मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गीन्नी या लोकगीताच्या गाण्याला मिळाला चांगला प्रतिसाद

 ऑरेंज म्युजिक हैद्राबाद प्रस्तुत   गीन्नी मी उडवली" हे बहारदार धम्माल  लोकगीत रसिकार्पित झाले आहे. ह्या गीताला एका दिवसात तब्बल दहा हजार लोकांनी ऐकण्याचा उच्चांक केला आहे,उभ्या महाराष्ट्रातील उदंड प्रतिसाद पाहून गीन्नी या लोकगीताचे D.j.रिमिक्स करण्यात आले आहे. ह्या दोन्ही गीतांना रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सदरील गीताचे गीतकार तानसेन लोकरे  गायक सिध्दार्थ गजघाटे व संगीतकार प्रा संदीप भुरे आदमपुरकर ध्वनीमुद्रक प्रकाश माने मुंबई हे आहेत. या बद्दल, गुरुवर्य,प्रा.बाबुराव उप्पलवार, प्रशांत सिंघटे साहेब, रणजीत जाधव सर, गायक शितल कुमार माने, गीतकार जाफर आदमपुरकर, लेखक दर्शन भंडारे सर, विशाल राक्षे मुंबई , पत्रकार काशिनाथ वाघमारे , पत्रकार, शेख इलियास,पत्रकार रियाज सय्यद ,प्रत्रकार मारोती भुसावळे,पत्रकार धम्मदीप भुसावळे, राम चिंतले , दिलिप भुरे, धम्मपाल कांबळे,अॅडव्होकेट अविनाश सुर्यवंशी, संजय जाधव,सुरेश जाधव कपिल भुरे प्रा.सुनिल भुरे सिध्दार्थ भुरे आदी सर्वच कौतुक होत आहे..

कृषिमंत्री दादा भुसे यांनी रयत क्रांती संघटनेचे निवेदन

ओला दुष्काळ जाहीर करा व पीक विमा लागू करा     महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी भागांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर होते. त्याचा सोबत माजी आमदार सुभाष साबणे होते.    नांदेड वरून मुखेड कडे जात असताना मांजरम शिवराच्या परिसरात रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन नायगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा व खरीब हंगामासाठी पीक लागू करा अशी मागणी केली.  पांडुरंग शिंदे निवेदनात म्हटले की, नांदेड जिल्ह्यात विशेषता नायगाव तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे शेतीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोगस सोयाबीन पिकाची भरपाई अद्याप शेतकऱ्याला मिळाली नाही. शेतकऱ्यांनी दुबार- तिबार सोयाबीन पिकाची पेरणी केली. कापणीला आलेले सोयाबीन अतिवृष्टीमुळे वाया गेले आहे.  यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे मुग, उडीत, सोयाबीन, कापूस, तुर, मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वे करण्यात व पंचनामे करण्यात ...

बिलोली तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मंजुर करा; डॉ.के.बी कासराळीकर

   बिलोली तालूक्यात   तालुक्यातील दिनांक 15 सप्टेंबर ते आज पर्यंत  पडलेल्या जोरदार पावसाने अतिवृष्टी होऊन शेतामध्ये मोठया प्रमाणात पाऊस साचल्यामूळे शेतातील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी व इतर पिकांची 40 टक्के पेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे. सद्या कोरोना महामारी मुळे नागरिक व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. तालुक्यातील सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा असून सोयाबीनचे  मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी सर्व पिकांचे नुकसान झाले असून तरी शेतकर्याना पिक विमा त्वरीत द्यावा  व ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरले नाहीत त्यांना देखील शासना कडून हेक्टरी 25 हजारची नुकसान भरपाई द्यावी शासनाने शेतक-या कडे लक्ष द्यावे अशी मागणी माजी.रोजगार हमी योजना बिलोलीचे अध्यक्ष  डॉ.के.बी कासराळीकर यांनी केली आहे.

संभाजी ब्रिगेड नायगांव विधानसभा व तालुका कार्यकारिणी जाहीर

     नायगाव (ता.प्र) संभाजी ब्रिगेडची महत्वपुर्ण बैठक नायगाव येथे पार पडली.या बैठकीत नायगाव विधानसभा अध्यक्ष,नायगाव तालुकाध्यक्ष,नायगाव शहराध्यक्ष व इतर विविध पदांची घोषणा करण्यात आली.*      संभाजी ब्रिगेडने गेल्या अनेक वर्षापासुन महाराष्ट्रभर सामाजिक ,शैक्षणीक,शेतकी व युवकांच्या क्षेञात भरीव कार्य केले आहे.येणार्या काळात संभाजी ब्रिगेड १००%समाजकारण १००%राजकारण करणार आहे. असे मत यावेळी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी व्यक्त केले.गाव तेथे कार्यकर्ता,गाव तेथे शाखा स्थापन करने हे काम पदाधिकार्यांनी करणे गरजेचे आहे.सरसकट मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करणे हेच खरे आरक्षण ठरेल आसे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील यांनी मत व्यक्त केले.यावेळी संभाजी ब्रिगेड विधानसभा अध्यक्षपदी श्रीधर हंबर्डे,तालुकाध्यक्षपदी श्रीनिवास शिंदे,शहराध्यक्षपदी अविनाश चव्हाण,जिल्हासंघटकपदी शिवराज शिंदे,विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्षपदी केदार कहाळेकर,तालुका उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिंदे,सोशल मिडीया तालुकासचिवपदी अवधुत शिंदे यांची निवड लोकसभा अध्यक्ष संकेत पा...

कुंडलवाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅक अंतर्गत शेतक-यांना चार कोटी आठ लाख रुपये पिक कर्ज वाटप

बिलोली प्रतिनिधी ( प्रल्हाद पाटील ). कुंडलवाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅकेत या वर्षी कर्जे माफीत आलेले  पाञ  568 शेतक-या पैकी 528 शेतकऱ्यांना कर्जेमाफी  प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा झाले.बाकी 40 शेतक-याचे शिल्लक राहिलेले माफीचे कर्जे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले नसुन यात 40 शेतक-याचे खाते ञुटीत आले असुन यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही व काही मयत खातेदार असल्यामुळे कर्जे माफीचे बॅकेत पैसे जमा झाले नाहीत.यामध्ये 223 खातेदार ना मे जुन महिन्यात नवीन कर्जे ही वाटप करण्यात आले आता पर्यंत महाराष्ट्र ग्रामीण बॅकेत पिक कर्जे 4 कोटी 8 लाख रुपये कर्ज वाटप शेतक-यांना करण्यात आले आहे त्यामुळे  महाराष्ट्र ग्रामीण बॅक हे   पिक कर्जा साठी    शेतक-यांना एक वरदान   ठरली असुन या बॅके अंतर्गत दहा गावातील शेतकऱ्यांना पिक कर्जे वाटप केले असून  आतापर्यंत 751 शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले आहे. अजुन ही  नविन प्रस्ताव  पिक कर्जासाठी  प्राप्त झाले त्यांचे ही काम प्रगतीपथावर असुन पुर्ण कागदपञे जमा झाले की त्यांना ही पिक कर्जे देण्यात ...

कै.अॅड. अनिल गोधमगांवकर यांच्या पुण्यस्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  अर्जापूर:  १७ सप्टेंबर रोजी पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे कै.अॅड अनिल गोधमगांवकर यांच्या पुण्यस्मरणार्थ दहावी बारावी उत्तीर्ण तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री मनोहरराव देशपांडे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहनराव दमकोंडावार उपस्थित होते .यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख एकवीसशे रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक श्रीरामे व सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी कै. ॲड गणपतराव गोधमगांवकर यांच्या स्मरणार्थ पानसरे महाविद्यालयाची कु.प्रतीक्षा मंचल वाड हिने वाणिज्य शाखेतून ८९.७ टक्के गुण प्राप्त केले ती तालुक्यातून बारावीत प्रथम आल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच कै. प्रमिलाताई गोधमगांवकर यांच्या स्मरणार्थ तालुक्यातून प्रथम आलेली लिटिल फ्लाॅवर कॉन्वेंट स्कूल बिलोलीची कु.दुर्गेश्वरी ढगे हीस ९७ टक्के गुण प्रा...

कुंडलवाडी येथे विविध ठिकाणी 72 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा.

कुंडलवाडी (मोहम्मदअफजल ) कुंडलवाडी येथील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करीत 72 वा मराठवाडा मुक्तीदिन शोषल डिस्टन्स नियमाचे पालन करीत साजरा करण्यात आले. नगर परिषद कार्यालयात मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण नगराध्यक्षा डाॅ.विठ्ठल कुडमूलवार,अधिक्षक विश्वास लटपटे,लेखपाल,लिपिक गंगाधर पत्की आणि  सर्व संन्मानीय नगरसेवक यांच्या हस्ते.स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतीमेचे पुजन करून नगराध्यक्षा डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी न.प.कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांच्या हस्ते हस्ते.स्वामी रामानंद तिर्थ यांचा प्रतीमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. पोलीस ठाण्यात सपोनी.सुरेश मान्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी सपोउनी.विशाल सुर्यवंशी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.  सेवा सहकारी सोसायटी येथे प्रभारी चेअरमन सयाराम नरावाड यांच्या हस्ते स्वामी रामानंद तिर्थ रांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी  लेखपाल मिनाक्षी ...

कुंडलवाडी शहर परिसरात विजेचा कडकडाटसह मुसळधार पाऊस,जनजीवन विस्कळीत

कुंडलवाडी (मोहम्मद अफजल ) दि.15 सप्टेंबर सकाळी व सायंकाळी  जोरदार झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीचे नुकसान झाले आहे शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास कालच्या पावसाने हिसकावून घेतला.असे शेतकरी बोलून दाखवले. यासह परिसरातील अनेक गावाचे संपर्क तुटले  शहरातील गल्ली बोळीस नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.तरी शेतक-यांचे शेतीपिक नूकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

कुंडलवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास नजीर पठाण यांच्या वतीने रुग्णालयास 10 गादी भेट

  कुंडलवाडी (मोहम्मदअफजल) कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी शहरातील शतरंजीगल्ली राहणारे जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण यांच्यावर योग्य उपाचार करून चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देवून त्यांचे आरोग्य आबाधीत ठेवले याबद्दल जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण  यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास रूग्णांचा सेवेत 10 गादी भेट म्हणून दिले.त्याबद्दल डाॅ.बालाजी सातमवाड यानी नजीर पठाण यांचे आभार मानले. यावेळी डाॅ.तानाजी सुर्यवंशी,पत्रकार मोहम्मद अफजल,शेख शमशोदीन,शिवमनी नागुलवार, इसाक मौलाना पठाण,मुलगा जलील नजीर पठाण अदी उपस्थित होते.  याबाबत माहिती अशी की शहरातील शतरंजीगल्ली राहणारे जेष्ठ नागरीक नजीर मैलाना पठाण  यांच्या  डाव्यापायास दुचाकीने दुखापत होवून मोठ्या प्रमाणात जख्म झाले होते.त्या पायास मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होवून सुज आले व त्यांचे आरोग्य दिवसे दिवस खालावत चालले असे.या कोरोनाचा काळा या छोट्याशा जख्मेने एवडे मोठे रूप धारण केले.अता मी वाचणार की नाही अशी त्या रूग्णाची समज झाली होती. नांदेड येथे उपचार घेतले तर मोठ्या प्...

कुंडलवाडी येथे 6 पाॅझिटिव्ह तर अरळीतील 3 रुग्ण पाॅझिटीव्ह

कुंडलवाडी (मोहम्मद अफजल ) दि.10 सप्टेंबर रोजी शहरातील 6 तर परिसरातील अरळी येथील 3 रूग्णांची अॅटिजेन्ट रॅपिड चाचणी केली असता तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह निघाले यावरून अरळी येथील पाॅझिटिव्ह संख्या 7 तर कुंडलवाडी शहरातील पाॅझिटिव्ह संख्या 55 रूग्णांवर पोहोचली तर यातील काही रूग्ण उपचार घेवून सुखरूप घरी परतले काहिंवर बिलोली कोविड सेंटर येथे उपचार चालू असल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली.

कुंडलवाडी नगरपरिषदेत कोरोनाचा शिरकाव, कामकाज दोन दिवस बंद

कुंडलवाडी (मोहम्मदअफजल ) दि.9 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या अॅटिजन्ट रॅपिड टेस्ट तपासणीत येथील नगर परिषदेतील कार्यरत एका कर्मचा-याचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्याने नगर परिषद परिसर काॅन्टेनमेन्ट झोन घोषीत करून,कार्यालयातील कामकाज दोन दिवस बंद ठेवण्यात आले.  कुंडलवाडी व परिसरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असून शहरात पाॅझिटिव्ह रूग्ण संख्या 50 चा घरात पोहोचली ----------------------------- नुकतेच नगराध्यक्षपदी विराजमान झालेले नगराध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुंडमूलवार यांच्याकडे शहरातील काही पत्रकार,व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते कोरोना चैनब्रेकसाठी एक अठवडा कडक लाॅकडाउन पाळणे आवश्यक अशी मागणी केली.  व्यापा-याशी चर्चाकरून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. __________________________ शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण संख्या दिवसे दिवस वाढत आहे.शहरात कोरोना चैनब्रेकसाठी पालीका प्रशासन ठोस पाउल उचलावे यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना माहिती दिले.तसेच आरोग्य विभागातर्फे शक्यतितक्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देवून नागरीकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्र...

शहर परिसरातील दोन दिवसात 13 पाॅझिटिव्ह कुंडलवाडी शहरात 11 तर अरळीत 2 कोरोना पाॅझिटीव्ह

 . कुंडलवाडी ( मोहम्मदअफजल ) दि.8 सप्टेंबर रोजी कुंडलवाडी येथील 5 व परिसरातील अरळी येथील 2 रूग्णांची थाॅट स्वाॅब तपसणी अहवाल पाॅझिटिव्ह निघाले यावूरून अरळी येथील पाॅझिटिव्ह संख्या 4 तर  तर दि.9 सप्टेंबर रोजी शहरातील 25 रूग्णांची     अॅटिजेन्ट रॅपिड चाचणी केली असता कुंडलवाडी शहरातील 6 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निघाले यावरून शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह संख्या 50 वर गेली तर काही उपचार घेवून सुखरूप घरी परतले काहिंवर बिलोली कोविड सेंटर येथे उपचार चालू असल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली.घेण्यात आलेल्या अॅटिजन रॅपिड टेस्ट पथकात पथक प्रमुक कटके एच.आर लाॅब टेक्निशीयन शेख वाय.वाय,शेख ए.ए,गौंड सी.जे,पवार के.एम,चालक मुजीब भाई,कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुपरवायझर जाधव आदींचा समावेश होता.

कुंडलवाडी शहरातील नऊ तर परिसरातील दहा कोरोना पाॅझिटीव्ह

. कुंडलवाडी  (मोहम्मद अफजल ) दि.7 सप्टेंबर रोजी कुंडलवाडी व परिसरातील हरनाळी व टाकळी येथील एकंदरीत 75 रूग्णांची अॅटिजेन्ट रॅपिड चाचणी केली असता कुंडलवाडी शहरातील 10 रूग्ण तर परिसरातील हरनाळी येथील 8 रूग्ण व टाकळी येथील 1 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निघाले.सबंधी रूग्ण बिलोली कोविड सेंटर येथे उपचार घेत आहेत.  दि.7 सप्टेंबर रोजी बिलोली कोविड सेंटर येथील कार्यरत अॅटिजेन्ट चाचणी पथकांनी कुंडलवाडी शहरातील एकूण 47 रूग्णांची तपासणी केली असता त्यापैकी 10 रूग्ण पाॅझिटिव्ह निघाले.तर हरनाळी येथील एकूण 16 रूग्णांची तपासणी केली असता त्यापैकी 10 रूग्ण पाॅझिटिव्ह निघाले.तसेच टाकळी येथे 12 रूग्णांची आरोग्य तपासणी केली असता यात 3 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह निघाले.तर यातीन पैकी 1 कुडलवाडी व एक हरनाळी येथील रूग्णाचा समावेश असल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड यांनी दिली. घेण्यात आलेल्या अॅटिजन रॅपिड टेस्ट पथकात पथक प्रमुक कटके एच.आर लाॅब टेक्निशीयन शेख वाय.वाय,शेख ए.ए,गौंड सी.जे,पवार के.एम,चालक मुजीब भाई,कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुपरवायझ...

रोहित दादा पवार विचार मंचच्या बिलोली तालुका पदाधिकारी यांची निवड

  बिलोली (ता.प्र )6 सप्टेंबर रोजी करण्यात आले करण्यात आले.रोहित दादा पवार विचार मंचचे  नांदेड जिल्हा अध्यक्ष. बालाजी पाटील सांगवीकर. जिल्हा सचिव गजानन पाटील होटाळकर, यांच्या प्रमुख उपस्थित व  बिलोली तालुका अध्यक्ष विकास पाटील दगडापुरकर अध्यक्षतेखाली   रोहित दादा पवार विचार मंचच्या  ता.उपाध्यक्ष पदी किशोर पाटील हरणाळीकर,  सोशल मीडिया अध्यक्ष पदी बालाजी पाटील बाभळीकर,ता. सरचिटणीस पदीआकाश पाटील शिंदे,ता. सहसचिव पदी राजेश प्रभाकर गाडे,ता. कार्याधक्ष पदी सतीश लक्ष्मीकांत पा मंगरुळे यांची निवड करण्यात आली..  सर्व रोहित दादा पवार विचार मंच्याच्या पदाधिकार्यांचे अनेकांनी अभिनंदन

कुंडलवाडी शहरात आठ तर परिसरात चार कोरोना पाॅझिटीव्ह

कुंडलवाडी( मोहम्मद अफजल ) दि.5 सप्टेंबर रोजी कोविड सेंटर बिलोली येथे कुंडलवाडी शहर व परिसरातील अनेक रूग्णांचा थाॅड स्वाॅब घेण्यात आले होते.त्या पैकी दि.6 सप्टेंबर रोजी प्राप्त अहवाला नुसार कुंडलवाडी शहरातील 8 रूग्ण,हरनाळी दोन व अरळी येथील दोन रूग्ण पाॅझिटीव्ह निघाले.यावरून एकाच दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 12 रूग्ण पाॅझिटीव्ह निघाले.सबंधी रूग्ण बिलोली येथील कोविड सेंटर उपचार घेत आहेत.सबंधीत रूग्णांचा नातेवाईकांची दि.7 रोजी आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.  अशी माहीती वैद्यकीय डाॅ.सातमवाड यांनी दिली.

स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेच्या वतीने रूग्णांना अल्पउपहार

कुंडलवाडी (मोहम्मदअफजल) येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप तालूका उपाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर  भंडारे याच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय कुटूंब कल्याण योजनेंतर्गत शस्त्रक्रिया झालेल्या 15 महिला रूग्ण व त्यांचे नातेवाईक व आरोग्य कर्मचारी असे एकंदरीत 50 व्यक्तीना दि.6 सप्टेंबर रोजी सकाळी शोषल डिस्टन्स नियमाचे पालन करीत  अल्पउपहार नाशट्याची व चाहाची व्यवस्था करण्यात आले. यापुर्वी लाॅकडाउन काळात स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण गंगाधर भंडारे,सचिव नरीता लक्ष्मण भंडारे रूग्णांचा वतीने अल्पउपहार,नाशट्याची व्यवस्था करण्यात आले होते.यावेळी शहर परिसरातील रूग्णांना डाॅ.बालाजी सातमवाड तन,मन,धनाने आरोग्य सेवा देत असल्यामुळे भाजप तालूका उपाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर  भंडारे याच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. एकंदरीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासन निर्देशानुसार वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड प्रत्येक आठवड्यातील दर शनिवारी राष्ट्रीय कुटूंब कल्याण योजनेंतर्गत शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करता कुंडलवाड...

कुंडलवाडी ते पिंपळगाव डांबरीकरण रस्ता दुरूस्तीचे गेल्या ६ ते ७ महिन्यापासून रखडलेले काम त्वरीत सुरू करा- अभिजीत पाटील धरमुरे पिंपळगांवकर यांची मागणी

 कुंडलवाडी ते पिंपळगांव या रस्त्याच्या डांबरीकरण दुरूस्तीचे काम मागील ६ ते ७ महिन्यापुर्वी सुरूवात करण्यात आले. पण गुत्तेदाराने (कंत्राटदाराने) कामास सुरूवात केल्यानंतर अचानक काही दिवसात दुरूस्तीचे काम बंद केले व ते काम आजतागायत पुर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे अगोदरच खड्डेमय असलेल्या रस्त्याची अत्यंत दुरअवस्था झाली आहे. याचा कुंडलवाडी ते पिंपळगांव रस्त्यांने रहदारी करणाऱ्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे मा. उपविभागीय अभियंता यांना निवेदन देण्यात आले संबंधीत गुत्तेदारास आदेश देवून दुरूस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. किंवा त्या गुत्तेदारावर योग्यती कार्यवाही करावी. व तसेच या रस्त्याचे दुरूस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. अन्यथा तीव्र उपोषण करण्यात येईल.  असा ईशारायुवासेना, तालुका  सरचिटणीस अभिजीत पाटील धरमुरे  पिंपळगांवकर यांनी दिले आहे

कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दोनदिवसात दहा कोरोना पाॅझिटीव्ह

कुंडलवाडीत एकाच परिवारातील पाच पाॅझिटिव्ह कुंडलवाडी (मोहम्मद अफजल ) दि.4 सप्टेंबर व 5 सप्टेंबर या दोनवदिवसात कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या कुंडलवाडी,हुनगुंदा, टाकळी,सावळी,हरनाळी आदी गावातील एकुत 53 व्यक्ती मधून  50 व्यक्तींचे अॅन्टीजेंट चाचणी करण्यात आले.त्यापैकी 7 रूग्ण पाॅझिटिव्ह निघाले.तसेच यातील 3 रूग्णांची कोविड सेंटर येथे थोड स्वाॅब घेण्यात आले.त्यापैकी तीन रूग्ण पाॅझिटिव्ह निघाले.या दोन दिवसात घेतलेल्या कोविड 19 तपासणीत कुंडलवाडी येथील एकाच परिवारातील 5 व्यक्तींचा समावेश आहे.तसेच शहरातील एक टाकळी एक,हरनाळी एक,सावळी दोन व्यक्ती पाॅझिटिव्ह निघाले.यातील हरनाळी येथील एक रूग्ण गंभीर असल्याचे आढळून आल्याने त्यांना कोविड सेंटर बिलोली येथून नांदेड येथील कोविड सेंटर येथे भरती करण्यात आले आहे. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड यांनी सांगितले. ________________________ कुंडलवाडी शहरातील व ग्रामीण भागातील जनतेने आपल्या घरातील वडिलधा-या मंडळीची विशेष काळजी घ्यावे.तसेच नागरीकांनी कोविड 19 नियमाचे काटेकोर पणे पालन करावे....

भाजपा बिलोली तालूका सरचिटणीसपदी शिवकुमार कोदळे यांची निवड

  सगरोळी येथील रहीवाशी  शिवकुमार कोदळे हे अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टी मध्ये निस्वार्थ पणे कामकरता एका सामान्य कुटूंबातील तरूण चेहरा पक्षाने दिला आहे   भारतीय जनता पार्टी बिलोली तालूका सरचिटणीस पदी शिवकुमार कोदळे यांची निवड झाली आहे निवड झाल्या बद्दल अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

साठे नगर बिलोली येथील रहिवासी श्रीमती सायनबाई कामाजी जेठे यांची दुःखद निधन

बिलोली (ता.प्र)           साठे नगर बिलोली येथील रहिवासी श्रीमती सायनबाई कामाजी जेठे वय (70)वर्ष यांचे राहत्या घरी दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 1: 00 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. 5 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11:00 वाजता लघूळरोड स्मशान भूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, सुना ,नातू ,नाती व नातवंडे असा आहे मोठा परिवार आहे. नागोराव कामाजी जेठे शासकीय धान्य गोदाम बिलोली येथील कामाटी ( हमाल) कर्मचारी यांच्या त्या आई होत्या.

डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांची भाजपा अनु.जमातीच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड

कुंडलवाडी प्रतिनिधी  बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगर परिषद उपाध्यक्ष तथा भाजपाचे सक्रिय  डॉ.विठलराव कुडमुलवार यांनी यांची अनु.जमातीच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल  ,उमाकांत गोपछडे,भाजपा तालुका अध्यक्ष श्री निवास पाटील नरवाडे,शांतेश्वर पाटील.शंकरराव काळे युवा मोर्चा चे तालूका अध्यक्ष इंद्रजीत   तुडमे,दिलीप चव्हाण,बाबाराव पाटील भाले,संग्राम पाटील हायगले यांच्यासह अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केले.व त्यांचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा दिल्या ------------------------------- डाॅ.विठ्ठल कुडमूलवार म्हणाले भारतीय जनता पक्षात कार्यकरणा-या कार्यकर्त्यास न्याय मिळतोच.मी पदाची अपेक्षा न करता पक्ष श्रेष्ठीने माझ्यावर जे जबाबदारी टाकली ते काम प्रमाणीकपणे केले.नक्कीच आता सुद्धा पक्षश्रेष्ठी माझ्यावर जे जबाबदारी टाकत अनु.जमातीच्या राज्य कार्यकारिणीपदी निवड केली.या संदीचा फायदा समाजाचे प्रलंबीत प्रशन सोडविण्यासाठी व पक्ष वाढ व संघटन मजबूत करण्यासाठी पुन्हा नव्या जोमोने मी व माझे कार्यकर्ते काम करणार असे म्हणाले. व त्यांची अनु.जमातीच्या राज्य कार्यकारि...

UGC च्या निर्दशानुसार 100% प्राध्यापक भरती सुरु करा व 200 बिंदु आरक्षण उच्च शिक्षण विभागात लागु करण्यासाठी नायगाव तहसिलदार यांच्या कडे नेट-सेट -पीएचडी धारक संघर्ष समिती नायगाव ची मागणी

   महाराष्ट्र शासनाकडून दहा वर्षे अशासकीय अनुदानित महाविद्यालय व विद्यापिठामधे सहाय्यक प्राध्यापक भरती सुरळीत चालू नाही. त्यामुळे राज्यात जवळपास 12000 सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. याचा राज्याच्या उच्च शिक्षणावर विपरीत परिणाम झाला असून उच्च शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व प्राध्यापकांची घटती संख्या हे व्यस्त प्रमाण शिक्षण क्षेत्रात नक्कीच शोभणीय नाही. तसेच महाराष्ट्र राज्यात उच्च शिक्षण घेणारे, संशोधन करून पिएचडी प्राप्त करणारे, नेट-सेट पाञता परीक्षा पास केलेले सुशिक्षित बेरोजगार यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या उच्च शिक्षित तरुणांना उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही त्यामुळे हे तरुण मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत. त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जीवन अस्थिर बनले आहे...         यासाठी सरकारने प्राध्यापक भरती लवकर सुरू करावी व उच्च शिक्षित युवकांना न्याय द्यावा याकरीता नेट-सेट-पिएचडी धारक  संघर्ष समितीने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी "तालुकास्तरीय मिशन निवेदन" हा कार्यक्रम घोषित केल...

प.पु.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्रद्धांजली अर्पण

लोहगाव:             वसुंधरारत्न, परम त्यागी,सर्वांचे श्रद्धास्थान, राष्ट्रसंत प.पु.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे काल दुपारी शिवैक्य झाले. या अतिशय दु:खद क्षणी लोहगाव ग्रामस्थांच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.              याप्रसंगी नागेश मुकदम यांनी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांंचा जीवनपरीचय उपस्थितांना करुन दिले.महराजांचा जन्म 25 फेब्रुवारी 1917 रोजी झाला असून ,ते संस्कृत भाषेचे ज्ञानी होते.1939 मध्ये त्यांनी काशी मठाचा कार्यभार सांभळले.त्यानंतर 1943-1944 या काळात पंजाब प्रांतात राष्ट्रीय स्वंयसंघामध्ये संघप्रमुख गोळवकर गुरुजीबरोबर कार्य केले.1945 मध्ये महाराजांनी लाहोर विद्यापीठातून एम.बी.बी.एस.पूर्ण केले.1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यामुळे महाराजांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगावा लागला. त्यानंतर 1955  त्यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र कपीलधार पदयात्रेस प्रारंभ केले.दरवर्षी लाखो भक्तगण यात्रेला जातात.त...

कुंडलवाडीत श्री विसर्जन शासनाचा आदेशाचे पालन करीत शांततेत

. कुंडलवाडी (मो.अफजल) दि.1 सप्टेंबर रोजी मोठ्या भक्ती भावाने भक्तगण गणपती बाप्पा मोर्या पुढचावर्षी लवकरया  जय घोष करीत श्री चे विसर्जन शासनाचा आदेशाचे पालन करीत शांततेत येथील नांदेड बेस मोठ्या तलावात केले. दि.1सप्टेंबर रोजी शहरातील गणेश मंडळानी ठिक सकाळी 9=00 वा.पासून नगर परिषदतर्फे स्थापण केलेल्या संकलन केंद्रात परवानाधारक 14 गणेश जमाकरून पालीका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा स्वाधीन केले.तर पालीका प्रशासनतर्फे विसर्जनासाठी नियुक्त केले.निरडी बांधव मोठ्या तलावात श्री.विसर्जन केले. शहरातील शेवटची गणेश न.प.उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार यांच्या हस्ते पुढजाढञ आरती करीत विसर्जन करण्यात असे.यावेळी बिलोली तहसीलचे नायब तहसीलदार रघुनाथसिघ चव्हाण,मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,सपोनी.सुरेश मान्टे,साह्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी,भाजप तालूक चिटणीस हणमूलू ईरलावार,नगलसेवक पंढरी पुप्पलवार,अशोक पाटील वानोळे.सय्यारेड्डी पुप्पलवार,सचिन कोटलवार,नरेश जिठ्ठावार,पोशट्टी पडकुटलावार,न.प.कर्मचारी,विद्युत वितरण कर्मचारी भक्तगण उपस्थित होते.

नागनाथराव इंदूरकर यांचे वृध्दापकाळी निधन

  कुंडलवाडी (मो.अफजल) बिलोली पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिक्षक,अॅड किरण इंदूरकर यांचे वडील नागनाथराव इंदूरकर यांचा दि.2 सप्टेंबर रोजी सकाळी वृध्दापकाळाने दुखद निधन झाले.मृत्यू समई त्यांचे वय 75 वर्ष होते. त्यांच्या पार्थिवर दुपारी 12=00 वाजता शोकाकुल वातावरणात अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन, मुले सुना,एक मुलगी,जावई नातु नावंडे असा परिवार आहे.

कुंडलवाडी चे माजी नगराध्यक्ष डॉ. एस. एस. शेंगुलवार यांची कॉग्रेस मध्ये घरवापसी.

बिलोली तालूक्यातील कुंडलवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेंगुलवार कॉग्रेस मध्ये घरवापसी आजआज दि दिनांक 2 सप्टेंबर रोजी  नांदेड येथे आमदार अमरभाऊ राजुरकर यांच्या घरी काँग्रेस पक्षामध्ये स्वघरी परत आल्याने कुंडलवाडीत आता कॉग्रेस मजबुत होत आहे. परत आल्याने आल्याने अनेकांनी शुभेच्छा दिल्या .या वेळी कॉग्रेस चे तालूका बिलोली अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, ता.उपा. राजेश पोतनकर, कुंडलवाडी शहर अध्यक्ष  प्रदिप आंबेकर, नगर सेवक शेख मुखत्यार , भिम पोतनकर अदी जन उपस्थित होते.