत्येक गोष्टीतला दांडगा अभ्यास, अभ्यासू शैली, एखादा प्रश्न उपस्थित करण्याची आणि त्यासंबंधी सखोल माहिती, असणारा खमका प्रतिनिधी  हवा असतो तरच आपल्या भागाचा विकास घडू शकतो आणि असेच एक नेतृत्व आपल्याला ९० देगलूर विधानसभा मतदारसंघाला लाभले आहे, अत्यंत अभ्यासू,संयमी, दूरदृष्टी, विकास करण्याची तळमळ, तळागाळातील प्रत्येक घटकाच्या समस्याची जाण असणाऱ्या तरुण नेतृत्व म्हणजे मा.भीमराव क्षिरसागर त्यांच्या अभ्यासू  त्यांच्या संयमी शैलीने,  आपला अजेंडा लोकांसमोर मांडून जनतेच्या मनात घर निर्माण करणाऱ्या नेतृत्वाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे

देगलूर - बिलोली विधानसभेत रंगतेय भिमराव श्रीरसागर यांच्या नावाची चर्चा - सय्यद रियाज

बिलोली - विकासापासुन कोसो दुर असल्यामुळे नवा चेहरा नवा आमदार अब की बार भिमराव क्षिरसागर आमदार ....अशीचर्चा  विधानसभेत एकावयास मिळते उद्योजक असल्यामुळे विकास होइलच यावर जणता दरबारात दिसुन येत आहे.  आता विधानसभा उमेदवारीची  उत्सुकता शिगेला पोहचली आहे. टिकीट कोणाला मिळणार याचे देखील एक्झिट पोल सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या बाबत विधानसभेत भिमराव श्रीरसागर विषयी  चर्चा रंगू लागली आहे. टिकीट श्रीरसागर यांनाच मिळेल असा दावा ही नागरिकांकडून केला जात आहे. यांना उमेदवारी दिल्यास 100% निवडून येतील असा जानकारांचे मत  आहे. सोशल मीडियावर जोरदार पोस्टर,बँनर, पोस्ट, फिरु लागले आहे.  कार्यकर्ते आता पासूनच कामाला लागले आहे. टिकीट मला मिळाल्यास  निवडून येईन असा दावा भिमराव श्रीरसागर यांनी  केला आहे.

सोशल मीडियावर रंगतेय बालाजी बच्चेवार यांची नायगाव विधानसभेत चर्चा

नायगाव प्रतिनिधी :  आता विधानसभा उमेदवारीची  उत्सुकता शिगेला पोहचली आहे. टिकीट कोणाला मिळणार याचे देखील एक्झिट पोल सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या बाबत विधानसभेत बालाजी बच्चेवार विषयी  चर्चा रंगू लागली आहे. टिकीट बच्चेवार यांनाच मिळेल असा दावा ही नागरिकांकडून केला जात आहे. यांना उमेदवारी दिल्यास 100% निवडून येतील असा जानकारांचे मत  आहे. सोशल मीडियावर जोरदार पोस्टर,बँनर, पोस्ट, विडिओ, आडीओ फिरु लागले आहे. शेकडो कार्यकर्ते आता पासूनच कामाला लागले आहे. टिकीट मला मिळाल्यास  निवडून येईन असा दावा बच्चेवार यांनी  केला आहे.

नायगाव विधानसभेसाठी भाजपमध्ये रस्सीखेच;बालाजी बच्चेवार यांचे पारडे जड

बालाजी बच्चेवार यांची मतदारसंघात लोकप्रियता वाढली . नायगाव प्रतिनीधी :        आगामी विधानसभा निवडुका अगदी जवळ येऊन ठेपल्याने नायगाव विधानसभेचे टिकीट आपल्यालाच मिळावे यासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच चालू असून प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी आपपल्या परिने टिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भाजपाचे नेते बालाजी बच्चेवार यांनी माञ प्रचारामध्ये मोठी मुसंडी मारली असून सध्यातरी बच्चेवार यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.      नायगाव विधानसभेचे भाजपाचे नेते बालाजी बच्चेवार हे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे जवळचे विश्वासू मानले जातात नायगाव विधानसभेसाठी आयत्या पिठावर रांगोळी काढण्यासाठी काही इच्छुक उमेदवार अचानकपणे निवडनूकीच्या समोर येऊन पक्षासाठी कोणतेच योगदान नसताना पैशाच्या जोरावर राजकारण करू पाहत आहे परंतू बालाजी बच्चेवार यांचे पक्षासाठी केलेले योगदान पाहता जनताच आता त्यांच्या पाठीमागे असल्याचे दिसून येत आहे तर काहिंनी तर बच्चेवार यांनाच विधानसभेचे टिकिट मिळावे यासाठी सोशल मिडियावर प्रचार करताना दिसत...

संदीप भुरे यांच्या गीताचे सिनेतारका वर्षा उसगांवकर हस्ते मंगळवेढा येथे विमोचन....

नांदेड : बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर यांच्या 'हे लंबोदरा तू आल्यांवर' या गणपती गीताचे ख्यातनाम सिनेतारका वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते 'दामाजी एक्स्प्रेस' मंगळवेढा येथे विमोचन करण्यात आले. या गीताचे निर्माता, दिग्दर्शक, गीतकार विशाल पाटील, सह दिग्दर्शक अमोल वाघमारे, ध्वनिमुद्रक प्रकाश माने (मुंबई) व हिंदी टिञपटाचे संगीतकार प्रशांत सिंग(मुंबई)यांचे या गीताला संगीत संयोजन लाभले आहे. गायक सिद्धार्थ गजघाटे यांनी गायिले आहे. 'हे लंबोदरा तू आल्यांवर' हे गणपती गीत सर्व रसिक मिञांना नक्की आवडेल. याबद्दल माजी उपसरपंच व पञकार काशिनाथ वाघमारे, कवी,गीतकार जाफर  आदमपूरकर, पञकार रियाज शेख, रमाकांत महाराज, सुरेश जाधव, संजय जाधव, दिलीप भुरे, गोपाळ म्हेञे, प्रा. बाबुराव उप्पलवार, प्राचार्य मारोती पिन्नरवार, प्रा. खुशाल उप्पलवार, प्रा. सुनिल भुरे, महायान सावळे, आदिंनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

बार्टी कडून आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती साजरी

बिलोली - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांनी जिल्हा परिषद शाळा लघुळ येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त प्रबोधन व मार्गदर्शन केले  .सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मठपती सर यांनी यांनी परिश्रम घेतले व समतादूत शेख आय.एम.याचे आभार मानले.सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टी चे महासंचालक म.कैलास खणसे व मुख्य प्रकल्प संचालिका मा.प्रज्ञा वाघमारे व नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांनी मार्गदर्शन करत आहेत

आंबेडकरी चळवळीला हिरा देनारी माता म्हणजे हौसाबाई कांबळे - भास्कर भेदेकर

शंकरनगर-  ज्यांनी बुध्द विहारासाठी स्वतःची जमीन दान स्वरूपात दिली . तसेच वरळी मुंबई येथे  जातीयवाद्यांनी  दंगल घडवली होती.तेव्हा या मातेने आंबेडकरी चळवळीच पुढाकार घेवुन नेत्रत्व केले. याही पुढेजावुन त्यांनी आपल्या मुलांना चळवळीच काम करण्यासाठी पाठीवर थाप मारली तेव्हा  बबन कांबळे साहेब घडले . बबन कांबळे यांनी समाजातील दिन दुबळया जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी व येथिल जातीयवाद्यांना वटनीवर आणण्या साठी जसे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक, बहीष्कृत भारत ,प्रबुध्द भारत या वृत्तपत्राच्या माध्येमातुन समाजाला नवि दिशा देण्याच काम केले. तोच बाणा आणी कणा व विचार आत्मसात करून बबन कांबळे साहेबांनी दै.वृत्तरत्न सम्राट ची निर्मीती केली. आणी खर्या आर्थाने दै.सम्राट ने डाॅ.बाबासाहेबांच्या आदर्श  विचाराला  नजरे समोर ठेवुन संपादक बबन कांबळे साहेब काम करत आहेत. आशा ह्या व्यक्ती मत्वाला घडवुन आंबेडकरी समाजाला व आंबेडकरी चळवळीचा हिरा देवुन   जानार्या माता हौसाबाई कांबळे यांना आखेरचा क्रांतीकारी जयभिम      समाजाला दिशा आणि न्याय देनारे दै.वृत्तरत्...

जाफर आदमपूरकर चे हिंदी गीत टी-सिरीज ला रिलीज

नांदेड : बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा कवी, गीतकार जाफर आदमपूरकर यांचे नवे हिंदी गीत गुलशन कुमार प्रस्तुत टी-सिरीज कंपनी मुंबई ने नुकतेच रिलीज केले आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्यावरील एकमेव हिंदी गीत टी सिरीज ने रिलीज केले आहे. 'अहिल्यामाता का नाम हुआ है सारे हिंदुस्तान मे' असे हे गीत आहे. राजमातेच्या कार्यावर ओझरता प्रकाश टाकणारं हे सदरील गीत आहे. टी सिरीज ने रिलीज केल्यामुळे हे गीत चक्क भारतातील रसिक श्रोत्यांना ऐकायला मिळत आहे. या गीताचे गायक गोपाळ म्हेञे आळंदीकर, नांदेड, संगीतकार युवा कवी, गीतकार आणि गायक प्रा.संदीप भुरे आदमपूरकर, नांदेड, ध्वनिमुद्रक प्रकाश माने सोलापूरकर, मुंबई हे आहेत. तर कोरस म्हणून सौ. मंजुळाबाई हायस्कूल खतगांव येथील चिमुकल्या मुलींनी दिले आहे. याआधी गीतकार जाफर आदमपूरकर यांची चार मराठी गाणी ऑरेंज म्युझिक प्रस्तुत मुंबई ने रिलीज केलेली आहेत. त्यात जेजुरी कुलदैवत श्री खंडोबा वरील भक्तिगीत 'बोला मल्हारी मार्तंड जय मल्हार' , शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'सार्‍या जगात पावन झाली शिवरायाची जयंती आली...

नायगाव येथे कुशल ग्रुप ॲडमिन पुरस्कार सोहळा 6 सप्टेंबर रोजी

  नायगाव - विधायक संदेशातून विवेक समाज घडवण्याच्या उद्देशाने नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार  यांच्यावतीने महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडवणीस ,अर्थ मंञी मा.सुधीर मुंगटीवार नांदेड जिल्हाचे खासदार मा. प्रताप पाटील चिखलीकर  यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वाटसब चा चांगल्या प्रकारे काम करणा-या अँटमीनला  बँग देवून सन्मान करण्याचे ठरवले होते. असंख्य ग्रुप अँडमीन यांनी आपले नाव नोंदणी केली या कार्यक्रमात भरभरुन चांगला प्रतिसाद मिळाला नाव नोंदणी केलेल्यांना . दि. 6 सप्टेंबर 2019 रोजी शुक्रवार सकाळी नायगाव तालूका 10 ते 11 , उमरी तालूका 11 ते 12 , धर्माबाद तालूका 12 ते 1 स्थळ बालाजी बच्चेवार यांच्या जनसंपर्क कार्यालय नायगाव येथे कुशल गृप अँडमीन चा बँग देवून सन्मान करण्यात येणार आहे असे भाजपचे नायगाव विधानसभेचे नेते तथा प्रबळ दावेदार मा. बालाजी बच्चेवार यांनी सांगीतले. वाटसब गृपचे अँडमीन  व प्रमुख भाजप कार्यकर्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे अव्हान करण्यात आले.

समतादूत प्रकल्पाच्या संदर्भात बार्टी चे निबंधक सकारात्मक

नांदेड - बार्टी पुणे ,बोधी संस्था ,राष्ट्रीय लघुद्योग निगम,राष्ट्रीय हब यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेड येथे व्हेंडर डेव्हलपमेंट कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे चे निबंधक श्री.यादवराव गायकवाड यांनी बार्टी मार्फत राबविण्यात येत असलेला महत्वकांक्षी प्रकल्प समतादूत हा समाज हितार्थ आहे आणि अशा प्रकल्पाची गरज समाज परिवर्तनासाठी आहे .असे समतादूत प्रकल्पविषयी सकारात्मक भूमिका यावेळी व्यक्त केली .

युवकांनी संघटीत होऊन गोरगरिबांची सेवा करावी- बालाजी बच्चेवार

धर्माबाद येथील शेतकरी युवक संतोष साखरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती शिरीष भाऊ गोरठेकर तर व उद्घाटक म्हणून. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते तथा भारतीय जनता पार्टीचे प्रबळ दावेदार बालाजी बच्चेवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्माबाद भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विजय डांगे शहराध्यक्ष रामेश्वर गंधअलवार कृउबास संचालक शिवराज पाटील मोकलीकर श्याम शेठ  झंवर मारुती कागरू पस सदस्य. यश पाटील मंगनाळीकर राहुल ममदापूर कर आदीसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा नेते बालाजी बच्चेवार म्हणाले की युवकांनी कोणाची गुलामी लाचारी न करता समाजकारणात राजकारणात काम करत असताना स्वाभिमान कोणापुढे गहाण न ठेवता संघटित होऊन  गोर गरिबांसाठी काम करावं अशा पद्धतीच्या आव्हान केले बालाजी बच्चेवार यावेळी म्हणाले की एका शेतकऱ्याच्या मुलाचा वाढदिवस साजरा करत असताना रक्तदाना सारख्या पवित्र शिबिराचं आयोजन करून संतोष साखरे यांनी युवकांपुढील चांगल्या पद्धतीचा आदर्श ठेवलाय धर्...