मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिव्यांगांच्या राखीव निधी खर्चाबाबत गत चार वर्षापासुन तीनतेरा"तुटपुंज्या निधीतुनच दिव्यांगांना केला जात आहे बटवारा" :- राहुल साळवे

"दिव्यांग निधी खर्चाबाबत जिल्हा तथा तालुका स्तरावरील समीती हि कागदावरच" पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी  स्विकारतील का जिल्हाभरातील दिव्यांगांचे पालकत्व ?

कोरणा संसर्ग हे मानवी अस्तित्वावर आलेले संकट असून भूमिपुत्रांनी कोरोणा विरोधी देव -दूत सरकारी यंत्रणेला साथ द्यावी - बालाजी बच्चेवार

संपूर्ण देशामध्ये कोरोना व्हायरस संसर्ग थैमान घातले असून हे मानवी अस्तित्वावर आलेले संकट असून भूमिपुत्रांनी ,नवतरुणांनी कोरणा विरोधी देव -दूत सरकारी यंत्रणेला साथ द्यावी.  आशा महाकठीण संकट समयी राज्य हित आणि राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून सुजाण नागरिकांनी भूमिपुत्रांनी पोलीस प्रशासन आणि ,आरोग्य विभाग अशा विविध कोरोना विरोधी सरकारी यंत्रणा  स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या यंत्रणेला स्वयंस्फूर्तीने साथ द्यावी .असे नम्र आव्हान भाजपाचे जेष्ठ नेते मा .बालाजी बच्चेवार यांनी केले आहे कोवीड19 अर्थात कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी देशाचे नेते मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी टाळेबंदी अर्थात (लॉक डाऊन) घोषित करून विविध रित्या कोरोनाची कडी तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. या महामारीच्या प्रचंड संकटाने महाराष्ट्र राज्यसह संपूर्ण भारत देशाचे प्रचंड नुकसान होत असून आर्थिक नुकसानीच्या प्रचंड झळा देशाला सोसावे लागत आहेत. भविष्यात आर्थिक मंदीचे मोठे सावट असणार आहे? कोरोना संसर्गामुळे मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.  काळाची पावले ओळखून भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्याचे ...

बिलोली शहर व तालूक्यातील सर्व देशी दारु दूकाने,बियरबार परमींट रुमचे दूकाने उघडताना मंद्य साठ्याच्या स्टाॅक ची तपासणी करुनच उघडण्याची परवानगी द्यावी- शंकर महाजन

 बिलोली-  कोरोनाच्या पाशर्वभूमीवर  लाॅकडाउन जाहीर करण्यात आले आहे.देशी दारु दूकाने,बियर—बार परमिंट रुमचे दुकाने मागील लाॅकडाउन लागू झाल्यापासुन अंपत्ती व्यवस्थापण कायदा २००५ व मूंबई मंध्य निषेध कायदा १९४९ चे कलम १४२(१) अन्वेय दूकाने बंद करण्याचे आदेश आहेत.सदरील दूकाने बंदचे आदेश देत असताना ऐकूण स्टाॅक ची माहीती घेउनच सर्व दुकाने बंदचे आदेश देण्यात आले.तरी अश्या लाॅकडाउनच्या काळात दूकाने बंद असताना ही बिलोली शहर व तालूक्यात मंद्य विक्री केल्याचे प्रकार दिसून आले तर काही ठिकानी छापा टाकून कार्यवाही करण्यात आली पण सदरील देशी विदेशी दारु कूटून व कसा आला याची चौकशी माञ करण्यात आली नाही. या मूळे संपुर्ण तालूक्यात बर्‍याच ठिकानी लाॅकडाउनच्या काळात सरास पणे मद्य विक्री केली गेली या मूळे सदरील दूकाने चालू करत असताना बंद च्या आदेशा वेळी घेतलेल्या स्टाॅकची माहीती व ज्या दिवशी दूकान उघडनार त्या दिवशी सदरील दूकानात प्रशासकीय कर्मचारी पाठवून जमा स्टाॅकची पडताळनी करुनच दूकान उघडण्याचे परवानगी द्यावी.जर एखाद्या दूकानदाराने बंदच्या काळात काळा बाजार करणार्‍या दूकानदार केद्र व राज्य सर...

झुमचा उपयोग करून झाली महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी,सोनकांबळे, मुंडकर आणि भोसीकर यांनी मांडले विचार

बिलोली कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकजण आपापल्या घरी राहत असताना महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करणे कठीण झाले असताना झुम अँप च्या (दृकश्राव्य) माध्यमातून उपयोग करून सर्वांना सामावून घेऊन मान्यवरांचे मार्गदर्शनाचा कार्यक्रम दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी घेण्यात आला. यात कविता सोनकांबळे, गोविंद मुंडकर, अविनाश भोसीकर यांनी सहभाग घेतला होता. महात्मा बसवेश्वर यांची जयंती प्रत्येकांनी घरी बसून साजरी करावी. अशी परिस्थिती कोरोना ने निर्माण केली होती. बिलोली तालुक्यातील अनेकांनी स्वयंस्फूर्तपणे घरी बसून महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केली. यावेळी दृक्श्राव्य माध्यमातून डॉ. कविता सोनकांबळे ,ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, बसव ब्रिगेड चे संस्थापक अविनाश भोसीकर यांनी आपले विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले. महात्मा बसवेश्वर यांचे समतेच्या विचार, बाराव्या शतकातील लोकशाही रुजवणारे अनुभव मंडप, यासह अनेक विषयावर विचारमंथन झाले. या विचार मंथनाच्या या कार्यक्रमात बिलोली, देगलूर, धर्माबाद, नांदेड या भागातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी...

""गत तीन वर्षापासुनचा दिव्यांगांचा राखीव निधी गेला तरी कुठे"" शेकडो दिव्यांग लाभाच्या प्रतिक्षेत जिल्हा परिषदेने गाठला दिव्यांगाप्रती ऊदासीनतेचा कळस :- राहुल साळवे

दिव्यांगांसाठी अहोरात्र सेवा करणाऱ्या अधिकार्याला तंबी.. - राहुल साळवे यांचा प्रभारी सीईओंना सवाल . नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- लोकशाही मार्गाने विविध आंदोलने. ऊपोषणे करूनही 2016 ला झालेल्या निधी खर्चानंतर अद्याप जिल्हा परिषद नांदेड कडुन दिव्यांगांच्या हक्काचा राखीव निधी खर्च करण्यात आला नाही हा निधी पूर्णत त्यावर्षी खर्च करण्याबाबत वेळोवेळी शासन स्तरावरून पत्रके काढुन आदेशीत केले होते तसेच दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी ही वेळोवेळी हा निधी खर्च करण्याबाबत सुचना दिल्या होत्या तसेच या निधीचा लाभ मिळावा यासाठी पंचायत समिती स्तरावरून शेकडो दिव्यांगांनी अर्ज दाखल केले होते परंतु गेंड्याची कातडी धारण केलेले जिल्हा परिषद मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कुंभकर्ण झोपेचे सोंग घेत दिव्यांगांच्या हक्काचा राखीव निधी खर्चाबाबत मौन धारण केले आहे. एकतर पहिलेच आर्थिक संकट वरून या (लाँकडाऊन) संचारबंदीमुळे जिल्हाभरातील शेकडो दिव्यांगांवर ऊपासमारीची वेळ आली होती या संकटावर मात व्हावी यासाठी जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. सतेंद्र ताराबाई वीरेंद्र आऊलवार यांनी आपल्या काही समविचारी व्यक...

बसवेश्वरांचे विचार आणि कार्य ऐकण्यापेक्षा प्रत्यक्षात आचरणात आणा:-गौरव बिच्चेवार

शिराढोण :-शुभम डांगे संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आल्याने चालू  वर्षात आपण कोणत्याच महापुरुषांच्या जयंती साजरी करू शकत नाही परंतु त्यांचे विचार आपण विविध पुस्तकांच्या माध्यमातून वाचन करून आचरणात आणू शकतो. काल दि. 26एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर जयंती होती सध्या सरकारने  लॉकडाउन घोषित केल्यामुळे जयंती अथवा कोणते व्याख्यान आयोजित करण्याची संधी कोणाला भेटली नसेल तरी शिराढोण येथील नवतरुण गौरव बिच्चेवार यांनी मात्र ऑनलाईन च्या माध्यमातून सर्व जनतेला महात्मा बसवेश्वर यांच्या चरित्राचे प्रबोधन केले यावेळी  ते म्हणाले कि समाजामध्ये असणारे अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती परंपरा कमी करून परस्परांतील मतभेद दूर करून समाजाला मानवतेची शिकवण देणारे जे महान संत-महात्मे होऊन गेले, त्यामध्ये बसवेश्‍वरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल कारण महात्मा बसवेश्वरांचे कार्य  आणि विचार खूप महान आहेत संपूर्ण जगाला आदर्श वाटावे असे महात्मा बसवेश्वर यांचे जीवनचरित्र आहे. बाराव्या शतकातील एक महान सामाजिक क्रांतिकारक होते. महात्मा बसवेश्वर यांना समाजातील कोणतीच विषमता मान्य नव्हती. परंतु बसवेश्वर यांच...

"'लाँकडाऊन काळात मनपा हद्दितील गरजु दिव्यांगांसाठी आयुक्त सरसावाले घरपोच राशन किट देत केला तत्काळ 5% निधी वाटप""

बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीने मानले आयुक्तांसह मनपा प्रशासनाचे आभार :- राहुल साळवे नांदेड जिल्हा प्रतिनिधी दि 26 :- सध्या कोरोना या विषाणुचा वाढत्या प्रभावामुळे नांदेड जिल्ह्यासह संपुर्ण देशात (लाँकडाऊन) संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या लाँकडाऊनमुळे नांदेड शहर मनपा हद्दितील गरजु बेरोजगार दिव्यांगांवर ऊपासमारीची वेळ आली असता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त श्री.सुनील लहाने.ऊपआयुक्त हिंगोले आणि ऊपआयुक्त सरदार अजितपालसिंघ संधु यांनी तातडीची बैठक घेऊन श्री.अशोक सुर्यवंशी प्रकल्प संचालक एनयुएलएम यांची अशा गरजु दिव्यांगांना घरपोच जेवण देण्याकरिता समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक केली.समन्वयक अधिकारी म्हणुन नेमणुक केल्याचे पत्र हाती मिळताच अशोक सुर्यंवशी यांनी दि 11 एप्रिल 2020 रोजी पासुनच एनयुएलएमच्या पाच कर्मचार्यांची टिम आणि सहकार्यासाठि बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे आणि ऊपाध्यक्ष संजय धुलधाणी यांना सोबत घेऊन शहरातील विविध प्रभागात जाऊन गरजू दिव्यांगांना 8 दिवस जेवण नेऊन दिले. या दरम्यान रोज 135 ते 140 गरजु दिव्यां...

कोरोना च्या जनजागृती पोस्टर चे प्रदर्शन करुन सामाजिक संदेश देण्यात आले

(बिलोली/वार्ताहर) कोरोना विषाणूचा संकट आज संपूर्ण भारतावर आलेला आहे.   आपला व आपल्या कुंटुबियाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करावे अशी जनजागृती पोस्टर च्या माध्यमातून करण्यात आली आहे.सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील अल ईम्रान प्रतिष्ठाण या सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना वर आधारित  पोस्टर चे अनावरण  बिलोली चे उपविभागिय पोलीस अधिकारी डाँ.सिध्देश्वर धुमाळ यांच्या हस्ते दि.२५ एप्रिल शनिवारी करण्यात आले . ◼ गेल्या अनेक वर्षापासून अल ईम्रान प्रतिष्ठाण बिलोली ही संस्था वृक्षारोपण,कला,क्रिडा,सांस्कृती,व्यसनमुक्ती,स्वच्छता,भ्रुण हत्या,एडस जनजागृती,कुष्ठरोग,क्षयरोग आदि राष्ट्रीय कार्यक्रम निस्वार्थ करित आहे.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम एंवम क्रिडा मंञालयाचा उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार तर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून छञपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले . ◼या पोस्टर चे अनावरण प्रसंगी अल ईम्रान प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष तथा वार्ताहर  प्रा.मोहसीन खान,वार्ताहर शिवराज रायलवाड माजी नगरसेव...

कृष्णा या बालकाने पंतप्रधान सहायता निधीला केली मदत

नायगाव  बाजार तालुका प्रतिनिधी                            येथील येथील व्यापारी राजेश्वर उद्धवराव मेडेवार यांचा अकरा वर्षाचा नातू कृष्णा राहुल मेडेवार या  चिमुकल्याने  कोव्हीड-19 करीता पंतप्रधान सहायता निधीस अकरा हजार रुपयांची तसेच गोरगरिबांसाठी  अन्नधान्याच्या 11 किटस मदत  केली आहे. आज सदर चिमुकल्याचा वाढदिवस आहे.  वाढदिवस घरीच साधेपणाने साजरा करुन त्यांनी पंतप्रधान सहायता निधीस मदत केली आहे.                                नायगाव येथील कृष्णा राहुल   मेडेवार या 11 वर्षाच्या चिमुकल्यांने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च सध्या राज्यात कोरोना सारख्या विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने  शासनाला हातभर लागावा म्हणून आपला खारीचा वाटा  म्हणून कृष्णा राहुल मेडेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोविड-19 करिता पंतप्रधान सहायता मदत निधीस म्हणून अकरा हजार रुपयाची देणगी व अन...

बिलोली शहरात विना मास्क शहरात फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी 46 वाहन चालकांना 9800 रु दंड आकारण्यात आला

बिलोली शहरात विना मास्क शहरात फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी 46 वाहन चालकांना   9800 रु दंड आकारण्यात आला सदर दंड बिलोलीचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके ,तहसीलदार  विक्रम राजपूत, नपचे मुख्याधिकारी  प्रशांत व्हटकर, यांनी आज दिनांक 21/4/2020 रोजी विना मास्क शहरात फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी 46 वाहन चालकांना  रु 9800/एवढा दंड आकारण्यात आला यापुढे दररोज विना मास्क किंवा विना कारण बाहेर फिरणाऱ्या  नागरिकांवर  दंडनीय कार्यवाही करण्यात येणार आहे असे मुख्याधिकारी श्री प्रशांत व्हटकर यांनी सांगितले आजचा कार्यवाही मध्ये अशोक स्वामी,प्रदिप ढिलोड,लाईख सिद्धिकी,जगन्नाथ मेघमाळे,पोलीस कर्मचारी बोधने,वाघमारे ,बादेवाड, जावेद व इतर कर्मचारी उपस्थित होते

जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या कडून नरस्सी येथील मध्यवर्ती बँकेत चहा किटचे वाटप

नायगाव बाजार- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नरसी येथे आज जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी चहा किटचे वाटप केले विशेष म्हणजे स्वता चहा बनवून येथील कर्मचारी बांधवांना दिले. देशासह राज्यात कोरोना मुळे उदभवलेल्या गंभीर परिस्थितीने सर्वञ लाॅकडाउन करण्यात आले आहे संचारबंदी लागू असल्याने ग्रामीण भागात सर्व व्यवहार बंद आहेत. बाजार पेढा कडकडीत बंद असून फक्त जिवन अवश्यक वस्तुची किराणा दुकान चालू आहेत दरम्यान सर्व सामान्य नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून फक्त बॅका सुरू आहेत नरसी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुरू आहे.पण येथील कर्मचारी बांधवांना सर्व बाजार पेठा  बंद असल्याने चहा मिळणे कठीण आहे. हि बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी आपल्या वतीने या बॅकेत आज चहा किटचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे स्वता चहा बनवून येथील कर्मचारी बांधवांना दिले.  यावेळी शाखेचे शाखाधिकारी नरसिंग राऊत, कॅसियर बामणे, कारखून कोत्तावार, शिपायी तळणे,सह नागरिक उपस्थित होते

"लाँकडाऊन काळात नांदेड जिल्ह्यात एकजरी दिव्यांग भुकबळीने मृत्यु पावल्यास संबंधीत अधिकार्यावर "दिव्यांग मणुष्य वधाचा" गुन्हा दाखल करावा राहुल साळवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड जिल्हा प्रतिनीधी :- (लाँकडाऊन) संचारबंदीमुळे नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार दिव्यांगांवर ऊपासमारीची वेळ आली आहे तसेच या लाँकडाऊनमुळे होता तो हाताचा रोजगार हि बुडाला आहे आणि दैनंदिन जीवनात लागत असलेल्या जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी कुठलेच पैसे नसल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना हि मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.एकिकडे शासनस्तरावरून दिव्यांगांना या लाँकडाऊन काळात विविध योजना राबविल्या जात आहेत त्यात घरपोच राशन किट देण्याच्या.जिवनावश्यक वस्तु देण्याच्या.सँनीटायझर. मास्क.रूमाल. कम्युनिटि किचनद्वारे जेवण देण्यासहित एक महिण्याचे 1000 रूपये मानधन अँडवान्स मध्ये देण्याच्या सुचना याआधीच दिल्या आहेत परंतु नांदेड जिल्ह्यात अद्याप एकाही दिव्यांगाला जिवनावश्यक वस्तुसह अन्न धान्याचा एक हि कण दिला गेला नाही आहे. आज जिल्हास्तर असेल किंवा तालुकास्तर असेल विविध दानशुर व्यक्तिंनी अन्न धान्याच्या पुरवठ्यासह सर्व जीवनावश्यक वस्तु प्रशासकिय अधिकार्यांजवळ जमा केले आहे. आज जिल्हा स्तर असेल किंवा तालुका स्तर असेल विविध सामाजिक संघटणा.दाणशुर व्यक्ती.गुरूद्वारा बोर्ड.विविध ट्रस्ट - सस्था ह्या आप आपल्या...

सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठन करून पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे - पांडुरंग शिंदे यांची मागणी

     शेतीचा खरीब हंगाम सुरू होण्यास एक महिना अवधी आहे, सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना पीक कर्ज व सरसकट पुनर्गठित पीक कर्ज व बी-बियाणे ,खते मोफत उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली आहे .    कोरोना या महामारी मुळे जगामध्ये थैमान घातले आहे,मानव जातीवर हे मोठे संकट निर्माण झाले आहे, या महामारी चा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे .    लाखो रुपये खर्च करून तयार केलेला भाजीपाला असेल फळ पिके असतील लॉक डाऊनस असल्यामुळे विक्री होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात फळे व भाजीपाल्याची विक्री कराव लागत आहे. काही शेतकऱ्यांना अक्षरशा आपल्या बागा कुर्‍हाडीने तोडून टाकल्या तर काही ठिकाणी नांगरटी करून मोडून काढल्या आहेत.        शेतकऱ्याला नेहमी आसमानी व सुलतानी संकटाने घेरलेलेच असतेच पण यावर्षी सुपर इंडियातल्या लोकांनी आणलेल्या कोरोना व्हायरस मुळे त्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. कोरोनाचे हे भूत आमच्या मानगुटीवर बसवण्याचं काम सुपर इंडिया वाल्यांनी केलेला आहे. आणि सरकार सुद्धा आत...

रवि पाटील खतगावकर यांच्या वतीने 111 धान्याच्या कीटचे वाटप

बिलोली (ता.प्र) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी संपूर्ण भारतात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्या मुळे कोणालाही उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून भाजपा युवा मोर्चा चे ग्रामीण नांदेड जिल्हा अध्यक्ष  रवि पाटील खतगावकर यांच्या कडून  111 धान्याचे किट, सुलतानपुर , नवि अबादी .साठेनगर,देशमुखनगर व ईतर ठीकाणी 111  कुटुंबाना  युद्ध कोरोनाशी ग्रुपच्या वतिने धान्य वाटप करण्यात   आले. या वेळी भाजपा चे तालूका अध्यक्ष श्रीनिवास पाटील , माजी तालूका अध्यक्ष आनंद बिराजदार, युवा मोर्चा चे तालूका अध्यक्ष इंद्रजित तुडमे, सोशल मिडियाचे सय्यद रियाज,पञकार मारोती भालेराव. सुलतानपुर येथील   ग्रामपंचायत माजी सदस्य  भिमराव लाखे, श्रावण लाखे, मोहन लाखे,  कुणाल सोंनकांबळे, गजानन लाखे, अदि उपस्थित होते.

सिमावर्ती भागात बिलोली पोलीसाचे कोरोना विषयी जनजागृती

  सिमावर्ती तेलंगना राज्यातील कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर बिलोली पोलिसाची  लाँकडाउन संदर्भात सिमावर्ती भागातील  गावोगावी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेऊन जनजागृती करीत आसल्याचे चिञ पहावयास मिळत आहे शेजारील तेलंगना राज्यातील निजामाबाद जिल्ह्यासह बोधन तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा वाढणारा संक्रमणाचा संभाव्य धोका  लक्षात घेऊन खबरदारीच्या पार्श्वभुमीवर  बिलोली पोलिस ठाण्याचे पो.नि.शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिमावर्ती भागातील सगरोळी ,बोळेगाव ,शिंपाळा ,कार्ला दौलतापुर ,हिप्परगा थडी,येसगी, यासह आनेक सिमावर्ती  गावामध्ये लाँकडाउन संदर्भात तसेच तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व बाजारपेठ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या  सगरोळी येथिल बँकेत , किराणा दुकान  व भाजीपाला आदी ठिकाणी   लोकांची होणारी गर्दी  यामुळे सोशियल डिस्टंनसिगचा उडणारा फज्जा लक्षात घेऊन व शेजारील तेलंगना राज्यातुन  छुप्प्या  मार्गाने येणाऱ्या लोकाची संख्या व पुणे ,मुंबई शहरातुन  येणाऱ्या लोकासाठी कोरोनटाईम लाँकडाउन व ईतर महत्वपुर्ण जनजागृती सं...

प्रधानमंत्री गरीब कल्याण धन योजेनचा नांदेड जिल्ह्यात बोजबारा शेकडो दिव्यांग निराधार वाढिव एक हजार रूपयांपासुन वंचीतच :-राहुल साळवे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- कोरोना या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण देशात (लाँकडाऊन) संचारबंदि लागु करण्यात आली आहे. या काळात  दिव्यांग.निराधार या लोकांचा विचार करता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी दिव्यांग.विधवा.वयोवृद्ध निराधारांना प्रत्येकि एक हजार रुपये दरमहा अतिरिक्त असे पुढील तीन महिन्यांपर्यंत दोन टप्यात डिबीटि द्वारा खात्यात जमा करणार असल्याचे सांगितले होते परंतु नांदेड जिल्ह्यात या योजनेचा बोजबारा वाजला असून अद्याप एकाही दिव्यांगांच्या खात्यावर हे अतिरिक्त एक हजार रुपये आलेले नाहीत तसेच हे अतिरिक्त एक हजार रुपये येने तर दुरच गत दोन ते तीन महिण्यापासुन संजय गांधी निराधार योजनेतील मानधन हि दिव्यांगांना मिळालेले नसल्याचे राहूल साळवे यांनी एका प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे तसेच या महामारी संकट काळात नांदेड जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांचे आर्थिक संकट टाळण्यासाठी अतिरिक्त वाढिव एक हजार रूपयांसह संजय गांधी निराधार योजणेतील दरमहा मानधन हि तत्काळ खात्यावर टाकण्याचे कळविले आहे.

"'लाँकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या दिव्यांगांना खासदार आणि आमदार यांच्या विकास निधीतील विषेश तरतुद असलेल्या निधीतुन आर्थिक मदत करावी"' :- राहुल साळवे

खासदार महोदय आणि सर्व आमदार महोदय आप आपल्या मतदार संघातील दिव्यांगासाठी जिल्हा नियोजन विभागास शिफारस पत्र देऊन दिव्यांगांची आर्थिक संकट दुर करतील का :- राहुल साळवे नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सध्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण देशात 25 मार्च 2020 पासुन (लाँकडाऊन) संचारबंदि सुरू करण्यात आली आहे सुरूवातीला 21 दिवसांचा लाँकडाऊन करण्यात आला होता परंतु रूग्नांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे यात वाढ करून 3 में 2020 पर्यंत हा लाँकडाऊन वाढविण्यात आला आहे. या लाँकडाऊन मुळे निसर्गता जन्मताच अपंगत्व असलेल्या दिव्यांगांवर मोठे संकट ओढावले आहे.शरीराच्या एखाद्या अवयवामुळे अपंगत्व असल्याने पहिलेच कोणी दिव्यांगांना कामावर ठेवत नाही आणि जे दिव्यांग स्वावलंबाने प्रकारचे स्वंयरोजगार करत स्वताचा व संपूर्ण परीवाराचा ऊदरनिर्वाह भागवित होता त्या दिव्यांगांचे या लाँकडाऊन काळात रोजगार बुडाले परिणामी दैनंदिन जीवनात लागत असलेल्या विविध जीवनावश्यक वस्तुं खरेदि करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलेच पैसे ऊपलब्ध नसल्यामुळे दिव्यांग हा मोठ्या आर्थिक सापडला आहे दिव्यांगासह दिव्यांगावर अवल...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त यूद्ध कोरोनाशी ग्रुपने केले आंबेडकर नगर येथे केले 40 किटचे वाटप

बिलोली शहरातील डॉ.आंबेडकर येथे युद्ध कोरोनाशी ग्रुप बिलोली च्या वतीने , तांदुळ, तुरदाळ,मिरची तेल दाळ,अदी 40 किट देण्यात आले. यूद्ध कोरोनाशी ग्रुपचे इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज, मारोती भालेराव,संदेश जाधव ,संजय पोवाडे,दिनेश जाधव,भिम जाधव,शंकर जाधव,गंगाधर जाधव ,संघपाल पोवाडे,सुनिल मोरे,विकास जाधव,संघपाल जाधव,यांच्या सह अनेकजन सामाजिक आंतर ठेवून किटचे वाटप करण्यात आले.

रवि कांबळे यांनी युद्ध कोरोनाशी ग्रुपला दिले 21 धान्यचे किट

बिलोली -  कोल्हेबोरगाव येथील ग्रामपंचायत चे सदस्य तथा बिलोली येथील रवि कॉम्प्यूटर  चे मालक रवि कांबळे कोल्हेबोरगावकर हे आज दिंनांक 15 रोजी युद्ध कोरोनाशी ग्रुपला 21 किट दिले.त्या मध्ये तांदुळ, तेल पॉकेट ,मिरची पॉकेट,हळद पॉकेट ,मिठ पॉकीट ,खोबरा तेल, संतुर साबन,व्हिल साबन, पारले बिस्किट अदी किट मध्ये सामावेश आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जयंती साधेपनाने करुन ईतर खर्च नकरता त्यांनी समाजाला काही देणं लागते या उद्देशाने त्यांनी आज पर्यतचे कार्य लक्षात घेवून गरजु व निराधार, लोकांना घरपोच वाटप करण्यासाठी  युद्ध कोरोणाशी ग्रुप बिलोलीला 21 किट दिले. या वेळी ग्रुपचे इंद्रजीत तुडमे.सय्यद रियाज,मारोती भालेराव,संदेश जाधव ,बाबू कुडके,मुज्जू कुरेशी अदीनी अभार मांनले.यांच्या कार्याला पाहून सामाजिक स्तरावर कौतूक होत आहे.

कोरोना बाबत तेलंगणाचा धोका रोखण्यासाठी महाराष्ट्र सीमा झाल्या सज्ज...

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सीमेवर झाले दाखल महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेला नांदेड जिल्हा आणि खासकरून बिलोली तालुका याबाबत पोलीस आणि प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे. याबाबत प्रश्न सीमावर्ती भागाच्या प्रमुखांनी आणि पोलिस विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून विविध बाबी विषयी चर्चा केली. तेलंगानातून किमान तीन हजार लोक महाराष्ट्रात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी आणि जिल्हा हा पोलिस अधीक्षक यांनी बिलोली येथील तेलंगाना सीमेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील येसगी जवळील सीमेवर दोन ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पूर्वी फक्त कारला फाटा येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. नांदेड जिल्हा हा कोरोना बाबत ग्रीन झोन मध्ये जरी असला तरी कोरोना यास सीमेचे बंधन नाही. ही बाब लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्याला पुणे आणि मुंबई पेक्षा निजामाबाद जिल्ह्यापासून मोठा धोका असल्याचे आणि तेथे  मोठ्या प्रमाणात संभाव्य करुणा बाधित असल्याचे यावेळी प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रम...

बिलोली तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक त्वरीत चालु करा -मनसे ता.अध्यक्ष शंकर महाजन

जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर यांच्या वॉटसप व इमेलव्दारे मध्यवर्ती बँकेचे निवेदनाद्वारे कळविली असता लवकरच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले बिलोली ता प्र : बिलोली तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची  दिवसेंदिवस वाढत चाललेली अडचन लक्षात घेऊन  ही बंद असलेली बँक त्वरीत चालु करण्यात यावी अशी मनसेचे तालुका अध्यक्ष शंकर महाजन यांनी निवेदनाद्वारे डॉ विपीन इटणकर जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे        बिलोली तालुक्यातील राष्ट्रीयीकृत असलेले सर्वच बँका चालु आहेत यात व्यापारी वर्ग, कर्मचारी वर्ग व इतर नागरीक यांचे खाते या राष्ट्रीयीकृत बँकेत असल्यामुळे व या बँकेच्या ग्राहकांच्या देवान घेवाणाचे व्यवहार चालुच आहेत मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनु बँक म्हणून ओळखली जाणारी बँकच आज घडीला बंद असल्याने या बँकेतुन शेतकऱ्यांची पिक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत देण्यात येणारी अनुदान असे अनेक शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही जिल्हा मध्यवर्ती बँकेतच जमा होत असतात व होत आहेत असे असतानांच कोरोना या विषाणु...

चितोडिया समाजाला यूद्ध कोरोनाशी समुहाचा मदतीचा हात गहु,तांदुळचे वाटप

बिलोली-  चिंचाळा फाटा येथे राहाणारे चितोडिया समाजावर लॉकडाऊन मुळे त्या समाजावर दैनंदिन अडचणीता वाढ झाली आहे त्यांच्या कुटंबात लहान व मोठे 80 ची संख्या आहे. बिलोली तालूयात राजस्थान येथील चितोडिया समाज हा पाल टाकून वास्तव्यास आहे.  . त्यांना एक क्विंटल तांदूळ ,एक क्विंटल गहु,तेल पॉकेट,मिरची पॉकेट,तुरदाळ,अदी 18 कुटुंबाना चिंचाळाचे शैलेश पाटील,बाळू पाटिल व  कोरोनाशी ग्रुपचे इंद्रजीत तुडमे,  सय्यद रियाज,मारोती भालेराव,संदेश जाधव ,संदिप कटारे, यांच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. यावेळी  चिचाळा येथील लक्ष्मण पाटिल ,संतोष इंदुरले,बबलू बिजेवार,सुधाकर सुरशेटवार, अदी जन उपस्थित होते.

१५ एप्रिल पासून मोफत रेशन वाटपाची सुरुवात-आपल्या हक्काचे रेशन घेण्याचे आव्हान- शेख शादुलभाई

कंधार - सम्पूर्ण जग भरात वैश्विक महामारी Covid-१९ ने थैमान घातले असून या आजाराशी लढण्यासाठी जगभरात सतत प्रयत्न चालू असून शासन प्रशासन आप आपल्या स्तरावर काम करीत आहेत..तसेच लॉक डाउन च्या अवघड परिस्तिथ गोर गरीब परिवाराला एक वेळेचे अन्न मिळणे अवघड झाले असून त्यांच्यावर उपसामारीची वेळ आली आहे म्हणून महाराष्ट्र सरकारने Novel Corona Virus (Covid-१९) प्रादुर्भवाच्या पावर्षभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राज्यातील लाभार्त्यांसाठी माहे एप्रिल ते जून या तीन महिन्याचे रेशन अगदी मोफत देण्याचे निर्णय घेतले असून यात अंत्योदय या कार्डधारकासाठी २३ किलो गेहूं आणि १२ किलो तांदूळ असे ३५ किलो धान्य व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्त्याना प्रति व्यक्ती ३ किलो गेहूं आणि २ किलो तांदूळ असे ५ किलो धान्य देने अपेक्षित आहे. जर एका लाभार्त्याच्या घरात जर १० सदस्य असतील तर त्यांना ५० किलो तांदूळ मिळालाय पाहिजे आणि हे धान्य दोन टप्यात दिले जाईल एप्रिल महिन्याच्या १ एप्रिल ते १५ एप्रिल पर्यंत शुल्क आकारण्यात येतील व प्रधानमंत्री योजनेचे धान्य १५ एप्रिल पासून दर महिना अगदी मोफत देण्यात येत...

"राहुल साळवे यांच्या मागणीची दखल घेत महानगरपालिके मार्फत गरजु दिव्यांगांना घरपोच जेवणाला आजपासून सुरुवात"

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सध्या कोरोना या विषाणुच्या  वाढत्या प्रभावामुळे देशात (लाँकडाऊन ) संचारबंदी लागु करण्यात आली आहे या लाँकडाऊन काळात बेरोजगार दिव्यांगांवर ऊपासमारीची वेळ ऊपासमारीची वेळ येत असल्याची आणि यावर तत्काळ ऊपाय योजणा करावी तसेच दिव्यांगाना भुकबळीचा सामना करावा लागु नये यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहूल साळवे यांनी जिल्हास्तर आणि मंत्रालय स्तरावर तक्रार दाखल केली होती आणि या संदर्भात सर्व वर्तमानपत्रात हि बातमी प्रसारीत झाल्यामुळे मनपा प्रशासनाने तत्काळ दखल घेत मा.आयुक्त आणि ऊपआयुक्त यांच्या मार्गदर्षनाखाली महानगरपालिका हद्दितील गरजु दिव्यांगांना अडचण निर्माण होत असल्यामुळे अशा गरजु दिव्यांगांना दोन वेळचे जेवन देण्याकरीता श्री.अशोक सुर्यवंशी प्रकल्प संचालक एनयुएलएम यांची सदर कामासाठी समन्वयक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र हाती घेताच आज दि 11/04/2020 रोजी महानगरपालिका एनयुएलएम विभागाचे काहि कर्मचारी आणि दिव्यांग संघटणेचे राहुल साळवे आणि संजय धुलधाणी यांना सोबत घेऊन मनपा शासकीय वाहनाद्वारे 90 गरजु दिव्यांगांना त...

बिलोलीत प्रधानमंञी उज्वला गॕस योजनेचे गॕस धारकांना श्रुती एच.पी.गॕस वितरकांकडून मोफत गॕस वाटप

बिलोली ता.प्र.सुनिल कदम. बिलोलो तालुक्यातील ग्रामीण व शहरातील नागरीकांनी प्रधानमंत्री उज्वला गॕस योजनेचे   महत्त्वाचे कागद पत्र श्रृती एच.पी,गॕस  वितरकाकडून नोंद करुन घ्यावेत असे आव्हान इंद्रजित तुडमे यांनी केले आहे. कागद पत्राची पुरतता करुन सहकार्य करावे   व नोंद झाल्या वर नागरीकांनी  ऐंजन्सी  धारकांनीकडे  यांची नोंद घेतल्यावर त्यांना   गॕस चे पास बुक व आधार कार्ड व मुबाईल नंबर स्वताचे ओटीपी साठी आवश्यकच आहे . प्रधानमंञी उज्वला गॕस योजनेचे  बिलोली  येथील श्रुती एच.पी.गॕस वितरकांकडून मोफत  आज 8 एप्रिल  रोजी वाटप सुरुवात करण्यात आले आहे .यामध्ये पहीले  वाटपधारक  कुंटुबास सुरुवात केले आहे यामध्ये    करुणा सुनिल कदम  बेळकोणी बु  येथील कुंटुंबास वाटप करण्यात आले. या वेळी गॕस वितरक इंद्रजीत तुडमे, भाजप चे तालूका अध्यक्ष श्रीनिवास पाटिल ,पत्रकार सय्यद रियाज,बिलोली महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष  मारोती भालेराव .  व  बिलोली  म.पू.पत्रकार संघाचे कार्यअध्यक्ष...

पोलीस जमादार भगवान वाघमारे यांच्या कडून यूद्ध कोरोशी ग्रुपला दिले एक क्विंटल तांदुळ

बिलोली-  पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस जमादार भगवान वाघमारे यांनी यूद्ध कोरोनाशी ग्रुपला   एक क्विंटल तांदुळ दिले. लॉकडावून मुळे निराधार,विधवा,गरजुवंत लोकांना  गेल्या 15 दिवसापासून धान्य किट वाटप करण्याचे काम यूद्ध कोरोनाशी ग्रुप करत आहे. यांच्या  कार्याला पाहून जमादार भगवान वाघमारे यांनी एक क्विंटल तांदूळ गरजूवंतांना वाटप करण्यासाठी दिले. युद्ध कोरोनाशी ग्रुपचे इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज,मारोती भालेराव,संदिप कटारे,संदेश जाधव ,जेष्ट पञकार प्रकाश पवाडे, रत्नाकर जाधव,शेख सुलेमान अदीजन उपस्थित होते.

सीमावर्ती भागातील सर्व गावामध्ये लवकरात लवकर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावे- बालाजी पा.शिंदे

 बिलोली -  सीमावर्ती भागापासून जवळच असलेले तेलगांणा राज्यात बोधन ,कंदकुर्ती, निझामाबाद या गावात व शहरात कोरोना महामारी चे रुग्ण आढळून आलेले आहेत त्यामुळे तिकडचे लोक व इकडचे लोक मोट्या प्रमानात छुप्या व रस्त्याने येत जात आहेत व त्या कोरोना बाधित गावातून येत जात आहेत त्यामुळे कोरोना सारखी महामारी बिमारी सीमावर्ती सर्व  गावामध्ये पसरण्याची भीती निर्माण झाली आहे . आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात  एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही ,आणि आता या सीमावर्ती भागातून आटत येण्याची दाट शक्यता आहे.*व तेलगांणा राज्यां मधून बनावट शिंधी आणून इकडे विकण्याचा प्रयत्न चालू आहे त्या लोकांच्या माध्यमातून ही महामारी इकडे येऊ शकते अश्या लोकांवर कडक कार्यवाही करण्यात यावी. त्यामुळे या सीमावर्ती भागातील सर्व गावामध्ये अतिरिक्त पोलीस यंत्रणा लवकरात लवकर लावण्यात यावी ही विनंती.संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष बालाजी पाटील शिंदे यांनी केली आहे.

नगर सेवक अनुप अंकुशकर यांच्या कडून आज पासून घरपोच मोफत अन्न पुरवठा ला सुरवात

बिलोली - कोरोना वायरस मुळे आज जगभर गंभीर परिस्थिती निर्माण  झाली आहे  बिलोली शहरात सुध्दा लॉकडाऊन मुळे रोज काम करून   चालवणारा मजुरदार वर्ग आज घडीला कोनतेही रोजगार उपलब्ध नसल्याने या लोकांनवर गंभीर संकट निर्माण झाले हा वर्ग अन्ना पासून वंचित राहू नये म्हणून बिलोली न.प.चे मा.उपाध्यक्ष तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अनुप (दादा)अंकुशकर मित्रमंडळ यांच्या मार्फत शिव भोजन रोज शंभर लोकांची जबाबदारी घेतली आहे व अन्न पुरवठा गाडी सुरू करण्यात आली असुन या माध्यमातून किमान हजार गरजू लोकांना दरोज घरपोच  अन्न पुरवठा मोफत करन्यात येनार आहे.

सामाजिक न्याय मंत्री आणि दिव्यांग कल्याण आयुक्तांच्या निर्देशाला "खो"दिव्यांगांवर ऊपासमारीची वेळ :- राहुल साळवे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी दि 10 :- निसर्गाने जन्मताच अपंगत्व दिलेल्या नांदेड जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार अंध दिव्यांगावर  या लाँकडाऊनमुळे ऊपासमारीची वेळ आली आहे आणि हि वेळ आणनारे नांदेड जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनच पुर्नत: जबाबदार आहे कारण भीक नको आमचा हक्क हवा.सहानुभूती नको विश्वास दाखवा असे म्हणनार्या दिव्यांगांना सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडील बेरोजगार दिव्यांगांचा शासन निर्णयीत राखीव ५% निधी 31 मार्च 2020 पुर्वी पुर्णत: खर्च करून घेण्यास जिल्हा प्रशासन अक्षरशा अपयशी ठरले आहे तसेच गत अनेक महिण्यापासुन जिल्ह्यातील विविध तालुक्यात निराधारांचे मानधन हि अद्याप दिले गेले नाही.अशातच कोरोना या महाभयंकर रोगामुळे संपूर्ण राज्यासह नांदेड जिल्हात हि लाँकडाऊन व संचारबंदी लागु केली आहे या संचारबंदी काळात हालचाल करू न शकणाऱ्या दिव्यांगांना सुविधा मिळाव्या यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे सौ.प्रेरणा देशभ्रतार यांनी दि 26/03/2020 रोजी सर्व सहा हि  विभागीय आयुक्तांना पत्र देऊन अशा दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तुंची किट.आरोग्यासाठी आवश्यक साहित्य आणि कम...

कोरोनाला टाळण्यासाठी घरातच बसा आणि पुस्तक वाचा; लघुळ गावात कौटुंबिक वाचन अभियान

कोरोनाला टाळण्यासाठी आणि डॉ बाबसाहेबांना अभिवादन करण्यासाठी लघुळ ता.बिलोली जी.नांदेड या गावात कौटुंबिक वाचन अभियान काल पासून सुरू केले आहे. ?  हे अभियान 1 एप्रिल सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त सुरू करून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी 14 एप्रिल रोजी त्यांना अभिवादन करून समाप्त करण्यात येणार आहे .  गावात आपापल्या घरात कुटुंबियांसमवेत   दररोज सायंकाळी 7:00 ते 7:30  या वेळेत महापुरुषांच्या पुस्तकांचे क्रमशः वाचन सुरू केले आहे . लॉकडाऊनच्या काळातील या कौटुंबिक वाचन अभियानाचा मुख्य हेतू हा आहे की ; 1 या  माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा जागर घरोघरी झाला पाहिजे. 2 आपल्या आईवडीलांना, लहान भावंडाना घरात दररोज वाचन करायला बसण्याची सवय लागली पाहिजे 3 कोरोनाशी संघर्ष करताना घरातच बसून प्रशासनाचे नियम पाळले पाहिजेत 4 बेभान होऊन महापुरुषांच्या जयंत्या साजरी करण्यापेक्षा भान ठेवून पुस्तक वाचन अभियानाने महापुरुषांच्या जयंत्या साजरी झाल्या पाहिजेत 5 वाचनाने माणूस समृद्ध व विवेकी बुद्धीचा बनतो .त्याचे मन आणि मेंदू बळकट बनते.म्हणून सर्व ...

सेवानिवृत्त शिक्षक शंकर माळगे सर आपली सामाजिक बांधिलकी म्हणून १०० गरिब मोलमजुरी करणारे कुटूंबियांना किराणा सामानाचे वाटप

बिलोली: (सय्यद रियाज)  येथील साठे नगर व देशमुख नगर येथील गरिब व मोलमजुरी करणारे १०० कुटुंबाना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले    बिलोली येथील सेवानिवृत्त शिक्षक शंकर माळगे सर आपली सामाजिक बांधिलकी म्हणून १०० गरिब मोलमजुरी करणारे कुटूंबियांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले यामध्ये साखर,निरमा, साबण,मसाले,तेल अशा जीवनआवश्यक वस्तू चे घरपोच  वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर कुडके, विनोद कुडके, सतिश कुडके यांनी घरपोच वाटप करण्यात मदत केली

धामणगाव येथील हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल रद्द,हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल निमित दर्गाह येथे नागरिकांनी जमा होऊ नये- स.पो.नि. भाऊसाहेब मगरे

मुखेड प्रतिनिधी /भारत सोनकांबळे सद्यस्थितीत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे, या कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे लॉकडाऊन चे आदेश सरकारने दिले आहेत.तसेच देशात सर्वत्र कलम १४४ (जमाव बंदी) लागू करण्यात आला असल्याने मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे होणारा प्रसिध्द व पारंपरिक हजरत सय्यद बाबु पिर उर्स संदल व यात्रा कोरोनाच संकट व संचारबंदी असल्यामुळे या वर्षी  उर्स संदल यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गावकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकताच घेण्यात आला आहे. हजरत बाबु पिर उर्स संदल दि.८ व ९ एप्रिल रोजी आयोजीत करण्यात आला होता.देशातील कोरोना च्या संकटाचे व संचारबंदी ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा महत्त्वपर्ण निर्णय घेण्यात आल्याचे  गावकरी व मुखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले व भाविकांनी याची नोंद घेऊन कोणीही दर्गाह परिसरात जमा होऊ नये,आपल्या घरात आपण सुरक्षित राहून प्रशासनास मदत करावी अस...

सुलतानपूर (शिवसाईनगर) येथे तांदूळ डाळ आणि साबण वाटप.

  ना टीवी, ना अँड्रॉइड मोबाइल...ना...घर  न दार...यांचा  कसा ताळेबंद...? ज्यांच्या घरी आहेत दाणे तेथील कुत्रेही शहाणे ... ज्यांच्या घरी नाही दाणे ती माणसे दिवाने... . बिलोली  3 अप्रील 2020 रोजी कोरणा विषयीचे प्राथमिक ज्ञान देण्यात  आले. यावेळी प्रत्येकांना योग्य अंतर ठेवून संवाद साधण्याचा प्रयत्न झाला . या झोपडीत राहणाऱ्यांना ना घर.... ना दार..... ना टीवी.... ना अँड्रॉइड मोबाइल.... अशी अवस्था ठिकाणी दिसून आली. अशांना कोरोना विषयीची  माहिती देण्यात आली . गावाबाहेर न फिरण्याचे शिवाय बाहेरगावच्याना गावात न येऊ देण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. गरीबाच्या झोपडीत जाऊन त्यांच्याशी त्यांच्या परिवाराच्या विषयीचे हितगूज करून, त्यांना तांदूळ डाळ आणि साबणाची वडी देण्यात आली. भीक मागणाऱ्या  आणि गल्लोगल्ली  पिना .....काटे...…. विकणाऱ्याच्याही परिवारातील मंडळींना भेटून त्यांना कोरोना विषयीची माहिती देण्यात आली.  यात  निवृत्त गटशिक्षणाधिकारी के पी सोने, बिलोलीचे  सामाजिक कार्यकर्ते गोविंद मुंडकर अर्जापूर चे शिवाजीराव पोरडवार,पी....

बिलोली शहरातील गोरगरीब कुटुंबांना जगदिश कदम यांच्या तर्फे 51 हजाराचे धान्य वाटप

बिलोली प्रतिनिधी       कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी संपुर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे त्या मुळे मोल मजुरी करणा-याचे  रोजगार बुडालेल्या बिलोली शहरातील  मजुरदार वंचित व कामगारांच्या मदतीला पिंपळगाव ता.नायगाव जव येथील जगदिश कदम  परिवार धावून आले असून प्रत्येक कुटुंबाला  गहुचे पिठ,तांदूळ, एक किलोचे तेल पाकीट,दाळ,हळद ,मिरची,मिट,लायबॉय साबन, घडीसाबन, देण्याची व्यवस्था करुन शुक्रवारी 51 हजाराची किट  वाटप केले. जगदिश कदम यांच्या या सामाजिक उपक्रमाचे बिलोली शहरात कौतुक होत आहे.    कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने याचा परिणाम मजुरदार व लहान व्यवसाईक   यातून कामगार व मजुरदारही सुटले नाहीत. सर्वच व्यवहार ठप्प असल्याने मजुरदारावर मोठे संकट ओढवले आहे. या संचारबंदीच्या काळात हाताला काम मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न कामगारासमोर उभा टाकला आहे.  सध्या उदभवलेली परिस्थिती पाहून सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार मा अशोकरावजी चव्हाण यांचे कट्टर समर्थक जगदिश व...