नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील भारत साक्षर अभियानात काम करणाऱ्या प्रेरक - प्रेरिकांची ५२ महिन्यांचे मानधन थकले आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी साक्षर भारत प्रेरक संघटनने केले आहे. साक्षर भारत अभियानांतर्गत २०१२ ते २०१८ या कालावधीत जिल्ह्यात २ हजार ६१६ प्रेरकांनी काम पाहिले आहे या प्रेरकांना ७५ पैकी केवळ २३ महिन्याचे मानधन देण्यात आले. परंतु अद्यापही उर्वरित ५२ महिन्यांचे मानधन अद्यापही प्राप्त झाले नाही. या मानधनाच्या याबाबतीत संबंधितांकडे पाठपुरावा करुनही प्रतिसाद मिळाला नाही. अनुदानाअभावी काही महिन्याचे मानधन प्रेरकांना दिले.साक्षर भारत प्रेकांचे थकीत मानधन ३१ डिसेंबर २०१८ देण्यात यावे. प्रेरकांना शिक्षणसेवक म्हणून काम करण्याची संधी द्यावी व शासकिय कंञाटदार पद सेवेत सामावुन घेऊन शासनाच्या वेतन समान कायद्यानुसार प्रेरकांच्या मानधनात १८०० रुपये वाढ करावी अशा विविध मागण्या राज्य निमंञक -भगवानराव देशमुख, महाराष्ट्र राज्य संघटक - संतोष केंदळे, राज्यसंघटक- यज्ञकांत कोल्हे, माणिक कांबळे - जिल्हाउपाध्यक्ष - जाधव मोहन, जिल्हा संघटक- संदिप भुसावळे,जिल्हा प्रस...