फुलवळ येथे गोठ्यास लागलेल्या आगीत गाभण म्हैस दगावली तर शेती अवजारे आणि घर उपयोगी वस्तू झाल्या जळून खाक
कंधार (शेख शादुल ) फुलवळ ता. कंधार येथील पशु पालक नागनाथ घनश्याम गोधने यांनी नेहमी प्रमाणे म्हैस शेतातुन आल्यानंतर रात्री गोठ्यात बांधली होती. २८ जुलै रोजी मध्य रात्री अचानक जाग आल्यानंतर गाभण म्हशीला चारा टाकण्यासाठी गोठ्याकडे जात असताना गोठ्यास आग लागल्याचे दिसून आले. तेंव्हा घाबरून पळत गोठ्याकडे त्यांनी धाव घेतली असता लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्याचे दिसून आले तेंव्हा आरडा ओरड करून शेजाऱ्यांना उठवले व ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. लागलेली आग विझवण्यात यश आले पण त्या आधीच गाभण म्हैस अंदाजे किंमत ऐंशी हजार रु किंमत असलेली म्हैस तडफडून दगावली होती आणि शेती अवजारे व घर उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. नागनाथ गोधने यांच्या फिर्यादी वरून पोलीस ठाणे कंधार व तहसील कार्यालय कंधार यांनी स्थळ पाहणी पंचनामा केला तर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एन.रामपुरे यांनी त्या म्हशीचे शवविच्छेदन करून अहवाल दिला. घटना स्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यासह मंडळ अधिकारी शिवदास पटणे , तलाठी कीर्ती रावळे ,प...