मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिवताप व हत्तीरोग विभाग विभाजनाला कर्मचाऱ्यांचा नांदेड येथे कडाडून विरोध .....

नांदेड- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असतानाच,किरकोळ व क्षूल्लक कारणे सांगत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील जिल्हा हिवताप कार्यालय व हत्तीरोग नियंत्रण पथकांच्या कामकाजात अडथळे निर्माण करण्याचे काम प्रशासनाने चालवले आहे. कामकाजात सूसुत्रता आणण्याचे परिपत्रक काढण्याच्या बहाण्याने प्रशासनातील वरीष्ठ पातळीवरून कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता,त्यांना व त्यांच्या नियमित कामकाज व जबाबदाऱ्यांना अडचणीत आणणारे परिपत्रक दि. २२ नोव्हेंबर रोजी काढून वरील  संपूर्ण विभागच जिल्हा परीषदेकडे वर्ग करण्याचा घाट घातला जात आहे.त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी व आस्थापनेवरील विविध संवर्गातील कर्मचारी यांनी एकत्रीत येवून बैठक घेऊन याबाबीचा कडाडून विरोध केला तसेच या अन्यायी परीपत्रक रद्द करण्यात यावे किंवा या परीपत्रकाला न्यायालयामार्फत आव्हान देण्याचे ठरवले.   या बैठकीस राजीव पांडे, सत्यजीत टिप्रेसवार, संजय भोसले,गणेश सातपुते, दिनानाथ जोंधळे, सुरेश आरगुलवार, उमाकांत वाखरडकर यांनी मार्गदर्शन केले   यावेळी ...

सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न नांदेड - आज पासदगाव ता.नांदेड येथील जि.प.शाळेतील ६ महिने ते १९ वर्ष विद्यार्थ्यांना सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत आय एफ ए गोळ्या व सायरपचा पुरक डोस देण्यात आला. यावेळी मा.सुखदेव जाधव सभापती पं.स.नांदेड, सरपंच मा.प्रसराम मोहिते, विस्तार अधिकारी जीवन कांबळे, सुभाष कल्याणकर आरोग्य कर्मचारी,शाळेतील शिक्षक व ईतर कर्मचारी उपस्थित होते

जनतेच्या हितासाठी अजीतदादांचा निर्णय योग्यच - प्रा.जीवन चव्हाण

नायगाव - प्रगतशील व पुरोगामी अशा महाराष्ट्राली राष्ट्रपती राजवट हटवली. आज शेतकरी कष्टकरी कामगार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे.. महाराष्ट्र ओल्या दुष्काळी परिस्थिती आहे आणि राजकीय पक्ष नुसत्या बैठका घेण्यात व्यस्त असल्याने जनता चिंतेत होती.जनता नेत्यांचा आणि राजकारणाचा तिरस्कार करायला लागली ही परिस्थिती महाराष्ट्राचे कणखर आक्रमक रोखठोक जहालवादी नेतृत्व मा.अजीतदादा पवार यांनी ओळखली आणि भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य करण्याची धोरणात्मक भूमिका घेतली...हा महाराष्ट्राच्या हिताचा, जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. कारण जनतेला भाजपाचे सरकार व्हावे असे मनोमन वाटत होते. हे जनतेचे मन अजितदादांनी ओळखले अन आज महाराष्ट्रात भाजप -राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि शुभेच्छा आपण बहुमत सिद्ध करणार असा माझा ठाम विश्वास आहे कारण पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमीत शहा यांचा पुर्ण पाठींबा व सहकार्य आहे..! असे मत प्रा.डॉ.जीवन पा.चव्हाण (भाजपा नायगाव ) यांनी सांगीतले.

अजित पवार यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळण्याच्या दृष्टिकोनातून केलेला निर्णय योग्य - बालाजी बच्चेवार

नायगाव - काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून बनवण्यात आलेल्या सरकार हे अल्पजीवी ठरल असतं त्यापेक्षा देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापित करण्यात आलेल्या सरकार हे पाच वर्ष काम करेल असा विश्वास वाटतो देवेंद्र फडणीस आणि अजित दादा यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राला एक नवीन दिशा दायक प्रगतिशील राज्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अजितदादांनी केला निर्णय हा योग्य आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला एक स्थैर्य देण्याच्या निर्णय आहे महाराष्ट्रापुढे  अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा सरकार पुढील मुख्य उद्देश असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात अनेक पद्धतीने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कडून जो जनादेश जनतेनी दिला होता भाजपा शिवसेनेला त्या  जनादेशाचा अपमान करण्याचे काम उपरोक्त तिन्ही पक्ष करत होते आणि हा सर्व प्रकरणाला लगाम बसणारा धडाडीचा निर्णय अजितदादांनी केलेला आहे खरोखरच हा महाराष्ट्राच्या इतिहासातील मास्टरस्ट्रोक निर...

“संविधान साक्षर ग्राम” उपक्रमाचे आयोजन टाकळी (जं),व बोंढार (नेरली) या दोन गावांची निवड

नांदेड  :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांचे समतादूत प्रकल्पाच्यावतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात संविधान साक्षर ग्राम उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात देगलूर तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत व नांदेड तालुक्यातील बोंढार (नेरली) ग्रामपंचायत या गावांची निवड करण्यात आली आहे.  या गावात संविधान जनजागृती, स्वच्छता उपक्रम, बचतगट भेटी, महिला साक्षरता, वाचन साहित्य व संविधान प्रत यांचे वाटप इत्यादी स्वरुपात हा उपक्रम आहे. 26 नोव्हेंबर रोजी बोंढार (नेरली) येथे संविधान साक्षर ग्राम उपक्रमाचे उद्घाटन, रॅलीचे आयोजन व भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन मान्यवरांच्या उपस्थित होणार असून या राष्ट्रीय उपक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रकल्प अधिकारी सौ.सुजाता पोहरे समतादूत प्रकल्प बार्टी पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे. संविधान साक्षर ग्राममध्ये विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यात 26 नोव्हेंबर रोजी संविधान साक्षर ग्राम उद्घाटन कार्यक्रम, उद्देशिका वाचन, प्रभात फेरी, अभिवादन. 27 नोव्हेंबर रोजी स्वच्छता अभि...

महाराष्ट्र राज्याला स्थिर सरकार मिळाले यांचा आनंद आहे- पांडुरंग शिंदे

   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री  म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतली यामुळे महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्याचा आनंद  आहे असे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले की,भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित दादा पवार यांचे राज्यातील शेतकरी,शेतमजूर, विद्यार्थी ,युवक व आमचे नेते सदाभाऊ खोत व रयत क्रांती संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो पुढील कार्यास शुभेच्छा देतो. नवीन सरकारने संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकर घ्या ही अपेक्षा व्यक्त करतो.

आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत नांदेडच्या मुलींचा संघ विजयी

नांदेड - नेपाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धा चे आयोजन स्पोर्ट्स स्टेडियम पोखरा नेपाळ येथे, नेपाळ युवा क्रीडा विकास परिषद व असोसिएशनल फॉर ट्रेडिशनल युथ गेम्स अँड स्पोर्ट इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत नांदेडच्या खेळाडूंनी कबड्डी सिनियर या प्रकारात सहभाग घेऊन रौप्य पदक प्राप्त केले त्यामध्ये संयुक्ता देबाजे, अंकिता भालेराव,सीमा देशमुख,मोहिनी बरुरे, प्रज्ञा लोखंडे, रितिका कांबळे ई.खेळाडूंनी रौप्य पदक संपादन केले,याच खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर सुपर्ण पदक प्राप्त केले होते.या स्पर्धेत भारत,नेपाळ, भूतान, श्रीलंका आदी देशांनी सहभाग घेतला होता. न्यू फोर्स अकॅडमी नांदेड चे संचालक शेख सर याच्या वतीने विजेत्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.बोरीकर सर (सायन्स कॉलेज स्पोर्ट्स डायरेक्टर ),राजकुमार मराठे सर,अशोक तोंडे सर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यांच्या या यशाबद्दल सर्वांनी शुभेच्छा चा वर्षाव केला त्या मधे महत्वाचं योगदान म्हणजे त्याचे प्रशिक्षक सूर्यकांत ताडेवार...

कु.मनिषा सोनकांबळे यांना पी.एच.डी.प्रदान..

कु.मनिषा सोनकांबळे यांना पी.एच.डी.प्रदान. . बिलोली तालुक्यातील  मौजे सावळी येथील गंगाधर लालू सोनकांबळे यांची मुलगी कु.मनिषा गंगाधर सोनकांबळे यांनी  पी.एच.डी.पदवी प्रदान केली. डाॕ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथे वनस्पतीशास्ञ विभागातुन इव्हल्युएशन आॕफ मेथाडेस फाॕर प्रिजवर्षेन सम लिली व्हिजिटेबल या आभ्यासक्रमासाठी, नारायण पडूंरे याचे मार्गदर्शन लाभले लाभले मी ग्रामीण भागातील रहिवासी असलेली कु.मनिषा सोनकांबळे ही पी.एच.डी.पदवी प्रदान केली आहे.डाॕ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे व मार्गदर्शन केलेल्या गुरुजनांचे मी सदैव रुणी असल्याचे म्हणाले.कु.मनिषा सोनकांबळे यांना तालुक्याच्या परिसरातुन शुभेच्छा व अभिनंदन गंगाधर सोनकांबळे,शंकर सोनकांबळे,नामदेव सोनकांबळे,भिमराव सोनकांबळे,बालाजी रामपूरकर, वैजनाथ देवकरे,सुरज पवार, गंगाधर आरसे,राहुल देवकरे यांच्यासह अदीने दिले होते.

गीतकार जाफर आदमपूरकरांच्या गीतांना मिळाले एक लाख व्हिऊज

बिलोली : बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा कवी, गीतकार जाफर आदमपूरकर यांच्या दोन गीतांना युट्यूब वरती तब्बल एक लाख व्हिऊज मिळाले आहेत. ऑरेंज म्युझिक प्रस्तुत मुंबई 'बाबा सैलानी आमचा वली, आणि 'या सैलानी हक् सैलानी ने सजला हा दरबार' या हजरत बाबा सैलानी यांच्या जीवनावर असणारी ही मराठी कव्वाली साजातील गीते युट्यूब वरती तब्बल एक लाख रसिक श्रोत्यांनाी श्रवणाचा हा आनंद घेतला आहे. आपल्या केलेल्या कामाची रसिकांनी दिलेली ही उत्स्फूर्त दाद आहे.गीतकार म्हणून आतापर्यंत सहा गाणी लिहिली आहेत. ऑरेंज म्युझिक मुंबई निर्मित पाच गाणी आणि टी-सिरीज म्युझिक प्रस्तुत मुंबई साठी एक गाणं लिहिलेलं आहे. वरील दोन्ही सुपरहिट गाण्यांचे युवा गायक, संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर हे आहेत. या आधी त्यांनी सुपरहिट गाणी रसिकांना दिली आहेत. गाण्यांचे सुप्रसिद्ध साऊंड इंजिनिअर  प्रकाश माने, मुंबई, संगीत संयोजन शेख नयूम नांदेडकर हे आहेत . याबद्दल गीतकार जाफर आदमपूरकर यांचे संगीतकार प्रा.संदीप भुरे, प्रकाश माने, शितलकुमार माने, पीएसआय मुरारी गायकवाड, साहित्यिक प्रा. डाॅ.जगदीश कदम, देवीदास फु...

शेतकऱ्यांना ८ हजारांची मदत करून केली बोळवण, ही थट्टा थांबवा - पांडुरंग शिंदे

       राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या कडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली. २ हेक्टर पर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये व फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला असे आज जाहीर करण्यात आले ही शेतकऱ्यांना मदत करत आहेत की चेष्टा करत आहे अशा उद्देगित प्रश्न रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केला आहे.       राज्यात अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, आमचे वडीलधारी माणसे सांगतात की, अशा परतीचा पाऊस आमच्या उभ्या हायातीत पहिला नाही जो एका वर्षांचा पाऊस ऑक्टोबरच्या एका महिन्यात पडला व हातचे पीक गेले व वावरात पाणीच पाणी साचले त्यामुळे खरीब हंगामातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, इत्यादी पीक गेलेच पण रबी हंगाम सुध्दा हातचा जाणार आहे.      सोयाबीन लागवडीचा एकरी २० हजार रुपये व कपाशीचा एकरी ३० हजार रुपये आहे.आणि राज्यपाल महोदय हेक्टरी ८ हजार रुपये मदत देणार आहेत?? ही आमची चेष्टा लागली काय? अरे आम्ही ज...

आदमपुरच्या संदीप भुरेंनी दिलं मराठी ऐतिहासिक चित्रपटाला संगीत..

बिलोली:-तालुक्यातील आदमपुर येथील रहिवासी युवा संगीतकारांनी प्रा. संदीप भुरे आदमपुरकर, यांनी आपले पाऊल आल्बमपासूनचे आता चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं आहे  जिद्द,  चिकाटी,परीस्थितीशी संघर्ष करुन यशस्वी चित्रपटाकडे वाटचाल होत ,.. नांदेड येथील निर्माता , दिग्दर्शक प्रा.अशोककुमार दवणे यांनी "बाबासाहेबाचि आई भीमाई".,ह्या मराठी ऐतिहासिक चित्रपटाला संदीप यांना संधी देण्यात आली .त्या संधीचं सोनं मात्र नक्की केलं आहे.. भीमाई चित्रपटाची गाणी ध्वनीमुद्रीत झाली आहेत ह्या चित्रपटात सिनेगायक  सुरेश वाडकर मुंबई , सिनेगायिका नेहा राजपाल मुंबई व इजि.कु. दक्षता दवणे आदी गायकांनी गायले आहे.... ह्या चित्रपटाचे पोस्टर ही लान्च झाले आहे.गाणी नादमधुर आहेत " आजिवासन "रेकार्डींग स्टुडीओ सांताक्रूझ मुंबई येथे पार पडले... साऊंड रेकॉर्डींस्ट प्रकाश माने मुंबई संगीत:-संदीप भूरे यांच लाभलं आहे.           या यशाबद्दल प्राचार्य मारोती पिन्नरवार सर गुरुवर्य प्रा.बाबूराव उपलवार,पी.पी.गायकवाड , जाफर आदमपूरकर, काशिनाथ वाघमारे , मारोती भुसावळे , दिलिप भसावळे , डॉ.विलासराज भद्...

शेतकऱ्यांना मदत आहे का? चेष्टा आहे -पांडुरंग शिंदे

   राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या कडून आज राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली. २ हेक्टर पर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये व फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला असे आज जाहीर करण्यात आले ही शेतकऱ्यांना मदत करत आहेत की चेष्टा करत आहे अशा उद्देगित प्रश्न रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केला आहे.       राज्यात अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, आमचे वडीलधारी माणसे सांगतात की, अशा परतीचा पाऊस आमच्या उभ्या हायातीत पहिला नाही जो एका वर्षांचा पाऊस ऑक्टोबरच्या एका महिन्यात पडला व हातचे पीक गेले व वावरात पाणीच पाणी साचले त्यामुळे खरीब हंगामातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, इत्यादी पीक गेलेच पण रबी हंगाम सुध्दा हातचा जाणार आहे.      सोयाबीन लागवडीचा एकरी २० हजार रुपये व कपाशीचा एकरी ३० हजार रुपये आहे.आणि राज्यपाल महोदय हेक्टरी ८ हजार रुपये मदत देणार आहेत?? ही आमची चेष्टा लागली काय? अरे आम्ही जगाला पोसनारे माण...

योग्य जीवनशैली आचरताना त्यात सातत्य राखणे आवश्यक - डॉ. रोडे

योग्य जीवनशैली आचरताना त्यात सातत्य राखणे आवश्यक - डॉ. रोडे धकाधकीच्या व चंगळवादी जीवनात आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जीवनशैली केवळ चांगली ठेवण्याचा विचार करून भागत नाही तर,ती आचरणात आणणे आणि त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे.हे सातत्य ठेवल्या गेल्यासच निरोगी,दीर्घायु जगता येईल असे अटलांटा येथे DPLM फाउंडेशन तर्फे आयोजित "बोलू यात आयुष्या बाबत "या जिल्हा परिषदेच्या माजी वैद्यकीय अधिकारी डॉ दुर्गादास रोडे यांनी तयार केलेल्या कार्यक्रत आवाहन केले.  डॉ रोडे यांनी "बोलू यात  आयुष्या बाबत"अर्थात आचराव्याची सहज व सोपी जीवनशैली हा कार्यक्रम तयार केला आहे,त्याचा शासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभवातुन सर्व सामान्य व्यक्ती पासून सर्व प्रकारच्या व्यक्ती याना सहज, व आचराव्याची सोपी जीवनशैली च कार्यक्रम तयार केला आहे.यात आजच्या या काळात चांगली जीवनशैली चे महत्त्व सर्वांना पटते.परंतु ती आचारण्यात आणली जात नाही.आचरणात आणल्या गेली तरी त्यात सातत्य राखल्या जात नाही.सातत्य का राखल्या जात नाही व हे कसे ठेवता येईल, या कारणांचा शोध आणि ती कारणे कशी दूर करून साधी , आचारण्यात सोपी अशी जीवनशैल...

मिस्त्री कामगार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संजय धनगरे यांची बिनविरोध निवड

बिलोली ता.प्र.मार्तंड जेटे बिलोली तालुक्यातील मिस्त्री कामगारांची शहरातील मारोती मंदिरात ९ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली, या बैठकीत मिस्त्री कामगारांच्या तालुका संघटनेबाबत चर्चा करून कार्यकारणी करण्याचे ठरविण्यात आले, यामध्ये नामवंत मिस्त्री संजय धनगरे यांची बिनविरोध तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.  गेल्या काही वर्षापुर्वी राज्यातील मिस्त्री कामगारांच्या व्यथा व समस्या समजून घेऊन त्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मिस्त्री कामगारांसाठी विविध शासकिय योजना लागू केल्या आहेत, यामध्ये मिस्त्री कामगार व त्यांचे कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी तालुका प्रशासनाने तालुक्यातील मिस्त्री कामगारांचे आपल्या कार्यालयात नोंद केली व तसे काही वर्षापुर्वी प्रमाणपत्र दिले, तेंव्हा सदर कामगारांची तालुकास्तरावर असलेल्या इतर राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, कामगार संघटेने सारखे आपली सुध्दा एखाद्या संघटनेसोबत नोंद असावी या उद्देशाने शनिवार दि ९ नोव्हेंबर रोजी शहरातील मारोती मंदिरात बैठक घेऊन मिस्त्री कामगार संजय धनगरे यांची मिस्त्री कामगार संघटनेच्या बिलोली तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्...

फॅशन डिझाईन प्रशिक्षणाचा निरोप सोहळा

उदगीरः अलिना बहुउद्देशिय सेवाभावी संस्था उदगीर द्वारा संचलित हजरत बिबी फातेमा ट्रेनिंग सेंटर व जिल्हा उद्योग केंद्र लातूर, मिटकाॅन कन्सलटन्सी इंजि. सव्र्हिसेस लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फॅशन डिझाईन प्रशिक्षणाचा निरोपसोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र उदयगिरी माविद्यालयाचे प्रा.एस.एस. पाटील होते. प्रमुख पाहुणे एन.यू.एल.एम. नगर परिषद चे अधिकारी विशाल गुडसूरकर, रोटी कपडा बॅंकेचे सचिव शेख गौस, कोशाध्यक्ष डाॅ.खुरशीद आलम, प्रा.सय्यद अखिल, सतीश नकाशे, पत्रकार खिजर मुनषी, डाॅ.अतिख, विवेक नागुरे, शिक्षिका शेख फरहीन संस्थेचे अध्यक्ष शेख अनवर सदस्य शेख पाशा शेख युनूस, शेख शिफा, शेख नाजीम यांची उपस्थिती होती. सूत्र संचलन प्रा. अश्वीन वळवी यांनी केले. प्रास्तावीक संस्थेचे सचिव शेख अजिमोदीन यांनी केले. प्रशिक्षणाथ्यातर्फे कोमल देडे, श्वेता कांबळे, नेहा पकोडे, उत्कर्षा गायकवाड यांनी मनोगत वयक्त केले. श्री गुडसूरकरांनी प्रशिक्षणाच्या फायदा घेऊन गृहउद्योग करण्याचे आवाहन करून नवनवीन योजनांची माहिती दिली. समारोपात प्रा.पाटील म्हणाले महिलांनी जे प्रशिक्षण घेतले आहे त्याचा बचत ग...

झरी येथे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम कार्यशाळा संपन्न

नांदेड- (सय्यद रियाज )  राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय,जिल्हा क्षयरोग नियंत्रण समिती तथा माता रात्नेश्वरी सेवाभावी शिक्षण संस्था झरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता निरीक्षक,एम.एस.डब्लू, अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत येणाऱ्या आजारा विषयी माहिती होण्याकरिता कार्याशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वच्छतादूत मा. माधवराव पाटील झरीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड  दक्षिण चे  आमदार मोहन आण्णा हंबर्डे,रंगनाथ गायकवाड,माधव जाधव होते.जिल्हा हिवताप,हत्तीरोग आणि क्षयरोग कार्यालयातील श्री राजीव पांडे आरोग्य पर्यवेक्षक, श्री व्यंकटेश पुलकंठवार आरोग्य सहाय्यक, श्री रविंद्र तेलंगे किटक समहारक,  डॉ.संगीता गादेवार,ज्योती डोईबोळे,ललिता लिल्हारे यांनी किटकजन्य आजारा विषयी माहिती,स्लाईड शोद्वारे,लारवा,डास,व गप्पी मासे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.   डासांचे प्रकार,जीवनचक्र,कोरडा दिवसाचे महत्व,डासोउत्पती स्थाने माहिती,गप्पी माशाचे महत्व,प्रतीबंधात्मक उपाययोजना,क्षयरोगाचे लक्ष...

०७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवसानिमित्त प्रश्न -मंजुषा (चालता-बोलता) कार्यक्रम

बिलोली - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फे कार्य करणारे तालुका समतादूत शेख इर्शाद मौलाना यांच्या तर्फे  चालता बोलता व प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, लोहगाव येथे शिक्षणापासून वंचित असलेला घटक चित्तोडिया समाज गेल्या अनेक वर्षांपासून जंगलात वास्तव्यास आहे सदर समाजाच्या विद्यार्थी व पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करून तालुका समतादूत शेख आय.एम.यांनी गेल्या ०४ वर्षांपासून शिक्षणाचे महत्व पटवून दिले त्याचे फलित म्हणजे आज ह्या समाजातील एकूण १८ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत .एकूणच तालुक्यामध्ये ४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .तसेच   ०७ नोव्हेंबर विद्यार्थी दिवसाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना सांगितले कि. भारतीय घटनेचे शिल्पकार आणि वंचितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला तो ७ नोव्हेंबर हा सर्व शाळांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस...

महागायक आनंद शिंदे यांच्या हस्ते संदीप भुरेंच्या लोकगीत पोस्टर्सचे विमोचन

महागायक आनंद शिंदे यांच्या हस्ते संदीप भुरेंच्या लोकगीत पोस्टर्सचे विमोचन बिलोली :बिलोली तालुक्यातील मौजे आदमपूर येथील युवा संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर यांनी संगीतबद्ध केलेल्या "कसा डुलयोय यजमानी"ह्या झकास लोकगीताच्या पोस्टर्सचे सोलापूर येथे एका भव्य कार्यक्रमात महाराष्ट्रचे लाडके महागायक आनंद शिंदे मुंबई यांच्या हस्ते विमोचन झाले. ह्या लोकगीताचे पार्श्वगायक शितलकुमार माने, प्रसिद्ध गीतकार प्रकाश तांबे मुंबई, संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपूरकर, ध्वनिमुद्रक प्रकाश माने मुंबई हे आहेत. गुलशन कुमार प्रस्तुत टी-सिरीज म्युझिक कंपनी मुंबई तर्फे हे गीत रसिक श्रोत्यांना लवकरच ऐकायला मिळेल. ह्याबद्दल गीतकार जाफर आदमपूरकर, पञकार रियाज सय्यद , पञकार काशिनाथ वाघमारे, पञकार मारोती भुसावळे,पञकार दिलीप भुसावळे,पञकार धम्मदिप भुसावळे,तानसेन लोकरे, सिद्धार्थ गजघाटे सोलापूर, प्राचार्य मारोती पिन्नरवार, प्रा. सुनिल भुरे, सिध्दार्थ भुरे, कपिल भुरे, जनजीवन भुरे, महायान सावळे, प्रज्योत माने मुंबई, हणमंत भुसावळे, रणजित भुसावळे, दिलीप भुरे, इत्यादिंनी अभिनंदन केले आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वच पिकासाठी एकरी मदत द्या- केदार साळुंके

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वच पिकासाठी एकरी मदत द्या- केदार साळुंके नांदेड :-महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यामध्येही अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे पहिल्या टप्प्यात मूग, उडीद तर दुसऱ्या टप्प्यात सोयाबीन ,ज्वारी आणि आता कापूस,धान(साळ) पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य केदार पाटील साळुंके यांनी भेट घेऊन सर्वच पिकासाठी शासनाने काढलेल्या एकरी उत्पादन खर्चावर आधारित भावाची रक्कम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी केली आहे .      अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यामध्ये विभाग निहाय पीक पद्धतीनुसार नुकसान झालेले आहे त्यात मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात मूग, उडीद ,सोयाबीन ,ज्वारी ,कापूस, धान (साळ)या प्रमुख पिकाची लागवड केल्या जाते यात पहिल्या टप्प्यातील पाण्याने मूग व उडीद या पिकाचे नुकसान झाले त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसाने सोयाबीन आणि ज्वारी पिकाचे मोठ्या ...

कृषी राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांचा नांदेड दुष्काळग्रस्त भागाचा दौरा

कृषी राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांचा नांदेड दुष्काळग्रस्त भागाचा दौरा नायगाव, बिलोली, धर्माबाद तालुक्यात भेटी.. विशेष प्रतिनिधी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आज दि.४रोजी नांदेड  दौ-यावर असून जिल्ह्यातील नायगाव,बिलोली,व धर्माबाद तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्षात पाहणी करणार आहेत अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे  युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी दिली आहे.   राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शासकीय वाहनाने नायगाव तालुक्यातील काहाळा (बु), सोमठाना,मांजरम,गडगा व बिलोली तालुक्यातील लोहगाव, पांचपिपळी (फाटा) व धर्माबाद तालुक्यातील बाबळी बंधारा या गावातील   अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्षात पाहणी करणार आहेत व शेतकऱ्यांशी संवाद साधनार आहेत.      तसेच धर्माबाद तालुक्यातील बहचर्चित बाभळी बांधा-याची पाहणी करून बॅकवाटर मूळे नुकसान झालेल्या शेतीचा व पिकांचा आढावा घेणार आहेत व उपस्थित शेतकऱ्यांशी प्रत्यक्षात संवाद साधणार आहेत.तद्नंतर सायंकाळी धर्माबाद येथून देवगिरी एक्स्प्रेस ने मुंबई कडे...

मा.उमाकांत वाखरडकर आरोग्य सहाय्यक यांचा निवृत्तीप्रीत्यर्थ सत्कार समारंभ संपन्न

नांदेड - (सय्यद रियाज) जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड येथील आरोग्य सहाय्यक उमाकांत वाखरडकर यांना दि. ३१ ऑक्टोबर रोजी नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या बदल जिल्हा हिवताप व हत्तीरोग कार्यालय नांदेड येथील संंयोजन समिती तर्फे निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करून निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.डॉ आकाश देशमुख साहेब जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड व प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ बालाजी मिरकुटे साहेब तालुका आरोग्य अधिकारी नांदेड , श्री.आर.आर.वाखरडकर  सेवानिवृत्त कृषीअधिकारी, बाबुराव वाखरडकर प्रसिद्ध व्यापारी, प्रा.महेश वाखरडकर राज्य स्तरीय कोच बँडमिंटन असोसिएशन, जिल्हा सचिव बँडमिंटन, डॉ विनायक वाखरडकर हे उपस्थित होते. श्री उमाकांत वाखरडकर हे आरोग्य सेवे मध्ये १९८४ पासून आज पर्यंत अशी प्रदिर्घ सेवा बजावली. सन २००८-०९ मध्ये जिल्ह्यात मध्ये चिकुन गनिया ची साथ पसरली असताना जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत भरारी पथक प्रमुख म्हणून विशेष कामगिरी केली.  तसेच हिवताप व हत्तीरोग कर्मचारी यांच्या वेळोवेळी  अडिअडचणी जिल्हाध्यक्ष या ...

अंतापूरकर आमदार होण्याचे सर्व श्रेय बिलोली देगलूरच्या जनतेलाच -साळुंके

अंतापूरकर आमदार होण्याचे सर्व श्रेय बिलोली देगलूरच्या जनतेलाच -साळुंके नांदेड :-देगलूर विधानसभेच्या 2009 साली झालेल्या निवडणुकीत नौकरीचा राजीनामा देऊन आमदार झालेल्या रावसाहेब आंतापुरकरांना 2014 च्या निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला तरी हा माझा पराभव नसून मीच या विधानसभेचा आमदार समजून अतिशय कटिंन प्रसंगातून बिलोली तालुका व देगलूर तालुक्यातील जनतेच्या नेहमी संपर्कात राहिल्याने व त्यांच्यावर माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी विश्वास दाखवून 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी देऊन आशीर्वाद दिल्याने येथील जनतेने विरोधकांच्या आर्थिक अमिषाला बळी न पडता अंतापूरकर याना निवडून दिल्याने ते आमदार होण्याचं सर्व श्रेय हे बिलोली देगलूर तालुक्यातील जनतेलाच जाते असे मत प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी व्यक्त केले आहे.      देगलूर विधानसभा मतदारसंघ हा 2009 साली अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झाल्याने येथील मतदारसंघावर अनेकांचे डोळे पडले त्यामध्ये शिवसेनेकडून सुभाष साबणे तर काँग्रेस पक्षाकडून तत्कालीन कॉंग्रेसच्या अनेक निष्ठावंतांना डावलून नवख्या असलेल...

अरळीतील पुरात पिता-पुत्र मृत्यू पावलेल्या कुटुंबाला 25 लाख मंजूर करा- केदार पाटील साळुंके

अरळीतील पुरात पिता-पुत्र  मृत्यू पावलेल्या कुटुंबाला 25 लाख मंजूर करा- केदार पाटील साळुंके बिलोली :-तालुक्यातील आरळी येथे  शेताकडे गेलेले शेतकरी शेख शादुल मेहबूब व त्यांचा मुलगा मेहराज शादुल शेख हे घराकडे परत येत असताना नाल्यास अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात वाहून दोघा पिता- पुत्राचा मृत्यू झाला घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे राहण्यासाठी पक्के घरही नाही अल्पभूधारक असलेल्या कुटुंबास शासनाने नैसर्गिक आपत्ती आपत्कालीन निधीतून तातडीची पंचवीस लक्ष रुपयांची मदत मंजूर करावी अशी मागणी अपर जिल्हाधिकारी श्री खुशालशिंह परदेशी यांच्याकडे निवेदन देऊन प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी केली आहे.      आरळी तालुका बिलोली येथील गावाच्या बाजूने जीगळा तळ्यावरुन मोठा नाला वाहत पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळतो सदरील नाला ओलांडून शेतकरी आपल्या शेताकडे नेहमी ये-जा करत असतात त्याच पद्धतीने शेख शादुल मेहबूब वय 45 वर्ष हा शेतकरीही शेतातील सोयाबीन पाण्याने भिजत असल्याने ते झाकण्यासाठी आपल्या दहावीत शिकणाऱ्या मेहराज शेख यास शाळेला...