सांगली महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या सरस्वती भुवन,औरंगपुरा औरंगाबाद येथील मैदानावरील राज्य अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष मा.नानासो.श्री.हरिभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने दिलीप वाघमारे व रेवसिध्द होनमोरे यांना सन्मानित करण्यात आले. दिलीप वाघमारे हे जि.प.प्राथ मराठी शाळा बाबरवस्ती (पांडोझरी)ता.जत जि. सांगली येथील शाळेत कार्यरत आहेत . वृक्ष संगोपन हा उपक्रम सलग तीन वृक्ष दुष्काळी भागात संगोपन केले आहे.शिक्षण व सामाजिक ,सास्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीने त्यांची सांगली जिल्ह्यातून निवड समितीने प्राथमिक गटातून शिक्षकाची निवड केली. होती,यापूर्वी त्यांना तालूका व जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच तासगाव मधिल जि. प.शाळा शिवाजीनगर, सावळज येथील शिक्षक रेवणसिद्ध होनमोरे यांनी ही शाळेतआजअखेर दहा लाखाचा शैक्षणिक उठावातून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण केल्या आहेत,शाळेत सुंदर अशी शिवसृष्टी तयार केली आहे,सतरा विध्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्त...