कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल) कुंडलवाडी शहरातील कुलदैवत श्री.कुंडलेश्वर मंदीर ठिकाणी कोरोना काळात शासनातर्फे बंद ठेवण्यात असलेले मंदीर उघडण्यात यावे.म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा वतीने उद्धव उध्दव मंदीरचे दार उघड घोषणा देत शहर भाजपतर्फे घंटानाद आन्दोलन करण्यात आले. दि.29 ऑगस्ट रोजी नगरपरिषद उपाध्यक्ष डाॅ.विठ्ठलराव कुडमूलवार यांच्या नेतृत्वात शहरातील कुलदैवत श्री.कुंडलेश्वर मंदीर समोर महाराष्ट्रातील महा आघाडी सरकार चा विरोधात घोषणाबाजी करीत,उद्धव उध्दव मंदीराचे दार उघड नारेबाजी करीत घंठा वाजवत घंटानाद आन्दोलन पारपाडले.या आन्दोलन शहर भाजप अध्यक्ष शेख जावेद अ.अजीज,नवनिर्वाचित भाजप तालूका उपाध्यक्ष हणमंलू ईरलावार, लक्ष्मण भंडारे,नगरसेवक पंढरी पुप्पलवार,जेष्ठ नगरसेवक पंढरीनाथ दाचावार,अशोक पाटील वानोळे.गंगाधर खेळगे,सय्यारेड्डी पुप्पलवार,सचिन कोटलवार,शेख वाहाव सिराजोदीन,नरेश जीठ्ठावार,संजय भास्कर,एकनाथ गवते,रूकमाजी येन्नावार, सुबोध दाचावार,नागेश कोटलावार,नागनाथ चिखले,श्रीकांत नुकूलवार,लक्ष्मण जालावार आदीसह भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते आन्दोलनात सहभागी ...