मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हातणी येथील वीज पडून मरण पावलेल्या कुटुंबाचे बालाजी बच्चेवार यांनी केले सात्वन

नांदेड - काल दि 28 जून रोजी मौ.हातणी ता.उमरी जि.नांदेड येथे   संध्याकाळी  05  वा.च्या सुमारास   विज  पडुन सुशिला गोंविद  सुरणे व मुलगा राजेश हे जागीच  ठार झाले होते  गोविंद लालू सुरणे यांची पत्नी व मुलगा वीज पडून मरण पावले असता  घरी जावून त्यांचे सात्वन करून धीर दिले हातणी येथे  भारतीय जनता पक्षाचे नायगाव विधानसभेचे नेते मा.बालाजी बच्चेवार . रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष पांडुरंग पाटील शिंदे, व्‍यंकटराव चव्‍हाण शिवाजी पाटील वडजे. आनंद पाटील पवार माधव पाटील पवार मारोती पाटील पवार कैलास पाटील पवार कैलास पांचाळ. आदी जन उपस्थित होते

माचनूर येथील लचमन्नाजी आकुलवार यांचे दिर्घ आजाराने निधन,राजकारणातील एक प्रामाणिक व विनम्र व्यक्तीमत्व हरवला

बिलोली - (सय्यद रियाज) बिलोली तालुकाक्यातील मौजे.माचनूर येथिल भुमीपुत्र  लचमन्नाजी आकुलवार यांचे आज दुपारी 3.45 वाजता दिर्घ आजाराने  निधन झाले मृत्यू समयी ते 90 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पाच मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे व अंत्यविधी दिनांक 29-06-2019 रोजी दुपारी 1.00 वाजता त्यांच्या मुळगावी माचनुर तालुका बिलोली येथे होणार आहे माचनुर नगरीचे पहीले सरपंच ई. स 1960 ते 1981 पर्यंत सतत 21 वर्ष सरपंच पद भुशविले बिलोली पंचायत समितीचे सदस्य म्हणून इ.स 1981 ते 1991 पर्यंत सतत 11 वर्ष पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले कुंडलवाडी विविध सेवा सहकारी सोसायटीचे 10 ते वर्ष संचालक होते हु. गोविंदराव पानसरे अर्जापुर महाविद्यालय चे सतत 15 ते 20 वर्षापासून आजपर्यंत संचालक पदी विराजमान होते राजकीय पदे तर अनेक वर्ष भोगलेच पण त्यासोबतच बिलोली तालुक्याचे सुरमणी म्हणून 60 वर्षे भजन संगीताच्या माध्यमातून सुद्धा त्यांची ओळख होतीमाचनुर येथील सर्व सामान्य माणसाच्या मनात एक वैशिष्ट्य पुर्ण कायम स्थान मिळवलेला नेता आयुष्यभर स्मरणात राहील

झारखंड येथील प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी- जावेद अहेमद

देगलूरात उपजिल्हाधिकारी मार्फत राष्टपतींना निवेदन देण्यात आले  देगलूर ( प्रतिनीधी )                           झारखंड मध्ये तबरेज अन्सारी ला बेदम मारहाण करून मारणार्यांना फाशीची  शिक्षा व्हावी व माॅबलिंचींग च्या विरोधात कडक कायदा तयार करण्यात यावा व मुस्लिम समाजाला अॅट्रोसिटी कायदा लागु करावा.या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी देगलूर मार्फत राष्टपतींना बहुजन बांधावांकडुन देण्यात आले.  झारखंड मध्ये  तबरेज अंसारी नावाच्या मुस्लिम युवकाला खांबाला बांधुन बेदम मारहाण करीत त्याला जबरदस्तीने जय श्री राम चे नारे देण्यास भाग पाडले. व त्याचा जीव जाई पर्यंत  त्याला जमावाने मारले आणि  ही सगळी घटना कॅमेरा मध्ये रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली जेणेकरून मुस्लिम समाजा मध्ये भय चे वातावरण तयार व्हावे व देशात सध्या कायदा सुव्यवस्था बिघाडण्याचे काम काही समाजकंटक करीत आहेत व माॅबलिंचींग करुन गेल्या काही वर्षांत आत्ता पर्यंत     अखालख,मोहसीन शेख,पहलू खान,जुनेद आणि अत्ता तबर...

देवेंद्र फडणवीस यांच्या शिवशाही सरकारमुळेच मराठा समाज आरक्षणाचा लाभार्थी - बालाजी बच्चेवार

मराठा समाजाला आरक्षण लागू झाल्यामुळे मा . ना .देवेंद्र फडणवीस यांच्या शिवशाही सरकारच्या प्रामाणिकतेवर शिक्कामोर्तब झाला आहे मा . ना. देवेंद्र फडणीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून अत्यंत चाणाक्ष ,अभ्यासू पद्धतीने मराठासमाजआरक्षणाचा विषय हाताळला .म्हणूनच आज माननीय मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या  शिवशाही सरकारमुळेच  मराठा समाज आरक्षणाचा लाभार्थी झाला आहे असे रोखठोक मत  माजी जिल्हा परिषद सदस्य, भाजपा नेते  मा .श्री .बालाजीराव बच्चेवार  यांनी व्यक्त केले  बच्चेवार पुढे म्हणाले की आजपर्यंत कुठल्याही सरकारने केला नाही अशा पद्धतीचा धाडसी आणि भक्कम निर्णय करून मागास असलेल्या मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक उन्नत करण्यासाठी व त्यांचा विकास व्हावा ह्या प्रामाणिक दृष्टिकोनातून आरक्षण लागू केलं. मराठा समाजाला  शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये  आरक्षण  देणाऱ्या  कायद्याला  सशर्त मंजुरी आज मुंबई उच्च न्यायालयाने  दिली शिवशाही सरकारचा मराठा आरक्षण कायदा वैद्य ठरवला आहे यातच मा ना...

जनतेचे अडचणी समजुन घेणारा नेता मिळाल्याचा आनंद - बालाजी बच्चेवार

 नायगांव( प्रतिनिधी) जतेचे प्रशन समजुन घेऊन सोडवणारा जिल्हयाला खासदार प्रताप पाटील चिखलीकर याच्या रूपाने मिळाल्याचा आनंद उपस्थित जनतेच्या चेह-यावर स्पष्ट दिसुन येत होता .निमित्त मुगाव येथे जात आसताना मा .जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार याच्या निवास्थानी भेट दिली खासदार झाल्यानंतर पहील्यांदाच घरी आल्याने बच्चेवार यानी फटाकयाच्या आतिश बाजीने नायगांवच्या जावयाचे शकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित जंगी स्वागत केले आहे         नांदेड जिल्हयात राजकीय इतिहास रचुन पहील्यांदाच सर्वच तालुक्यात आडावा बैठका घेऊन मी जनतेचा खासदार आहे दाखुन दिल्याने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या .नायगांव तालुक्यातील मुगाव येथे सत्कार स्वीकारण्यासाठी जात आसताना .खासदार प्रताप पाटील यानी हाजारो भावीकांचे श्रद्धांस्थान आसलेल्या गंगणबीड महादेव मंदीरात आभिशोक केला .लोकसभा निवडणुकीत  बालाजी बच्चेवार यानी पक्षाची जबाबदारी प्रामाणिक पणे सांभाळली त्याबदल त्याच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी भेट घ्यावी म्हणून आले होते .       मा.जिल्हा परिषद सदस्य बालाजी बचेवार याच्या निवास्थान...

बिलोली जि.प शाळेचा शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी घेतला आढावा

जि प सदस्य बेळगे यांनी रंग- रंगोटीसाठी दोन लक्ष देणार बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेची झालेली दुरावस्था पाहता या शाळेत विद्यार्थी संख्या वाढीसाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले. ते दि.२४ जुन रोजी बिलोली शहरातील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेस दिलेल्या भेटी दरम्यान बोलत होते.या भेटी दरम्यान शिक्षण अधिकारी दिग्रसकर यांनी शाळेची दैनंदिन माहिती घेतली. यावेळी प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांच्या विषयी सांगताना म्हणाले की मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यापूर्वीच सर्व प्रतिनियुक्त्या रद्द केले असतानायेथील शिक्षक प्रतिनियुक्तीवर कसे हा सवाल उपस्थित केला ,? संबंधित शिक्षकांना शाळेवर त्वरित हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. ते पुढे म्हणाले की येथे हे गुणवत्तेची नाही तर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची ची आणि त्यांना टिकवण्याची ची काळजी घ्यायला हवी. या शाळेच्या योग्य वाटचाल याविषयी समाधान व्यक्त करत ते म्हणाले की या शाळेच्या ऊर्जितावस्थेत साठी सर्वांनी किमान दोन महिने येथे राहून अधिक मेहनत घेण्याची ग...

बिलोली पंचायत समिती पोट निवडणूकीत भाजपाचे वर्चस्व कायम

बिलोली तालूक्यातील अटकळी गणातून भाजपचे उमेदवार सौ.अर्चना मारोती शट्टीवार १५५५ मताने विजयी झाले असून कॉग्रेसचे पोटनिवडनूकीत सूध्दा हार झाली आहे. अटकळी गणा मध्ये कु.भाग्यश्री अनपलवार यांची शासकीय सेवेत नियूक्ती झाल्याने त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने अटकळी गणातील पंचायत समिती सदस्य पद रिक्त होते . सदरिल रिक्त असलेली जागा पंचायत समाती सदस्या साठी पोट निवाडणूकीचे मतदान काल २३ जून २०१९ रोजी घेण्यात आले होते तर आज सकाळी निकाल घोशीत करण्यात आले. कॉग्रेस उमेदवाराला  २७८८ मते मिळाले व भाजप चे उमेदवार सौ .अर्चना मारोती शेट्टी यांना ४३४३ मते मिळाली असून १५५५ मतांनी निवडून आल्याचे निवडणूक विभागाकडून घोशीत करण्यात आले . तालूक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी सौ शट्टीवार यांचे विजयी मिरवणूक वाजत गाजत फटाक्याच्या अतिष बाजीने काढण्यात आले. यावेळी  बाळासाहेब, पाटील यादवराजी तूडमे , रवि पाटील खतगावकर , निरंजन पाटील  खतगावकर ,अनंदपाटील बिराजदार .बाबाराव रोकडे, दत्ताराम बोधने, उमाकांत गोपछडे, गंगाधर अनपलवार, इंद्रजीत तूडमे, श्रीनिवास पाटील, सय्यद रियाज ,बळवंत पाटील लूटे , लालू ...

जागर फाऊंडेशनच्या वतीने बार्शी येथे मोफत करियर मार्गदर्शन शिबीर व आंतरराष्ट्रीय योगदिन

संख :  सोलापूर येथील नेहरू युवा केंद्र व जागर फाऊंडेशन बावी आ (ता बार्शी, जि सोलापूर)यांच्या संयुक्त विद्यमानेडोझरी (ता जत) येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांना "जागर वनश्री" पुरस्कार उमेद प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश घोलप यांच्या हस्ते प्रशस्तीपञ व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम बार्शी येथे झाला.      पूर्व भागातील पांडोझरी येथील बाबरवस्ती  शाळेत 69 वृक्षाची लागण केली आहे.उन्हाळात विद्यार्थी, पालक व पर्यावरण प्रेमीच्या मदतीने टॅकरने पाणी घालून संर्वधन व संगोपन केले आहे. वृक्ष लागवड वन संवर्धनाच्या माध्यमातून समाज व वसुंधरेच्या कल्याणार्थ पर्यावरण व तत्संबंधी जनजागृती वनराई फुलवून शाळा परिसर हिरवागार केला आहे या कार्याची दखल घेऊन पुरस्कारासाठी निवड केली आहे.   मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी मनोगतात शाळेची वनराईचं व प्रगती ग्रामस्थ,पालक,शालेय व्यवस्थापन समिती यांच्या सांघिक प्रयत्नातून झाल्याचे सांगितले.        कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश घोलप म्हणाले की, विद्यार्थ्यांना औ...

पीक विमाचा प्रश्न सोडवावा..खा.प्रतापराव पाटील यांच्याकडे पांडुरंग शिंदे यांनी केली मागणी

                          मुगांव. दि.२३/०६/१९.     नांदेड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार मा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा मुगाव गावात नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असणारा पीक विमाचा प्रश्न तात्काळ सोडवावा व पीक कर्ज वाटप करण्यासाठी बॅंका उदासीन आहेत हा सुद्धा प्रश्न सोडवावा अशी विनंती खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांना केली.    पांडुरंग शिंदे म्हणाले की, आपण खासदार झाल्यानंतर गावगड्यातील सामान्य लोकांना आनंद झाला.खऱ्या अर्थाने नांदेड जिल्ह्यातीत नवे पर्व सुरू झालें ते म्हणजे प्रताप पर्व होय                  आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांला हत्तीचे बळ आले आहे कारण आमचं म्हण ऐकणारा सामन्याचा खासदार नांदेड लोकसभेला मिळाला.    हा कार्यक्रम भाजपाचे जेष्ठ नेते अशोक पाटील मुगावंकर यांच्या पुढाकाराने आयोजित क...

बालाजी बच्चेवार यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करून खासदार चिखलीकर यांचे जोरदार स्वागत

नायगाव - आज नांदेड जिल्हा खासदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय बालाजी बच्चेवार निवास्थानी भेट दिली यावेळी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बऱ्याच नागरिकांनी आपल्या गावातील समस्यांची निवेदने दिली प्रामुख्याने नायगाव तालुक्यात असलेल्या रस्त्यांच्या दूरदर्शविषयि अनेकांनी आपल्या व्यथा खासदारमहोदयां पुढे मांडल्या खासदार महोदयांनी तात्काळ संबंधित यंत्रणेला रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करून घेण्याच्या संदर्भात फोन वरून लगेच निर्देश दिले यानंतर बालाजी बच्चेवार यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात आतषबाजी करून खासदार चिखलीकर यांचे जोरदार स्वागत केले यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णाजी ,डी बी पाटील होटाळकर, शिवराज पाटील होटाळकर ‍,व्यंकटराव चव्‍हाण, प्रा.डॉ.जीवन चव्हाण, नगरसेवक देविदास बोमनाळे, दत्ताहरी पाटील काऊलगुडेकर ,शिवाजी पाटील वडजे चंदू पाटील चव्हाण, माधव  माचनवाढ वैजनाथ वैजनाथ पाटील ढगे ,रविकांत पाटील कोपरे कर, रावसाहेब पाटील मोरे, संजय पाटील टाकळीकर, सचिन पाटिल बेंद्रिकर, शंकर डॉन व पत्र...

कलंबर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मच्यारांच्या हालगर्जीपणामुळे चिमुकल्या मुलीला गमवावा लागला जीव

शिराढोण:- (शुभम डांगे) कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण येथील रहिवासी प्रमेश्वर भुरे यांची पत्नी जयमाला प्रमेश्वर भुरे ह्या दि.22 जुन रोजी प्रस्तुती वेदना होत असल्यामुळे दवाखाण्यात जात होत त्यांच्या वेदणा जास्तच होत असल्यामुळे कलंबर दापशेड च्या मध्येच गाडि थांबवुण कलंबर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारांशी संपर्क केला आसता कर्मचारांनी हालगर्जी पणा दाखवला पती प्रमेश्वर यांनी कर्मचारांशी संपर्क केला असता त्यांनी उलटि उत्तर देवुन दुरावण्याचा प्रयत्न केला त्यांना सांगण्यात आले की आता दवाखाण्यात अॅंबुलंन्स उपलब्द नाहि आणी आमच्या हातावर आता सद्ध्या एक केस चालु आहे आम्हि नाहि येवु शकत असे शब्द वापरुन विषय दुरावला पण ह्या सर्व बाबींमध्ये महिलेची प्रस्तुती झाली व काहि वेळामध्ये जन्माला आलेली गोंडस मुलीला जागीच जीव गमवावा लागला यदाकदाचीत स्थायिक डाॅक्टरांनी हालगर्जीपणा टाळुन तात्काळ महिलेवर उपचार केला असता तर मुलीला पुढच भविष्य पाहता आल असत सद्धा परस्थिती आशी आहे की मुलगी नको पन भुरे परीवारांनी मुलगी मिळावी यासाठी देवाकडे साकडे घातले पन डाॅक्टरांच्या मनमाणी कारभारामुळे ते पण मंजुर झाले ना...

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम

बिलोली - सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराज जयंती सप्ताह २० जून ते २६ जून पर्यंत साजरा होत आहे . सविस्तर वृत्त असे कि,बार्टी पुणे च्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त निबंध स्पर्धा , भाषण स्पर्धा , तसेच प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येत आहे .त्या निमित्ताने बिलोली तालुका समतादूत शेख इर्शाद मौलना यांनी तालुक्यातील लोहगाव ,तळणी ,दगडापूर ,कोल्हेबोरगाव या गावातील शाळेत निबंध स्पर्धा ,भाषण स्पर्धा व प्रबोधन कार्यक्रम घेत आहेत .तसेच २६ जून पर्यंत विविध शाळेला भेट देऊन कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे .व राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य ,सामाजिक कार्य व जीवन परिचय या विषयावर प्रबोधन केले जात आहे .समतादूत शेख आय.एम.यांनी कोल्हेबोरगाव येथील भास्कर प्राथमिक शाळा येथे प्रबोधन करताना सांगितले कि. आपल्या शिक्षणातून आणि तसेच्या अभ्यासक्रमातून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रचारित व प्रसारित होत असतात. या थोर महापुरुषांचे साम...

खासदार प्रताप पाटील चिखलीकर उद्या सकाळी नायगाव येथे

खासदार  प्रताप पाटील चिखलीकर उद्या सकाळी नायगाव येथे नांदेड लोकसभेच खासदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर उद्या  दिनांक 23 जून रोजी रविवारी सकाळी 8:30 वाजता माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बालाजी बच्चेवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहे तरी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान माननीय बालाजी बच्चेवार (नायगाव विधानसभा मतदारसंघ) यांनी केले आहे.

बिलोली पोलिस स्टेशनच्या सात कर्मचाऱ्यांना पदोन्नती

बिलोली येथील पोलिस ठाण्यात कार्यरत ३ पोलिस हेड काँन्सटेबल,३ नायक पोलिस काँन्सटेबल तर एक पोलिस काँन्सटेबल यांना पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वे बढती देण्यात आली. नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बढती बाबत काढलेल्या आदेशानुसार बिलोली पोलिस ठान्यातील हेड काँन्सटेबल जनार्दन बोधने यांना सहाय्यक पोलिस उप निरिक्षक ,हेड काँन्सटेबल शाहू रघुविर सिंह यांना सहाय्यक पोलिस उप निरिक्षक,हेड काँन्टेबल शेख महेबुब यांना सहाय्यक पोलिस उप निरिक्षक या पदावर बढती देण्यात आली.तर नायक पोलिस काँन्सटेबल लक्ष्मण सोनकांबळे,दुर्गाजी पाटील व गोविंद शिंदे यांना पोलिस हेड काँन्सटेबल या पदावर बढती देण्यात आली.भगवान कोत्तापले यांना पोलिस काँन्सटेबल पदावरून नायक पोलिस काँन्सटेबल या पदावर पढती करण्यात आली.पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वे करण्यात आलेल्या या बढती बद्दल पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या हस्ते बढती झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पोलिस उप निरिक्षक एस.पी गंगापुरकर, पो.उप निरिक्षक खेडकर यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस...

जि.प हायस्कुल शाळेला अच्छे दिन आणण्यासाठी बिलोलीत शिक्षण तज्ञांची बैठक घेणार . - आ.सुभाष साबणे

बिलोली ( सय्यद रियाज ) तालुक्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळा आज घडीला डिजीटल झालेल्या आहेत.ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांची दुरावस्था होऊन विद्यार्थी संख्या झपाट्याने घटत आहे.बिलोली शहरातील भव्य इमारत व क्रिडांगण असलेल्या जिल्हा परिषद हायस्कुल शाळेला पुन्हा अच्छे दिन मिळवून देण्यासाठी लवकरच बिलोली येथे शिक्षण तज्ञांची बैठक घेऊन शाळेला पुन्हा उभारी येण्यासाठी त्यांच्या सुचनेनुसार अडचणी सोडविणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष साबणे यांनी केले. शासनाकडून शहरी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांकडे गेल्या काही वर्षापासून होत असलेल्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद शाळा अखेरच्या घटीका मोजत आहेत.कुंडलवाडी मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कुल शाळेचीही अशीच दुरावस्था झाली असून काही वर्षापुर्वी या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांना शाळेच्या चकरा माराव्या लागत असत.तब्बल दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या या शाळेकडे कालांतराने झालेले दुर्लक्ष आणी वरचेवर वाढणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थांमुळे जिल...

जागर फाऊंडेशनच्या वतीने बार्शी येथे मोफत करियर मार्गदर्शन शिबीर व आंतरराष्ट्रीय योग दिन

    सोलापूर( बार्शी) लापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका या ठिकाणी भारत सरकार नेहरू युवा केंद्र व जागर फाउंडेशन बावी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी दहावी व बारावी नंतर पुढे काय या विषयावर तालुकास्तरीय मोफत मार्गदर्शन शिबिर व 21 जून योग दिनाचे औचित्य साधून "आंतरराष्ट्रीय योग" दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे.                                  कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रमेशजी घोलप यांचे बंधू उमेश घोलप (अध्यक्ष,उमेद प्रतिष्ठान बार्शी) सचिन वायकुळे( दैनिक संचार उपसंपादक) गणेश गोडसे (पत्रकार ,दैनिक पुढारी) मदन गव्हाणे (नगरसेवक, बार्शी नगरपालिका) पंढरीनाथ बोधनापोङ (पोलीस उपनिरीक्षक बार्शी पोलिस स्टेशन )विशाल चिपडे (संस्थापक ,जागर फाउंडेशन अस्मिता चिपङे (संचालिका स्पर्धाविश्व एक शैक्षणिक संकुल क्लासेस बार्शी) अनिल वेदपाठक (शिष्य रामदेव बाबा पतंजली योग समिती) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.            ...

बिलोली जिल्हा परिषद हायस्कुल शाळेतआज पहील्याच दिवशी मुलांना पुस्तका वाटप

.          बिलोली ता.प्र. बिलोली जिल्हा परिषद हास्कुल शाळेतआज पहील्याच दिवशी 20  मुलांना पुस्तका वाटप करण्यातआले.गेल्या  2018 डिसेंबर  ला भेट दिली असता शाळेत फक्त 5 विद्यार्थी आढळून आले  होते  त्या नंतर गृह भेटी देवून संख्या वाढलेली दिसून येते एका काळी अकराशे  विद्यार्थी संख्या होती तर दर वर्षी घट होऊन आज घडीला 105 हजरी पट संख्या आहे दि.17/5/2019 आज शाळेच्या  पहील्याच दिवसाच्या  सुरुवातीला 20 विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप केले. पुस्तक वाटप करण्यात आले या वेळी शाळेतील जिल्हा परिषद हास्कुल शाळेचे मुख्याद्यापक टिकाणे, पञकार संरक्षण समितीचे अध्यक्ष ए.जी कुरेशी ,  भाजप सोशल मिडियाचे सय्यद रियाज , पुरोगामी पञकार संघाचे कार्याध्यक्ष सुनिल कदम यांच्या सह शाळेतील शिंदे टी.वाय, नाईनवाड एच.डी. ,ईळेगावे नागनाथ कवठाळे एस.डी,बिलोलीकर एस,  एस. शिपाई चव्हाण अदिजन उपस्थित होते

स्पर्धेच्या युगात राहण्यासाठी इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहात शामिल व्हा...माजी सनदी अधिकारी श्यामसुदंरजी शिंदे

कंधार /शिराढोण (शुभम डांगे) आजच्या स्पर्धेच्या युगात टिकवुन राहण्यासाठी इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून आपल्या पाल्यांना शिक्षण देऊन त्यांना या स्पर्धेत सहभागी करा असे आवाहन माजी सनदी अधिकारी श्यामसुदंरजी शिंदे यांनी पेनूर येथील संगमेश्वरा इंग्लिश स्कूलच्या उद्धाटन कार्यक्रमा प्रसंगी केले.प्रास्ताविक मारोती एजगे यांनी केले.पेनूर येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती एजगे यांनी ग्रामिण भागातील नागरिकांच्या मुला-मुलीना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी संगमेश्वरा इंग्लिश स्कुलच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थासाठी सुरु केली असून त्याचे उद्धाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून गुरुवर्य डिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर,अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी श्यामसुदंर शिंदे,सौ.आशाताई शिंदे,पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे,माजी नायब तहसीलदार रामराव एजगे,माजी जि.प.सदस्य रावसाहेब शिंदे,शाळेचे संचालक मारोती एजगे,शिवसेना शहरप्रमुख मिलिंद पवार,स्वप्नील गारोळे,चंद्रकांत क्षिरसागर, पत्रकार मोहन पवार,छायाचित्रकार विनोद महाबळे,गुरु...

बिलोलीत सोमवारी तहसिलवर भारिप बहुजन महासंघाचे घंटानाद आंदोलन

बिलोली (सुनिल कदम)  बिलोलीत सोमवारी तहसिलवर भारिप बहुजन महासंघ व ईतर संघटनेच्या वतीने 17 जून रोजी  घंटानाद आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसिल कार्यालय व पोलीस ठाणे बिलोली यांना देण्यात आले . लोकसभेच्या निवडूनकीत लोकशाही ची हत्या करीत आहे यांना जाब विचार ना करण्यासाठी आदरनिय सर्वाचे श्रद्धास्थान   राष्ट्रीय नेते अॕड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात व देशात महत्वाचा मुद्दा गाजत आहे. ई.व्ही.एम.मशीन हटाव या मागणीसाठी संबंध महाराष्ट्रत बंद चा आव्हान केला आहे.लोकशाहीला जिवंत  ठेवण्यासाठी आपले मुलभुत  हक्क व मतदाना चा  अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला .श्रीमंत असो की गरीब यानी समान  न्याय.समता.बंधुत्वा भाईचारा ठिकून राहावे. देशाचा विकासात्मक धोरने   व संविधाना चा आदर करावे  केले पाहीजे.असे भारतात लोकशाही नांदली पाहीजे. सर्व तमाम जनता व नागरिकांना   याकडे लक्षवेद करुन येणाऱ्या विधानसभाचे निवडून हे बॕलेट पेपरवर व्हावी .48 मतदार संघाच्या मतमोजणीत असलेली तफावत या संशयाला बळकटी देणारीआहे. धोक्यात जनतेला दिशा...

पिकविमा व दुष्काळ मदतीसाठी राष्ट्रवादी आक्रमक, दिलीप धोंडगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन

शिराढोण:-शुभम डांगे     लोहा कंधार तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परस्थीती आहे, शेतकर्यांना उत्पादन खर्चाच्या निम्मेही उत्पादन झाले नाही, झालेल्या शेतीमालाला भावही मिळाला नाही ...यामुळे या भागातील शेतकरी कर्जबाजारी झाला ...अन..तरीही पिक विमा व दुष्काळ मदत लाभापासुन लोहा कंधार तालुक्याला वगळण्यात आले आहे. ही बाब गंभीर असुन निष्क्रीय लोकप्रतिनिधी व निगरगठ्ठ शासन, प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे.लोहा कंधार तालुक्यासाठी दुष्काळ मदत व पिकविमा लाभ तातडीने देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस दिलीप धोंडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.       भीषण दुष्काळ, भीषण पाणीटंचाई,  शेतीमीलाचे घटलेले उत्पादन, या बाबी ठळकपणे सर्वांच्या समोर असतानाही ...तसेच य़ेथील आणेवारी पन्नास पैशा पेक्षा कमी आलेली असतानाही जाणिवपुर्वक अन्यायकारक भुमीका लोहा तालुक्याच्या बाबतीत शासन प्रशासनाने घेतली आहे, आणी मुख्यमंत्र्यांच्या जवऴचा म्हणुन मिरवणार्या लोकप्रतिनिधीही या बाबत काही बोलत नाही ...म्हणजे निश्चीतच या भागातील शेतकर्यांच्या विरोधात मोठे षडयंत्र आहे.अ...

बकरी ईद पुर्वि ईदगाहाचे नवीन बांधकाम करा - जावेद कुरेशी

बिलोली (सय्यद रियाज)  शहरातील ईदगाह हे  पन्नास ते साठ वर्ष जुने झाले आहे काही वर्षांपूर्वी या ईदगाहाचे  काही प्रमाणात बांधकाम  करण्यात आला होता  जोरदार पावसामुळे व ते माळाच्या ठोकावर  असल्याने त्याचा काही भाग तुटून पडला व काही व्यवस्थित आहे मुस्लिम समाजातील सर्वात मोठे दोन सन आहे एक रमजान ईद  तर दुसरे बकरी ईद  आहे या  निमित्त शेकडो जण नमाज साठी ईदगाह वर येत असतात लवकरच बकरी ईद येत आहे बकरी ईद पुर्वी बांधकाम करण्याची मागणी बिलोली नगर अध्यक्षा मैथिली कुलकर्णी  यांच्या  कडे करण्यात आली यावी नगर पालीकेचे मुख्याधिकारी कांबळे, उपनगर अध्यक्ष मारोती पटाईत होते  निवेदनावर  नगर सेवक जावेद कुरेशी, मिर्झा शाहेद बेग,मैमुना बेगम अदी नगर सेवक यांचे स्वाक्षरी आहे

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम , मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित

मुंबई -  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन योगऋषी स्वामी रामदेव बाबा करणार आहेत. स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार आहे. एक लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिक्षण, क्रीडा, युवक कल्याण आणि वैद्यकीय क्षेत्रात योगाचे महत्त्व आणि त्याचा अवलंब याबाबत धोरण ठरविण्याबाबत शासन विचाराधीन असून छत्तीसगढ आणि हरियाणा राज्यांनी निर्माण केलेल्या योग आयोगाचाही अभ्यास करण्यात येणार आहे.             प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून जगभरातील 177 देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. योगाला आता वैद्यकीय चिकित्सा व जीवनपद्धतीच्या स्वरुपात जगभरातील लोक स्वीकारत आहेत

सी.सी.नालीच्या बांधकामासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन

बिलोली- बिलोली शहरातील प्रभाग क्र.०७ देशमुख नगर येथे सी.सी.नालीचे बांधकाम गेल्या २५ वर्षापासून न झाल्यामुळे येथील नागरीकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सविस्तर वृत्त असे की,नगर परिषद बिलोली कडुन गेल्या २५ वर्षापासून देशमुख नगर मधील एका भागाकडे दुर्लक्ष केले जात आहे .निवडून येणारे नगरसेवक फक्त  गेल्या २५ वर्षापासून फक्त आश्वासन देत आहेत. नालीचे बांधकाम न झाल्याने येथील भागात हिवताप ,डेंग्यू , मलेरीया आशा विविध आजारांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. ह्या साठी येथील नागरिकाःमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .सदर बाब येथील राहिवाशी शेख इर्शाद मौलाना ह्यांनी नगर परिषदेच्या निदर्शनास निवेदन च्या माध्यमातून व प्रत्यक्ष आणून दिली . तद्नंतर ११ सप्टेंबर २०१८ रोजी नगर परिषद तर्फे सदर नालीच्या बांधकामची निविदा काढण्यात आली .परंतु आज ०१ वर्षे पूर्ण होत असले तरीही परिस्थिती "जैसे थे "ची आहे तसेच सदर भागात सी.सी.रोड चे काम थातूर-मातूर पध्दतीने झाल्याने वर्षभरात रोडचे सर्वत्र तुकडे पडले आहेत.व सदर भागात येण्या-जाण्या साठी नालीवर टाकण्यात आलेले स्लब तुटुन पडल...

ग्रामिण भागातील कार्याला आपल्या लेखणीच्या माध्यमातून उजाळा देणारा ग्रामिण पत्रकार:- विरभद्र एजगे

Marathilivenews लोहा तालुक्यातील मौजे पेनुर येथील ग्रामीण पञकारीतेच्या माध्यमातुन जनतेचे प्रश्न शासन दरबारी पोहचवुन जनतेला न्याय देणार व्यक्तिमत्व म्हणजे विरभद्र लक्ष्मणराव एजगे जन्म दिंनाक 5 जुन 1987 रोजी शेवडी बाजीराव ता. लोहा येथे एका गरीब कुटुंबीयात झाला वडील कै लक्ष्मणराव एजगे यांनी स्वता हाँटेल व्यवसाय करुन सर्व मुलां मुलीना शिक्षण दिले त्या मुला पैकीच विरभद्र एजगे हे दोन नंबरचे लहानपणा पासूनच वडीलांना हाँटेल व्यवसामध्ये मदत करुन स्वता शिक्षण घेत होते त्याचबरोबर त्यांचा छंद म्हणजे हाॅटेलवर आलेला वृत्तपञ पुर्ण वाचुन काढणे हि त्यांची मोठी आवड होती याच आवडीतून आपणही मोठे होऊन पत्रकार बनावे व आपली बातमी याच न्यूज पेपरमध्ये हेच स्वप्न बघत बघत पहीले 10 पास झालो नंतर 12 पास पुढे बि ए करुन डिग्री मिळवली व आपल्या स्वप्नाच्या दिशेने माणिकनगर नांदेड येथील उषाताई धोंडगे पत्रकारीता माहाविद्यालय येथे बि जे पत्रकारीता या विषयासाठी प्रवेश घेतला व विशेष प्राविण्यासह पुर्ण ही करुन शहरी भागात आपली पत्रकारीता न करता ग्रामिण भागातील विविध बाबीना व कार्याला प्रकाशित करण्यासाठी ग्रामिण पत्रकार म्...

पर्यावरण दिन विशेष ५जून २०१९

               ( जिल्हा सांगली) संख! राज्यातील विविध  जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा सुरू आहे .असे आसताना दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात पिके व झाडासाठी तर दूरच, पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण बनले आहे अशा परिस्थितीत  *(पांडोझरी )येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद  शाळेतील  विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना* सोबत घेऊन शाळेतील झाडे वाचण्याचा प्रयत्न करीत आहे.  पाणी मुरावे म्हणून शाळेच्या चारही बाजूने चरी काढून घेतल्या  आहे  पण पाऊसाचा पत्ता नाही म्हणून  टँकरचे पाणी सोडून त्यातून  वृक्ष जगविण्याची धडपड केली  जात आहे.  गेली  पाच वर्षे शाळेतील मुले व शिक्षक उन्हाळी सुट्टीसाठी न जाता वृक्ष संगोपनासाठी सुट्टी  घालवत आहेत  हे पाहून पालकांनी दर वर्षी किमान एक दोन टँकर उन्हाळी सुट्टीत  झाडे वाचविण्यासाठी देत आहेत  . या वर्षी दुष्काळाची झळा पहाता मुले कशी पाणी घालत आहेत,हे बघून पर्यावरणप्रेमी श्रीशैल यळझरी या शेतकरी मालकानी संपूर्ण उन्हाळा भर तुमच्या  शाळेतील झाडांना टँकरणे ...

बिलोलीत बसव संदेश रथ याञेचे भव्य स्वागत

बिलोली आद्य लोकशाही जनक,जगाला समता,बंधुत्वता व समानतेचा संदेश देणाऱ्या विश्वगुरू जगद्ज्योती महात्मा बस्वेश्वर महाराज यांच्या विचारांची समाजाला जाणिव व्हावी या उद्देशाने लिंगायत समन्वय समिती,बसव ब्रिगेड व अनुभव मंडप समितीच्या वतीने महाराष्ट्रात बसव संदेश याञा काढण्यात येत आहे.दि.०३ जुन रोजी बसव संदेश रथ याञेचे बिलोली शहरात भव्य असे स्वागत करण्यात आले. भारताचे माजी राष्ट्रपती बी.डी.जत्ती यांचे सुपूञ तथा बसव समिती अध्यक्ष बेंगलुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत १३ फुट उंच भव्य अशा बसवन्नाच्या मुर्ती रथाचे बिलोली शहरात आगमन होताच टाळ,मृदुग व बस्वेश्वर महाराजांच्या भजन गितांनी स्वागत करण्यात आले.शहरातील जुना बस स्थानक चौक ते शिवाजी पुतळ्यापर्यंत भव्य अशा बसव संदेश रथाची याञा काढण्यात आली.छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात १३ फुट उंच अशा बस्वेश्वर महाराजांच्या प्रतिकृतीस तालुक्यातील समस्त लिंगायत समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले तर भारताचे माजी राष्ट्रपती बी.डी.जत्ती यांचे सुपूञ तथा बेंगलुरू बसव समिती अध्यक्ष अरविंद जत्ती यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार ...

डेबूजी युथ ब्रिगेड ची नांदेड येथे राज्यस्तरीय बैठक

नांदेड दि.02जून रविवार डेबूजी युथ ब्रिगेड च्या वतीने आढावा बैठक हॉटेल विसावा पॅलेस शिवाजी नगर नांदेड येथे अत्यंत भव्यदिव्य प्रकारे घेण्यात आली. गाडगेबाबा ना भारत रत्न संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ  तसेच  S.C.आरक्षण या प्रमुख मागण्यांचा विचार संस्थापक अध्यक्ष राहुल भाऊ वरणकार, दादासाहेब ननावरे,राहुल चव्हाण यांनी मांडला.महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून adv रानिताई रंधे तळेकर,प्रदेशाध्यक्ष म्हणून adv गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ तेलंगे,जिल्हाकार्याध्यक्ष बाळासाहेब(बालाजी) तेलंग,उपाध्यक्ष प्रवीण सुर्यकर, मार्गदर्शक महेश मुखेडकर यांनी केले तर सूत्रसंचालन आदिनाथ चिंताकुटे तसेच जिल्हासंघटक नरेंद्र संगमकर,भोकर तालुकाध्यक्ष चंद्रकांत बरबडेकर, परमेश्वर इबीतवार,रामेश्वर लोणवडे यांचे विशेष सहकार्य लाभले. नाशिक विभागीय अध्यक्ष नितीन भाऊ रणशिंगे, पुणे विभागीय अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी आपले विचार मांडले.नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब तेलंग यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी मागील 10 वर्षांपासून समाजकारणात सक्रिय असल्याचे सांगितले...

पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथील सेवानिवृत्त अधिक्षक कै. पंढरीनाथ मारोतराव पेंडलवाड यांचे निधन

बिलोली - पानसरे महाविद्यालय , अर्जापूर येथील सेवानिवृत्त अधिक्षक कै. पंढरीनाथ मारोतराव पेंडलवाड (घुळेकर-देगलूर) रा. अर्जापूर ता. बिलोली जि. नांदेड यांची आज दिनांक :- ०१/०६/२०१९ रोज शनिवारी   रात्री ठीक ०८ वाजता दुःखद निधन झाले आहे व अंत्यविधी दिनांक:- ०२/०६/२०१९ रोज रविवारी ठीक १२ वाजता  अर्जापूर येथे आहे. त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली व नातवंड असा आप्त परिवार आहे

बिलोली - नरसी राज्यमार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम थातूर-मातूर

 बिलोली ते नरसी राज्य मार्गावरील  रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहन धारकाला  त्याचा ञास सहन करावे लागत आहे  रस्त्यावर झालेले खड्डे बुजवण्याचे काम मात्र थातूरमातूर होत असताना दिसून येत आहे बिलोली नरसी  20 किमी अंतराचा  चा रस्ता आहे या मार्गाने दररोज शेकडो वाहने  बोधन, निजामबाद, हैदराबाद धर्माबाद, बासवाडा, आदिलाबाद , बासर यासह अनेक  जिल्हा व तालूक्याला येथून जातात या मार्गाने जात असतात . हा रस्ता कल्याण टोल कडे देण्यात आलेला आहे यांच्यामार्फत देखरेख व दुरुस्ती करण्याचे त्यांच्या कडे आहे  पण त्यांच्याकडून रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे भेगा पडले आहे अनेक ठिकाणी रस्ता जम्पिंग होत आहे  यामुळे वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच अनेक गतीरोधक निर्माण करण्यात आली या मार्गावर शाळा असल्याचे , गतीरोधक असल्याचे व ईतर कोणही  प्रकारचे फलक  नाहीत  पांढरे पट्या व लाल रेडियम चे पट्ट्या मारल्या गेलेल्या नाहीत    बिलोली - नर्सी मार्गावर  अनेक ठिकाणी प्रत्येक गावाजवळ...