मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गागलेगाव येथील आरोग्य उपकेंद्र कर्मचारी यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश द्या; अन्यथा 12 आँगस्टला अमरण

बिलोली तालुक्यातील मौजे गागलेगाव येथे चार वर्षांपूर्वी मानव विकास योजनेतून सव्वा कोटी रुपये खर्च करून उपकेंद्राचे भव्य इमारत बांधण्यात आली आहे तेथील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधण्यात आले आहे दोन आरोग्य सेविका एक आरोग्य सेवक कर्मचारी कार्यरत आहे मुख्यालयाच्या ठिकाणी कर्मचारी राहत नाहीत त्यामुळे गावातील व परिसरातील गागलेगाव कोल्हेबोरगाव कुंभारगाव तोरणा हर्नाळ कांगठी खपराळा येथील नागरिक आरोग्य सेवेपासून व प्रस्तूतीच्या सेवेपासून वंचीत आहृ तरी आठ दिवसाच्या आत मुख्यालयी राहण्याच्या आदेश देण्यात द्यावे अन्यथा आरोग्य उपकेंद्र येथे कार्यालयासमोर 12 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा रासपचे तालुकाध्यक्ष आनंदराव जेमनाजी जिंके व सामाजिक कार्यकर्ते बालाजी लक्ष्मण अरकटवार निवेदन आरोग्य अधिकारी बिलोली यांना दिले..

नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी - मुख्याधिकारी जी.एस.पेंन्टे ,दुस-यांदा आरोग्य तपासणी,सर्वेक्षण सुरू

कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल) जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार कोविड 19 आजार समुळ उच्चाटनसाठी  शहरातील प्रत्येक घरातील सर्व सदस्यांचे दुस-यांदा आरोग्य तपासणी,सर्वेक्षण करण्यात येत असून.यापुर्वी पालीका प्रशासनतर्फे शहरातील 50 व त्या पेक्षा जास्त वयगटातील नागरीकांचे कोमाॅर्बीडीटी सर्वेक्षण पुर्ण झाले. 25 जुलै पासून शहरात विधानसभेच्या 10 बुथ प्रमाण नुसार शिक्षकांचे 10 पथक नियुक्त करून प्रत्येक पथकाला देण्यात आलेल्या बुथवाईज मतदार यादी प्रमाणे नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.यात नागरीकांचा शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण व तापमानाचे प्रमाण तपासणी करण्यात येत आहे.हे तपासणी पथक तपासणी करून परिपत्रक (अ) प्रमाणे माहिती संघटीत करून न.प.समन्वय अधिकारी रेंगडे यांच्याकडे दररोज माही देत आहे. तसेच यापुर्वीचा प्रथम टप्यातील कोमाॅर्बीडीटी सर्वेक्षणात शहरातील 50 वर्ष वय गटातील व त्या पेक्षा जास्त वयगटातील नागरीकांचे बी.पी,शूगर,पल्स ऑक्सीमिटर,थर्मलगणने तापमानाचे प्रमाण तपासणी करण्यात आले होते. एकंदरीत कुंडलवाडी शहरात जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार कोविड 19 आजार समुळ उच्...

बिलोली तालूक्यात कु.दुर्गेश्वरी सुरेश ढगे दहावी बोर्ड परिक्षेत 97% गुण घेवून सर्व प्रथम

कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल) महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा परीक्षेच्या निकाल बुधवार ( ता .२ ९ ) रोजी जाहीर करण्यात आला.या परीक्षेत बिलोली येथील लिटल फलावर काॅन्वेट स्कूल माध्यम (इंग्रजी) या शाळेची विध्यार्थीनी व कुडलवाडी येथील रहिवासी सुरेश सिद्राम ढगे यांची मुलगी कु.दुर्गेश्वरी सुरेश ढगे हिने दहावी परिक्षेत 97 टक्के गुण घेवून घवघवीत यश संपादन केले.व बिलोली तालूक्यात दहावी बोर्ड परिक्षेत सर्व प्रथम येण्याचा बहूमान मिळवीले.तीच्या या यशाबद्दल शाळचे प्रन्सिपल,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,आई - वडील,नातेवाईक यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार मुलीच्या माध्यमिक शाळेचा दहावीचा निकाल 97 टक्के

कुंडलवाडी प्रतिनिधी(मोहम्मद अफजल) शहरातील कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार मुलीच्या माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 97.14 टक्के लागला असून यंदाही विद्यालयातील यशाची परंपरा कायम राखून विद्यालयातून कु.शेख रूही बाबा 81.8% टक्के गुण घेऊन विद्यालयातून सर्व प्रथम येण्याचा बहूमान मिळवीली,कु.जामदार पुजा राजेंद्र 81.6% टक्के गुण घेऊन सर्व द्वितीय आली.तर कु. जजगेकर लक्ष्मी खाकोजी 79.2% घेऊन विद्यालयातून सर्व तृतीय आली.विद्यालयातून दहावी बोर्ड परिक्षेत 35 विद्यार्थ्यां परिक्षा दिले तर यातून 34 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले.विशेष प्राविण्यासह : 07,प्रथम श्रेणी : 12,द्वितीय श्रेणी : 10,उत्तीर्ण श्रेणी 05 त्यांच्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव सब्बनवार,सचिव डॉ.प्रशांत सब्बनवार,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक साईनाथ बाभळीकर तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नागनाथ मारोतीराव चटलूरे  आणि शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे हार्दिक अभिनंदन केले.

बिलोली उर्दु हायस्कुल दहावीचा निकाल 96% टक्के, कुरेशी उजैफ 94.80 टक्के घेवून शाळेत प्रथम

बिलोली शहरातील आयडीयल  एज्युकेशन  सोसायटी द्वारा संचलीत बिलोली उर्दु हायस्कुल चा दहावीचा निकाल 96 टक्के लागला असून  शाळेतून प्रथम  कुरेशी उजैफ अब्दुल रहीम दहावीत ९४.80% गुण मिळवुन सर्वप्रथम  क्र्मांक पटकावला आहे. तसेच गणित व विज्ञान  या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहे. 2) जवेरिया माहीम शेख फारुख 88 .%80 3)आदिला सदफ शेख मोहम्मद सिराज 88.40, 4)हुरेरा सदफ अब्दुल खय्यूम 82.20 5),मुनझ्झा सिमरन शेख अहेमद 80.%सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे व मुख्याध्यापकाचे संस्थेचे संस्थापक व सचिव हाजी एस.एस बावजीर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नगर सेवक जावेद कुरेशी यांनी केला कुरेशी हुजैफचा सत्कार घवघवीत यश संपादन केल्या बद्दल   नगरसेवक  जावेद कुरेशी यानी उजैफ ला  शाल व पुष्पहार देवुन सत्कार केला. यावेळी  बाबा कुरेशी  , अलीम कुरेशी ,शमशोदीन कुरेशी, मगदुम कुरेशी,आब्दुल हक, गफार कुरेशी ,अनवर कुरेशी आदी उपस्थीत हौते .

बिलोली शहरातील विद्यानिकेतन मुलींचे हायस्कूल दहावीचा निकाल 97.43 टक्के

बिलोली-  विद्यानिकेतन मुलींचे हायस्कूल दहावीचा निकाल 97.43 टक्के लागला असून इयत्ता  दहावी परिक्षेत 39 विद्यार्थीनींपैकी 38 विद्यार्थीनी उत्तीर्ण सर्वप्रथम ठाकूर आरती 88% द्वितीय वारघडे सोनल[84%] तृतीय -देवकरे रविना[81%]    सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे संस्थेचे अध्यक्ष बाबाराव एंबडवार , सचिव सुनिल एंबडवार , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती एंबडवार मॕडम , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री दगडे सर मार्गदर्शक शिक्षक  श्री सांडगे आर.एन. , श्री इनामदार डी.एस. , श्री धुळेकर सर , सौ.मानसपुरे मॕडम व संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या .

जिल्हा परिषद हायस्कूलचा दहावी परिश्रेचा 83% निकाल

कुंडलवाडी (मोहम्मद अफजल) शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल चा मार्च 2020 दहावीचा परिश्रेचा निकाल 83% टक्के लागला असून विद्यालयातून वगशट्टे लोकेश शिवराज 64.80 टक्के गुण सर्वप्रथम व शेट्टीवार सतीष गंगाधर 50.80 टक्के व शेख आसिफ हाजी 50.80 टक्के गुण घेऊन सर्व  दिव्यतीय आले आहे.तर शेख सुलेमान समद 46.60 टक्के गुण घेवून सर्व तृतीय येण्याचा बहूमान यश संपादन केले.त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.पी.शेट्टीवार,व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मोहम्मद अफजल,हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक बी.एच.रामोड,एस.डी कमठाणे सर,जी.के बोईनवाड सर,जियाओदीन ईरफान सर,जुबेर सर,अनवरी मॅडम,दिलशाद मॅडम,राजू बोधनकर आदींनी अभिनंदन केले

के.रामलू विद्यालयाचा दहावीचा निकाल दुसऱ्या वर्षीही 100% टक्के

कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल) श्री कुंडलेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.रामलू पब्लिक स्कूल माध्यम (इंग्रजी) या विद्यलयाचा मार्च 2020 दहावी बोर्डाचा निकाल दुस-यावर्षी सुद्धा यशाची परंपरा कायम राखत दुस-यांदा 100% टक्के निकाल लागला.तर कुंडलवाडी दाहावी परिक्षा केंद्रात के.रामलू विद्यालयातील विद्यार्थ्यी प्रथम,द्वितीय,तृतीय येण्याचा बहूमान मिळवीले.विद्यालयातून कु.निकिता अशोक पडकुटलावार  97% टक्के गुण घेऊन विद्यालयातून व केंद्रातून सर्व प्रथम आली आहे व कु.शीतल लीलाराम जोशी ही 96 % गुण घेऊन विद्यालयातून व केंद्रातून द्वितीय आली आहे तर रोहित शेखर म्हैसेवाड हा 95 % गुण घेऊन विद्यालयातून व केंद्रातून तृतीय आला आहे. के.रामलू विद्यालयातून दहावी परिश्रेत एकूण २1विध्यार्थी बसले होते.21 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांना 90 % पेक्षा जास्त गुण तर 10 विद्यार्थ्यांना 80 %पेक्षा जास्त गुण घेवून यश संपादन केले.यशवंत व गुणवंत  सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केलेल्या व अध्यापन केलेल्या शिक्षक आणि शिक्षिका यांचे शाळेचे अध्यक्ष साईरेड्डी ठकुरवार ,सचिव यशवंत संगमवार, संचालिका सौ.रमा...

मिलिंद विद्यालयाची यशाची परंपरा कायम सेमी इंग्रजी चा निकाल 100 टक्के मुलीनी मारली बाजी

                    कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल) येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखत यंदा इयत्ता दहावी सेमी इंग्रजी परीक्षेचा निकाल दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा 100 टक्के  लागला असून शाळेतून सर्वप्रथम कु. माहेश्वरी इरवंता चंदनकर (94.40), सर्व द्वितीय कु. प्रगती पांडुरंग होळकर (92.20), तर सर्व तृतीय  कु. शितल रंजीत चंदनकर (86. 80 )टक्के गुण प्राप्त केले आहेत. यंदा इयत्ता दहावी मराठी आणि सेमी विभागाचा निकाल एकत्रित  92.30 तर  सेमी चा निकाल 100 टक्के लागलेलाआहे. सदर परीक्षेत शाळेतून 130 पैकी 120 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात विशेष प्राविण्यासह 22 ,प्रथम श्रेणीत 34, द्वितीय श्रेणीत 42 तर 22  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .विशेष म्हणजे शाळेत सेमी इंग्रजी आल्यापासून 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखण्यात यश प्राप्त झाले आहे .या  सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर, शाळेचे मुख्याध्यापक यु.एस.राठोड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर क...

आरळी श्री.गजानन विद्यालय दहावीचा 100% निकाल

बिलोली (मोहम्मद अफजल ) तालूक्यातील आरळी येथील श्री.गजानन मा.विद्यालयाचा दहावी बोर्ड परिश्रेचा निकाल 100% लागला असून विघ्यालयातून सर्व प्रथम येण्याचा बहूमान किरण धोंडीबा याबाजी 85.8%,द्वितीय कु. द्वारका रामदास ईबतेवार 85.6%,तृतीय   कु.पल्लवी निळकंठ बोडके 75.4% टआलेक्के गुण घेवून यश संपादन केले आहेत.दहावी परिश्रेत विद्यायातून 35 विद्यार्थी परिक्षा दिली होती.35 ही विद्यार्थी पास झाले यात विशेष प्राविण्य 3 प्रथमश्रेणी 11 द्वितीय श्रेणी 12 उत्तीर्ण =9 होवून विद्यालयाची यशाची परंपरा कारम ठेवली याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. हाजप्पा पाटील सुंकलोड,मुख्याध्यापक श्री.चिवटे जि.एस. व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.सर्व विद्यार्थ्यांना भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे सीआर मशीनचे उद्घाटन

नांदेड - क्ष-किरण कोवीड १९ विभाग उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील सीआर मशीनचे आज डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या हस्ते उद्घाघाटन झाले.  यावेळी डॉ.अनंत पाटील वैद्यकीय अधीक्षक मुखेड, टाकसाळे, विनोद सम्राट,मोहिनुद्दीन शेख व उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते..

कुंडलवाडी माध्यमिक उर्दूविद्यालयाचा सतत आठव्या वर्षी शंभर टक्के निकाल

                             डॉ. झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय कुंडलवाडी    मार्च 2020 दहावीचा निकाल 100 शंभर टक्के लागला असून  सतत आठ वर्षापासून शाळेचा निकाल शंभर टक्के आहे यंदाही हा निकाल कायम राहिला.  शाळेतून सर्वप्रथम  कुलसुम शौकत अली हिने 84 टक्के गुण घेऊन व  सानिया मोहम्मद 78 टक्के गुण घेऊन दिव्यतीया आली आहे. या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शका एम ए जलील सर मुख्याध्यापक अब्दुल माजिद सर सहशिक्षिका आशिया नसरीन,  स्मित दाचl वार   , मोहमदीबेगम,  आयशाबेगम,  सहशिक्षक इद्रिस, फु जे ल सर आदींनी अभिनंदन केले

अंकुश वाघमारे व सचिन वाघमारे यांच्या निवडी बद्दल शंकरनगर येथे सत्कार

     मानवहित लोकशाही पक्ष हा  लहुजी- शाहू -फुले -आंबेडकर या थोर महापुरुषांच्या विचारांवर आधारित महाराष्ट्रातील समाज बांधवांचा उध्दार करण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या स्वातंत्र्याच्या विचारांची चळवळ गतिमान करण्यासाठी तसेच मानवाच्या न्याय हक्कासाठी मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णाभाऊ साठे यांचे नातु सचिन भाऊ साठे यांच्या आदेशानुसार 'अंकुश वाघमारे रामतिर्थकर' यांची मानवहित लोकशाही पक्ष नांदेड जिल्हा युवा उपध्यक्ष पदि तर सचिन वाघमारे यांची बिलोली तालुका आध्यक्ष पदीनिवड करण्यात आली.    त्यांच्या निवडी बद्दल सत्कार करताना फुले शाहु अंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते भास्कर भेदेकर,  सुनिल कांबळे, आसिफ शेख.ब्रम्हा कांबळे. धनराज कांबळे.नागेश वाघमारे.लखन कांबळे.श्रिकांत कांबळे.विशाल वाघमारे.माधव वाघमारे.जिवन कांबळे.सदाशिव बोईवार. महेश कांबळे. शैलेश शिंदे अदी उपस्थित होते.

साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वताची काळजी घेणे गरजेचे; डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक भोकर

भोकर-  भोकर शहर आणि परिसरातील कोरोना साथीची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक  होत आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, पोलीस, नगर परिषद, पत्रकार,मिडिया आणि सेवाभावी संस्थांनी आजपर्यंत केलेले प्रयत्न  प्रशंसनीय आहेत. रुग्णसंख्या जवळपास ७ झाली असून १ रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ४ महिन्यापासून  सर्वजण चिंताग्रस्त आणि भयभीत झाले आहेत. साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वताची काळजी घेणे गरजेचे; डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक भोकर      खालील बाबींवर सर्वांनी गंभीर विचार करून कृती करणे गरजेचे आहे असे मला वाटते. १-अन्न, पाणी या  प्रमाणे मास्क ही सुद्धा जीवनावश्यक बाब आहे . Sanitizer-Mask-Social distancing(SMS) या त्रिसूत्रीस पर्याय नाही. नाकातोंडावर मास्क असल्याशिवाय दवाखाना, दुकाने, कार्यालये आदि ठिकाणी प्रवेश व सेवा मिळणार नाही अशी कडक भूमिका घ्यावी.     मास्क हाच टास्क असला पाहिजे . २- प्रत्येक व्यावसायिकाने (डॉक्टर्स सर्व व्यापारी, कार्यालये,आडत इ.)  आपल्या कर्मचार्यांना मास्क, फेस शिल्ड, ग्लोव्ह...

कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पावलेल्यांच्या परीवाराला आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत तत्काळ आर्थिक मदत करा :- राहुल साळवे यांनी केली राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :-कोवीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ लागु करण्यात आला आहे अशा आपात्कालीन परिस्थितीत तातडीची गरज या सबबीखाली राज्यांनी विविध उपाययोजना करत तातडीची आर्थिक मदत व पुनर्वसन करणे गरजेचे आहे.दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीत आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई, आर्थिक मदत इत्यादी वैद्यानिक उपाय होने गरजेचे आहे.सध्या कोरोना या महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन शेकडो जनांना नाहक आपले प्राण गमवावे लागत आहेत शासन स्तरावरून  एकिकडे शासकिय कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्यास त्याच्या परीवाराला लाखो रूपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे म्हटले जाते तर दुसरीकडे या महामारीत मृत्युमुखी पडलेल्या गोरगरीब जनतेच्या परीवाराला अद्याप कुठलीच आर्थिक मदत देण्याबाबत विचार केला गेला नाही या वैश्विक महामारीत मृत्युमुखी पडलेल्या गोरगरीबांना हि परीवार आहे आणि काही कर्ते धर्ते कमावतेच लोकच मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणार्या त्यांच्या परीवारांवर फार मोठे आर्थिक संकट ओढावले आहे तसेच एकतर १४ दिवस काॅरंटाई...

हिंगणी-बडुर रस्त्यावरील पुल रखडला, 4 तास वाहतुक झाली ठप्प

बिलोली (इलियास शेख) तालुक्यातील हिंगणी ते बडुर ३ किमी रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १ कोटी ५४ लाख रुपये मंजुर झाले असुन रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी सिमेंट-कॉंक्रेट ऐवजी मजुराद्वारे सर्रासपणे दगड वापरले गेले असुन वरिष्ठ अधिका-यांनी तपासणी करुन पुलाचे काम थांबविण्याचे आदेश दिले.परंतु मुजोर गुत्तेदारांने अभियंत्यांच्या आदेशाला धुतकारुन त्या पुलाचे बांधकाम थातुर-मातुर केल्याने पावसाच्या पाण्याने पुलावर चिखल जमा झाल्याने तब्बल ४ तास वाहतुक ठप्प झाली. गेल्या २० वर्षापासून केवळ डागडुगीवर चालत असलेल्या रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने आजी-माजी सरपंचाच्या पाठपुराव्याने शासनाकडुन लाखो रुपयांचा निधी मंजुर झाला असुन सदर रस्त्याचे रुंदीकरण व याअंतर्गत येणाऱ्या पुलाचे बांधकाम हे ७०% बोगस होत असुन ३०% काम इस्टीमेंट प्रमाणे होत आहे.पुलाच्या बांधकामासाठी '१.४५सेमी टॉप' मध्ये लागणारी सिमेंट रेतीची बचत करण्यासाठी संबंधित ठेकेदार दगडाचा वापर करीत असल्याचे संभाजी ब्रिगेडचे सुनिल पाटील नरवाडे यांनी उघडकीस आणले होते.परंतु याकडे ना गुत्तेदार,ना अभियंत्यांनी लक्ष दिले नसल्याने...

जिल्हा परिषद बदली प्रकरणात दिव्यांग कर्मचार्यांचे आँनलाईन मेडिकल प्रमाणपत्र तपासूनच प्रक्रिया पूर्ण करा;राहुल साळवे यांनी केली तक्रार दाखल.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेअंतर्गत बहुचर्चित जिल्हा स्तरावरील बदल्यांचे समुपदेशन वेळा पत्रक दि २२ जुलै रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या स्वाक्षरीने करण्यात आले तसेच या संदर्भातील आदेशाला मंजुरी हि देण्यात आली त्यानुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २६ ते ३० या चार दिवसांत बदल्यांची प्रकिया चालणार असल्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे या बदली प्रक्रियेचा लाभ घेण्यासाठी काही कर्मचार्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले असावेत अशी दाट शंका बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांना आली आहे कारण असे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासन सेवत भरती झालेल्या कर्मचार्याचे प्रकरण ईतर जिल्ह्यात ऊघडकिस आलेले आहेत या प्रमाणपत्राआधारे नजीकचे ठिकाण.बदली प्रकरणात सुट.ईन्कम टॅक्समध्ये सवलत.पदोन्नती यासह ईतर विवीध सुविधा मिळतात त्यामुळे राहुल साळवे यांनी आपले सरकार पोर्टलवर मुख्यमंत्री आणि जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दाखल केली आहे आणि या तक्रारीत म्हटले आहे की.जिल्ह...

जलदूत प्रकल्पाच्या माध्यमातून मांजरम येथे वृक्षारोपण

वृक्षलागवड करून त्याची निगा राखण्यासाठी पालकत्वाची दिली जबाबदारी . प्रतिनिधी दि.२३/०७/२०.   सेवावर्धिनी संस्था पुणे व संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने अटलास कापको संस्था पुणे यांच्या सहायातून मौजे मांजरम ता.नायगाव येथे महत्वाकांशी जलदूत 2.0  प्रकल्प प्रगतिपथावर आहे. पाण्याचा वापर,मृद व जलसंधारण व त्याची शाश्वतता निर्माण करणे यासाठी तांत्रिक व सामाजिक दृस्त्या माहिती तळागाळापर्यंत पोहचविणे व गावातून मृद व जलसंधाणाची परिपूर्ण माहीतगार तथा जलदूत निर्माण करणे हा मुख्य उद्देश जलदूत प्रकल्पाचा आहे. गावात विविध तांत्रिक माहिती संकलन सर्वेक्षणामार्फत सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आज दि.21 जुलै रोजी स्थानिक देशी वृक्षांचे महत्व गावकर्‍यांना सांगून देशी प्रजातींच्या लागवड करण्याचा कार्यक्रम संस्थेने ग्रामपंचायत च्या सहकार्‍यातून हाती घेतला आहे. विविध स्थानिक प्रजाती जसे वड,पिंपळ,बकुळा,कदंब,कडूनिंब,उंबर,करंज व कांचन आदि वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जि.प.शाळा,ग्रामपंचायत,कुसुमताई चव्हाण कन्या शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाना,गावा...

बिलोली तालुका समतादुत शेख इर्शाद मौलाना यांच्या मार्फत आर टी ई चे आॕनलाईन मोफत अर्ज भरण्यात आले

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समतादुत प्रयत्नशील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत डाॕ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे तर्फे कार्य करणारे बिलोली तालुका समतादुत शेख इर्शाद मौलाना यांच्या मार्फत आर टी ई चे आॕनलाईन मोफत अर्ज भरण्यात आले त्या गरिब विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेश मिळालेला आहे. बार्टी मार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजना मागासवर्गीय जातीचे सर्वेक्षण ,आरटीई प्रवेश प्रक्रिया ,निवासी शाळा प्रवेश ,आॕनलाईन स्पर्धा परिक्षा,अण्णाभाऊ साठे गित गायन स्पर्धा ,कोरोना विषयी जन-जागृती,मोफत अन्न-धान्य किट वाटप,सॕनिटायझर व मास्क वाटप ,स्मशानभूमी वृक्षारोपण,स्वाधार शिष्यवृत्ती योजना,रमाई आवास योजना, कृषी योजना,इत्यादीच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम समतादुत करत आहे . सदर कार्यक्रम करण्यासाठी बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, निबंधक यादवराव गायकवाड ,मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे,व नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी सुजाता पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व समतादुत बार्टीच्...

लोकप्रतिनिधींना शासकीय रुग्णालयांवर भरोसा नाय का ? राहुल साळवे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सध्या कोरोना या महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असुन यात ना जात पात धर्म ना उच्च निच ना गरीब श्रीमंत असा कुठलाच भेदभाव न होता या संसर्गाची लागन सरसकट सर्वांनाच होत आहे त्यामुळे सर्व शासकीय रूग्णालये आणि खाजगी रुग्णालयात सुद्धा रुग्ण वाढत आहे जात आहेत तसेच मृत्युचे प्रमाण हि दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत परीणामी लाॅकडाऊन हाच एकमेव पर्याय प्रशासनापुढे येतो आणि शेकडो गोरगरीब ज्यांचे हातावर पोट आहे अशांना विविध संकटांचा आणि भुकमारीसह बेरोजगारीचा हि सामना करावा लागतो. "सरकारी काम बारा महिने थांब" या म्हणीप्रमाणेच आज कोरोना या संसर्गावर उपचार घेत असलेल्या शासकीय रूग्णालयातील बाधीत रूग्णांवर ऊपचार घेतांना येऊन ठेपली आहे एकिकडे शासन स्तरावरून कोरोना बाधीत रूग्णांवर महात्मा फुले जिवनदायी योजणे अंतर्गत विविध खाजगी आणि शासकीय रूग्णालयात एक ते दिड लाख रूपयांपर्यत ऊपचारासह सर्व सोई सुविधा निशूल्क केलेल्या असतांना बर्याचशा शासकीय रूग्णालयात सुविधेचा अभाव पाहावयास मिळत आहे. एखाद्या सर्व सामान्य गोरगरीबाचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला असता त्याला लगेच नजीकच्या...

जोहा खानम विज्ञान शाखेत 89.84 टक्के घेवून बिलोली तालूक्यातुन सर्व प्रथम

 बिलोली-  सौ. मंजुळाबाई कॉलेज खतगाव येथील जोहा खानम नासर अली खान या  विद्यार्थिनीने  89.84 टक्के घेवून विज्ञान शाखेत तालुक्यातून सर्वप्रथम आली आहे. बिलोली येथील  उर्दू विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक नासर खान यांची मुलगी आहे. या यशानंतर संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील खतगावकर मु.अ.पिनलवार सर,सचिव बाळासाहेब पाटील आदींनी आभिनंदन केले.

ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ महाराष्ट्र या संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी कवी जाफ़र आदमपूरकर

नांदेड :बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील युवा कवी, गीतकार व मुक्त पञकार जाफर आदमपूरकर यांची ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य चळवळ महाराष्ट्र या संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या चळवळीचे जिल्हा अध्यक्ष शेख निजाम गवंडगावकर यांच्या परवानगीने नुकतेच त्यांना कवी, गीतकार व संगीतकार प्रा.संदीप भुरे यांच्या हस्ते नियुक्ती पञ दिलेले आहे. ग्रामीण भागातील मुस्लिम मराठी कवी, लेखक, कादंबरीकार, नाटककार यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्या अडी अडचणी दूर करणे आणि मराठी साहित्य समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, ग्रामीण भागातील मुस्लिम युवकांना लिहिते व बोलके करणे, मुस्लिम युवकांची जडणघडण, आविष्कार व स्वतःला व्यक्त करण्यासाठी वैचारिक मानसिकता बनवणे इत्यादी ध्येय या चळवळीचे आहेत. या चळवळीचे संस्थापक अध्यक्ष कवी शेख शफी बोल्डेकर तर मराठवाडा प्रमुख अॅड. हाशम पटेल आहेत. कवी जाफ़र आदमपूरकर सरांची महत्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे शेख युसूफ कंधारकर, डाॅ.जब्बार पटेल, सय्यद कुतुब, अय्युब नल्लामंदू आदींनी अभिनंदन केले आहे.

बिलोलीच्या जेष्ट पञकाराने कोरोनावर केली मात

बिलोली        गेल्या काही दिवसापुर्वी स्वतः हून कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वँब दिलेल्या शहरातील एका जेष्ठ पञकाराचा कोरोना रिपोर्ट पाँझिटीव्ह आला होता.स्वँबचा अहवाल पाँझिटीव्ह आल्यानंतर स्वत कोव्हीड सेंटरला दाखल झालेल्या त्या जेष्ठ पञकाराने कोरोनावर मात केली.  काही दिवसाच्या उपचारासाठी देखरेखीखाली होते .      जगभरातील विविध देशासह भारतात कोरोनाचे रूग्ण आढळू लागताच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मार्च महिन्यात पहिल्यांदा लाँकडाऊन करण्यात आले.या लाँकडाऊनची स्थानिक पातळीवर महसुल,पोलिस,आरोग्य,नगर परिषद प्रशासनाच्या वतीने प्रभावी अमलबजावणी करण्यात येत असताना त्या जेष्ठ पञकाराने लगतच्या तेलंगणा राज्यातुन बिलोली  तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊनये यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांच्या संपर्कात राहून शहरातील राज्य महामार्गावरून शहरात जाणारे जोड रस्ते बंद करण्यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतला होता.तद्नंतर सिमावर्ती भागात असलेल्या काही प्रमुख गावातील सरपंच व पोलिस प्रशासनाशी संवाद साधून तेलंगणातुन छुप्या पद्धतीने ये जा करणाऱ्यांवर आळा बसविण...

कोरोना रूग्णाचे वर्तमानपत्र व सोशल मिडीयात नाव जाहिर करणाऱ्या"त्या" व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश

,   बिलोली         शहरातील एका व्यक्तीवर  कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्या कोरोना बाधित व्यक्ती  चे नाव एका कार्यक्रमातील फोटोसह सोशल मिडीया व वर्तमानपञात प्रसारीत करण्यात आले.कोरोना बाधित वेक्तीचे नाव प्रसारीत करणाऱ्या त्या" वार्ताहारावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्याची माहिती देण्यात आली आहे.     देशासह राज्यात आढळून आलेल्या कोरोना पाँझिटीव्ह  रूग्णांसाठी शासनासह वैद्यकीय विभाग दिवसराञ परिश्रम घेत आहे.कोरोना रूग्ण बरा व्हावा यासाठी विविध प्रकारचे प्रयोग शासन राबवत असून पाँझिटीव्ह रूग्णाचे आजारा विरूध्द लढण्यासाठी मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.कोरोना बाधित रूग्णाचे नाव जाहिर होऊ नये या उद्देशाने शासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असताना बिलोली शहरातील एका वेक्तीने काही दिवसांपुर्वी स्वतः हून आपला स्वँब तपासणीसाठी दिला होता.तपासणी साठी दिलेल्या स्वँब चा दोन दिवसांनी पाँझिटीव्ह अहवाल प्राप्त झाला.अहवाल प्राप्त होताच त्या वेक्तीने स्वतः  केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले.कोरोना पाँझिटीव्ह ...

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष पदी शिवव्याख्याते श्याम कपाळे

शिराढोण:  कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या मराठवाडा कार्याध्यक्ष पदी कंधार तालुक्यातील शिराढोण येथील श्री. श्याम बालाजी पा. कपाळे यांची  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीपदादा ननावरे, राज्यकार्याध्यक्ष प्रविण भैया आजबे ,मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संकेत गरड व राज्य कार्यकारिणी यांचा सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. मराठवाड्यातील व परिसरातील  कृषी पदवीधरांचे व बळीराजाचे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व संघटनेचे विविध उपक्रम  राबविण्यासाठी कपाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   व्याख्यानाच्या माध्यमातून शिव- फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे कार्य ते करतात. त्यांच्या ह्या निवडीमुळे भीमाशंकर विद्यालयाचे प्राचार्य तथा उपसरपंच खुशाल पाटील पांडागळे, माजी उपसरपंच साईनाथ पाटील कपाळे, माली पाटील व्यंकटराव पाटील पांडागळे,मेजर किशन कपाळे साहेब ,प्रशांत पाटील कपाळे, पत्रकार शुभम डांगे, सुनील भरे, दौलत पांडागळे आदींनी अभिनंदन केले.

संतोष कुलकर्णी मिञ मंडळाच्या वतीने बिलोलीत पञकारांना मास्क, सँनिटायझरचे वाटप

बिलोली      सध्याच्या कोरोना काळात विविध स्तरावरील कोरोना योध्याना मास्क व सँनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे.माञ वृत्तपञ व मिडीयात काम करणाऱ्या प्रतिनिधींकडे सर्वांचे दुर्लक्ष होत होते.याच गोष्टीचा विचार करून संतोष कुलकर्णी मिञ मंडळाच्या वतीने बिलोली शहर व परिसरातील पञकारांना एन 95 मास्क,सँनिटायझर  तहसिलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.      गेल्या चार महिन्यापासून सर्वञ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे.या काळात काम करणाऱ्या डाँक्टर,प्रशासकीय अधिकारी /कर्मचारी व इतर लोकांचा विविध संघटनांच्या वतीने कोव्हीड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.माञ कोरोना सारख्या बिकट काळात नागरिक व प्रशासनातील दुवा म्हणून काम करणाऱ्या वर्तमानपञ व मिडीयाच्या प्रतिनिधींच्या कार्याची दखल घेण्यात आली नाही.हिच बाब लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन दि.९ जुलै रोजी बिलोली शहर व परिसरातील पञकार व वृत्तपञ विक्रेत्यांना मास्क,सँनिटायझर  वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाँ.नागेश लखमावार,पञकार गोविं...

भीमराव जाधव यांची शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड

नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्तान ,मराठवाडा उपाध्यक्ष पदी श्री.  भीमराव जाधव यांची निवड संस्थापक अध्यक्ष, शिवश्री विजय दादा चव्हाण मुंबई , यांनी शिवाजी महाराज सेना मराठवाडा अध्यक्ष श्री. अरुण जाधव व ब्र गजानन जी बापू संभाजीनगर . श्री. यांचे हस्ते करण्यात आली. भीमराव जाधव हे मौजे पाचपिंपळी ता. बिलोली जि. नांदेड येथील रहिवासी असून यांचे विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याची सुरुवात केली. व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी त मदत करणे  , त्यांना लागणारे पुस्तके देणे,तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये पण त्यांचे खूप मोठे कार्य आहे .जसे वृक्षारोपण , वृक्षसंवर्धन, पशुसंवर्धन व्यसनमुक्ती, गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप. इत्यादी  आजपर्यंत च्या कार्ययांची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहीर करून त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या निवडी बद्दल श्री .भीमराव जाधव यांचे सतीश चव्हाण पुणे , गजाननजी बापू संभाजीनगर , शिवप्रतिष्ठान आष्टी , शिव प्रतिष्ठान अंबाजोगाई , शिवप्रतिष्ठान हि...