बौध्द आणि बौद्धेत्तर दलितांचे न्याय्यहक्क संघर्ष करुन मिळविणारी संघटना म्हणून एकोणाविसशे बाहात्तर सालातील २९ मे या दिवशी दलित पँथर नावाची आक्रमक संघटना उदयास आली. आक्रमक मार्गाने आंदोलन, सामाजिक विचारांचे प्रबोधन, सर्वव्यापी लोकहित ही मध्यवर्ती भूमिका दलित पँथर या संघटनेची होती. इथल्या मागास, कष्टकरी, कामगार, भूमीहीन, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, भटक्या जाती जमाती, आदिवासी व इतर तत्सम घटकांना सोबत घेऊन सामाजिक लढा उभारण्यात यशस्वी झालेली मजबूत संघटना म्हणून पँथरची ओळख होती . जात, धर्म, वर्ण विरहित, शोषणमुक्त, सुखी-समृद्ध आणि सुसंस्कृत तसेच विज्ञानवादी, समतावादी समाजनिर्मितीचे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करीत असलेल्या या चळवळीकडे आकृष्ट होऊन अगदी वयाच्या पंधराव्या वर्षी दलित पँथरच्या माध्यमातून नामांतर लढ्यात सहभागी झालेले पत्रकार प्रा.डॉ.गंगाधर तोगरे आजच्या पत्रकारितेतील संघर्षशील पँथर म्हणून चळवळीचा वारसा पुढे नेत आहेत. त्याच कालखंडात १९७२-७३ च्या जिवघेण्या दूष्काळात जीवनयातनांचे क्लेशदायक अनुभव त्यांच्याही वाट्याला आलेले होते. अशा नाजूक काळात कडुनिंबाच्या झाडाखाली पसरल...