अबकी बार बालाजी बच्चेवार..... , प्रबळ दावेदार म्हणुन घेणार्यांना चांगलीच चपराक नायगाव प्रतिनीधी : नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांनी जनतेशी थेट संवाद साधत भेटीगाठी वर देत पुर्ण मतदार संघ पिंजुन काढण्याचा सपाटाच लावला याच दरम्यान नायगाव येथे गुरूवारी आठवडी बाजार भरला होता यावेळी बच्चेवार मिञमंडळांच्या वतीने बाजाराला आलेल्या लोकांना बाजार करण्यासाठी कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले प्रत्येकांच्या हातात बालाजी बच्चेवार यांच्याच पिशव्या दिसत होत्या यावेळी बालाजी बच्चेवारच नायगाव विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा माञ पुर्ण बाजारात रंगली होती नायगावचा बाजार जिल्ह्यातच नव्हे तर पुर्ण मराठवाड्यात प्रसिध्द आहे येथे जिल्ह्याहूनच नव्हे तर परजिल्हातील मोठे व्यापारी व्यापारासाठी येतात यासह मराठवाडा,विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश,तेलंगाना,कर्नाटक या राज्यातील व्यापार्यांची नायगावच्या बाजाराशी साठगाठ असल्यामुळे परराज्यातील व्यापारी सुध्दा नायगावला येतात विशेष म्हणजे नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांनी जनतेशी थेट संवा...