नायगाव / आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा भारतीय प्रजासत्ताक पाटीर्चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुरेशदादा गायकवाड यांनी प्रजासत्ताक पार्टी च्या बैठकीसाठी आले आसताना नायगाव येथिल डॉ . हेडगेवार चौका मध्ये फटाक्यांची आतशबाजी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी चौकातून स्वागत करून घोषणाबाजी करत विश्रामग्रहा पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.यावेळी सुरेशदादा गायकवाड मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने पाटबंधारे विश्रामगृह नायगाव येथे भारतीय प्रजासत्ताक पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी या बैठक आयोजित करण्यात आले होते. प्रथम फुले शाहु आंबेडकर महापुरूषांना आभिवादन करून बैठकीला सुरवात करण्यात आली. या वेळी भारतीय प्रजासत्ताक पार्टी चे संस्थापक आध्यक्ष सुरेशदादांना गायकवाड व फुले शाहु आंबेडकर चळवळीतील जेष्ठ नेते पि.एस.गवळे ,युवा नेते स्वप्नानी नरबाग ,भास्कर भेदेकर,बस्वेश्वर गुडपे,नितीन रोडे आदींनी यावेळी बैठकीला मार्गदर्शन केले. प्रस्ताविक राहुल गायकवाड यांनी केले तर स...